शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

गेवराईत पवारांकडून पंडित मुक्तीचा, तर पंडित काका-पुतण्याकडून पवार मुक्तीचा नारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 11, 2024 19:18 IST

गेवराईत पुन्हा एकदा काका-पुतण्यातच लढत; दोन वेळचे आमदार लक्ष्मण पवारांचेही आव्हान

बीड : गेवराई मतदारसंघात पंडित काका-पुतण्यात पुन्हा एकदा लढाई होत आहे. २०१९ मध्येही या दोघांमध्ये मतविभाजन होऊन भाजपच्या लक्ष्मण पवारांना फायदा झाला होता. आता यावेळी पंडितांसह पवार मैदानात आहेत. पवार हे सलग दोनवेळा आमदार राहिले असून सध्या हॅटट्रिकवर आहेत.

गेवराई मतदारसंघातील मतदारांची संख्या ३ लाख ७४ हजार एवढी आहे. २०१९ मध्ये भाजपचे लक्ष्मण पवार आणि राष्ट्रवादीचे विजयसिंह पंडित यांच्यात थेट लढत झाली होती; परंतु अपक्ष म्हणून बदामराव पंडित यांनीही अर्ज दाखल केला. यामुळे विजयसिंह यांच्या मतांची गणिते बिघडली आणि पवारांनी गुलाल उधळला. यावेळी राज्यातील राजकीय समीकरणे बदलल्याने उमेदवारांचे पक्षही बदलले आहेत. सध्या महायुतीकडून अजित पवार गटाचे विजयसिंह पंडित आणि महाविकास आघाडीकडून ठाकरे गटाचे बदामराव पंडित मैदानात आहेत. सलग दोनवेळा भाजपकडून आमदार राहिलेले लक्ष्मण पवार यांनी यावेळी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला. पंडित हे नात्याने काका-पुतण्या आहेत. तिघेही मराठा असल्याने जातीय समीकरणे येथे फार कामी येणार नाहीत. तर दुसऱ्या बाजूला मराठा समाजातीलच २८ वर्षांची तरुणी पूजा मोरेही तिसऱ्या आघाडीकडून रिंगणात असून या तिन्ही मराठा उमेदवारांना आव्हान देत आहे.

निवडणुकीतील कळीचे मुद्दे: - गेवराई मतदारसंघात १९६२ पासून पवार, पंडित यांच्याच घरात आमदारकी राहिलेली आहे, त्यामुळे लोक आता नाराज आहेत.- पवारांकडून पंडित मुक्तीचा, तर पंडितांकडून पवार मुक्तीचा नारा दिला जात आहे.- पंडित, पवार यांना तीन महिला उमेदवारांनीही आव्हान देत आरोपांच्या फैरी झाडल्या आहेत.- पवार यांनी भाजपच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा देत अपक्ष उमेदवारी दाखल केली.- अर्ज भरण्यापूर्वी लक्ष्मण पवारांबाबत अनेक नाट्यमय घडामोडी झाल्या होत्या.

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४marathwada regionमराठवाडा महाराष्ट्र विधानसभा निवडणूकgeorai-acगेवराईBadamrao Panditबदामराव पंडितlaxman hakeलक्ष्मण हाके