शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदींच्या ११ वर्षांच्या काळात भारताची झेप; जगातील चौथी मोठी आर्थिक महासत्ता झाल्याची घोषणा
2
आजचे राशीभविष्य: सोमवार 26 मे 2025; प्रिय व्यक्तीचा सहवास, वैवाहिक जीवनात सौख्य लाभेल; असा असेल तुमचा आजचा दिवस 
3
‘मे’न्सून : १२ दिवस आधीच आल्या सुखसरी; १६ वर्षांत प्रथमच मे महिन्यात मान्सून राज्यात दाखल
4
महाराष्ट्रावर ५.६ लाख कोटींचे कर्ज; मेट्रो, महामार्ग, स्मार्ट सिटीला चालना, राज्याची स्थिती इतरांपेक्षा अधिक चांगली
5
अखेर पाकिस्तानने गुडघे टेकले! आता नवीन अडचणीत सापडला, जल-मंथनसाठी प्रयत्न सुरू
6
भारताच्या अर्थव्यवस्थेची भरारी, जपान आणि इंग्लंडलाही टाकले मागे; तुम्हा-आम्हाला कसा लाभ होईल?
7
हगवणे कुटुंब राक्षसी, त्यांना चौकातच फाशी देण्यात यावी : विजय वडेट्टीवार
8
फक्त मनोरंजनासाठी पत्ते खेळणे हे अनैतिक वर्तन मानले जाऊ शकत नाही: सर्वोच्च न्यायालय
9
SRH vs KKR : ऑरेंज आर्मीचा मोठा विजय! विदर्भकराची हॅटट्रिक हुकली; पण पठ्ठ्यानं मैफिल लुटली
10
नरीमन पॉइंट ते पालघर प्रवास सव्वा तासात! उत्तन-विरार सागरी सेतूला लवरकरच हिरवा कंदील
11
न्यायाधिशांनी चार दिवस प्यायले साप मेलेले दूषित पाणी प्रकृती बिघडली; शासकीय निवासस्थान साेडण्याची नामुष्की
12
हेड- क्लासेन जोडीनं जोर लावला; शेवटी ३०० पारचा नारा अधुरा! पण SRH नं वर्ल्ड रेकॉर्ड केला भक्कम
13
‘इज्जत’ महत्त्वाची आहे; महिलेबरोबर पोस्ट, लालूंनी मुलाला पक्षातून हाकलले
14
चिमुकल्याने सू-सू केल्यामुळे रेल्वेच्या कोचमध्ये राडा; महिलेसह तिघांना बेदम मारहाण
15
मेट्रोने दीड वर्षापूर्वी कंत्राटदार नेमूनही कारशेड उभारणी अजून रखडलेलीच
16
कोल्हापूरच्या घाटक्षेत्रात २९ पर्यंत ऑरेंज अलर्ट; दोन दिवसांतच मान्सून महाराष्ट्रात धडकणार
17
तेजप्रताप यादवच नाही तर या बड्या नेत्यांच्या प्रेमप्रकरणांवरूनही झाला होता वाद, अशी आहे यादी
18
SRH vs KKR: वादळी खेळीसह क्लासेनची विक्रमी सेंच्युरी! पण वैभव सूर्यंवशीच्या तो मागेच राहिला
19
विधानसभा निवडणुकांसाठी सरकारची रणनीती; PM मोदींनी NDAच्या बैठकीत दिला विजयाचा मंत्र
20
पुढचा प्लॅन काय? धोनीनं घरची ओढ अन् या गोष्टीवर प्रेम व्यक्त करत असा टाळला तो विषय

वाढत्या महागाईने सर्वसामान्य जनता त्रस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2021 04:23 IST

अंबाजोगाई : दिवसेंदिवस वाढत्या महागाईने सर्वसामान्य लोकांचे जगणे सध्या कठीण झाले आहे. रोजच्या मिळकतीत जीवन जगणे तारेवरची कसरत होत ...

अंबाजोगाई : दिवसेंदिवस वाढत्या महागाईने सर्वसामान्य लोकांचे जगणे सध्या कठीण झाले आहे. रोजच्या मिळकतीत जीवन जगणे तारेवरची कसरत होत आहे.

इंधन व गॅस दरवाढीने कुटुंबाचा आर्थिक बोजवारा उडाला आहे. शेतकरी वर्ग इंधन दरवाढीच्या चक्रात सापडला असून, इतरही खर्चाची झालेली दरवाढ डोईजड होत आहे. सरकारने भरमसाट कर लावत सामान्यांचे आर्थिक बजेट बिघडवले आहे. अमर्याद इंधन दरवाढ झाल्याने गोरगरीब भरडला जात आहे. जीवनावश्यक वस्तूंसह इतरही पूरक वस्तूंच्या किमती इंधन दरवाढीच्या कारणाने वाढल्या आहेत. सरकार गरिबांची आहे, का मोजक्याच धनिकांचे? असा प्रश्न चर्चेत आला आहे. राजकारणी कोणत्याही पक्षाचा असो. मात्र, इंधन दरवाढ सगळ्यांचे दुखणे झाले आहे. एवढी दरवाढ यापूर्वी कधीच अनुभवली नव्हती. दोनशे रुपये मजुरी करणारा मजूर मात्र जगताना पावलोपावली शासनाला शाप देत आहे. डिझेल महागल्याने शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टरच्या साहाय्याने होणाऱ्या कामांच्या दरातसुद्धा वाढ झाली आहे. ही दरवाढ सहन करावी लागत आहे.

सर्वाधिक फटका शेतकऱ्यांना

डिझेलचे दर गेल्या काही दिवसां पासून सातत्याने वाढत आहेत. यामुळे सर्वसामान्यांना मोठा फटका बसत असून महागाई तीन पटीत वाढ झाली आहे. असे असतानाही शेतकरी मोठ्या उमेदीने खरीप हंगामाच्या तयारीला लागला असला तरी मशागतीचे दर वाढले असल्याने महागाईचा सर्वाधिक फटका शेतकऱ्यांना बसत आहे. मजुरीचे दरही महागाईमुळे वाढले आहेत.

सरकारने तेलाचे दर कमी करावेत. शेतीला ट्रॅक्टरशिवाय पर्याय नसल्याने इंधन दरवाढ परवडणारी नाही. रोजच्या खर्चात मोठी वाढ झाल्याने जगणे मुश्कील होत आहे. शेती उत्पादन खर्चात भरीव वाढ झाली आहे. ही शेतकऱ्यांना अजिबात परवडणारी नाही.

पीक कर्जही अपुरे

शेतकऱ्यांना खरीप व रब्बी हंगामात पेरणीपूर्व पीक कर्ज देण्याची सुविधा शासनाने उपलब्ध करून दिली आहे. अत्यंत कमी व्याजदराने हे कर्ज शेतकऱ्यांना उपलब्ध करून द्यावे. अशा सूचना शासन देते. मात्र प्रत्यक्षात बँकेत शेतकऱ्यांची किरकोळ रकमेचे कर्ज देऊन बोळवण केली जाते. अन्यथा भरमसाट कागदपत्र किंवा हेलपाटे मारण्यापेक्षा जे मिळेल ते घ्यायचे. अशी वेळ शेतकऱ्यांवर आणली जाते.