शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

दिग्गज नेते करणार आज शक्तिप्रदर्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 3, 2019 00:09 IST

विधानसभा निवडणुकीत उमेदवारी अर्ज भरण्यासाठी नवरात्रातील पाचव्या माळीचा मुहूर्त निवडत जिल्ह्यातील पंकजा मुंडे, धनंजय मुंडे, जयदत्त क्षीरसागर हे दिग्गज उमेदवार आज शक्तिप्रदर्शन करत गुरुवारी आपली उमेदवारी दाखल करणार आहेत. तर इतर मतदार संघातही पक्षांचे अधिकृत उमेदवार तसेच अपक्ष उमेदवारी अर्ज भरणार आहेत. यासाठी सर्वच उमेदवारांनी कार्यकर्त्यांची जमवाजमव केली आहे.

ठळक मुद्देविधानसभा रणधुमाळी : जयदत्त क्षीरसागर, पंकजा मुंडे, धनंजय मुंडेंसह प्रमुख पक्षांचे तसेच अपक्ष उमेदवार भरणार अर्ज

बीड : विधानसभा निवडणुकीत उमेदवारी अर्ज भरण्यासाठी नवरात्रातील पाचव्या माळीचा मुहूर्त निवडत जिल्ह्यातील पंकजा मुंडे, धनंजय मुंडे, जयदत्त क्षीरसागर हे दिग्गज उमेदवार आज शक्तिप्रदर्शन करत गुरुवारी आपली उमेदवारी दाखल करणार आहेत. तर इतर मतदार संघातही पक्षांचे अधिकृत उमेदवार तसेच अपक्ष उमेदवारी अर्ज भरणार आहेत. यासाठी सर्वच उमेदवारांनी कार्यकर्त्यांची जमवाजमव केली आहे.संपर्क, संवादातून मोर्चेबांधणी : रॅलीसाठी केले नियोजनविधानसभा निवडणुकीच्या चार महिने आधी राष्टÑवादी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत जयदत्त क्षीरसागर यांनी शिवसेनेत प्रवेश केला. त्यानंतर राज्याच्या मंत्रीमंडळ विस्तारात त्यांच्याकडे रोहयो खाते आले. या चार महिन्याच्या कालावधीत मोर्चेबांधणी करत क्षीरसागर यांनी मतदार संघातील गावागावात भेटी देऊन त्यांची भूमिका स्पष्ट केली. तसेच दुष्काळजन्य स्थितीमध्ये टंचाई निवारणासाठी मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा केला. शिवसेना नेत्यांच्या उपस्थितीत बैठका आणि सामान्य मतदार, शिवसैनिकांशी संपर्क, संवाद करत आपली पकड मजबूत केली. तर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी एबी फॉर्म देत क्षीरसागर यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब केले. त्यानंतर उमेदवारी अर्ज भरण्याच्या आदल्या दिवशी मंगळवारी नियोजन बैठकीस मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांची उपस्थिती होती. जयदत्त क्षीरसागर गुरुवारी सकाळी ११ वाजता उमेदवारी अर्ज भरणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर निवडणुकीआधी क्षीरसागर समर्थकांकडून केल्या जाणाऱ्या शक्तिप्रदर्शनाकडे लक्ष लागले आहे.

भाजपा महायुतीचे परळीत शक्तिप्रदर्शनपरळी विधानसभा मतदारसंघाच्या भाजपा - शिवसेना - रिपाइं - रासप - रयत क्रांती महायुतीच्या उमेदवार, राज्याच्या ग्रामविकास आणि महिला व बालकल्याण मंत्री तथा पालकमंत्री पंकजा मुंडे आपला उमेदवारी अर्ज गुरुवारी सकाळी ११.३० वाजता शक्तिप्रदर्शनाने दाखल करणार आहेत. शहरातील शिवाजी चौकातून रॅली काढून राणी लक्ष्मीबाई टॉवर चौकात सभा होणार आहे. यावेळी महायुतीचे पदाधिकारी उपस्थित राहुन मार्गदर्शन करणार आहेत.पवारांच्या उपस्थितीत धनंजय मुंडे भरणार अर्जपरळी विधानसभा मतदार संघातील राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेस व मित्र पक्षांच्या आघाडीचे उमेदवार तथा विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे हे गुरूवारी माजी उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. दुपारी १ वाजता उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर शिवाजी चौक येथून प्रचार रॅली निघणार असून मोंढा मैदान येथे जाहीर सभा होणार आहे.

टॅग्स :BeedबीडPankaja Mundeपंकजा मुंडेJaydutt Kshirsagarजयदत्त क्षीरसागरDhananjay Mundeधनंजय मुंडे