शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

राख तळ्यात 'जिलेटीन ब्लास्ट'चा प्रयत्न, एटीएसचे पथक परळी औष्णिक विद्युत केंद्र परिसरात

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 29, 2022 18:45 IST

औष्णिक वीज निर्मिती केंद्रास काही धोका नसल्याची माहिती

परळी (बीड): तालुक्यातील दाऊतपुर शिवारातील राख तळ्यातील घट्ट झालेले ढीग मोकळे करण्यासाठी जिलेटिन वापरून ब्लास्टिंग करण्याचा प्रयत्न झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. या प्रकाराची दखल घेत सोमवारी एटीएसच्या औरंगाबाद व बीड येथील अधिकाऱ्यांनी तसेच बीडचे जिल्हा पोलीस अधीक्षक आणि  बॉम्ब शोध व नाशक पथकाने भेट देऊन पाहणी केली. 

वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडून येथे पोलीस अधिकाऱ्यांची एक बैठक घेऊन परिस्थितीचा आढावाही घेण्यात आला आहे. यावेळी एटीएस (दहशतवाद विरोधी पथक औरंगाबाद)चे  जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप पालवे, एटीएसचे पीआय खंदारे ,एपीआय शितल चव्हाण यांच्यासह बीडचे जिल्हा पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर उपस्थित होते. दरम्यान, बॉम्ब शोध व नाशक पथकाने राख तलावाची पाहणी केली. 

एटीएसचे विशेष पोलीस महानिरीक्षक निशीत मिश्रा, अंबाजोगाई चे अतिरिक्त जिल्हा पोलीस अधीक्षक कविता नेरकर अंबाजोगाईचे उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील जायभाये परळी ग्रामीण एपीआय मारुती मुंडे हे ही यावेळी उपस्थित होते. परळी औष्णिक विद्युत केंद्र परिसर प्रतिबंधित क्षेत्र असल्याने व मर्मस्थळ असल्याने एटीएसचे विशेष पोलीस महानिरीक्षक निशीत मिश्रा व इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी राख तळ परिसरास भेट दिली. जिलेटीन जप्त करण्यात आल्याने या मागे कोणाचा हात असू शकतो यावर चर्चा करण्यात आली. 

काय आहे प्रकरण परळी औष्णिक वीज निर्मिती केंद्रातील राख तळ्यात काही अज्ञात व्यक्तीनि दि 26 रोजी राख मोकळी  करण्याकरिता स्फोटके आणल्याची खबर मिळताच औष्णिक वीज निर्मिती केंद्राच्या सुरक्षा कर्मचारी सतर्क झाले. जिलेटीन स्फोटके वापरत असल्याचे सुरक्षा कर्मचाऱ्यांना आढळून आले. केंद्राच्या सुरक्षा कर्मचाऱ्यांनी दोघांना ताब्यात घेऊन परळी ग्रामीण पोलिसांच्या ताब्यात दिले. त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी मिळाली आहे. परंतु, ब्लास्टिंग चे काम देणाऱ्या कॉन्ट्रॅक्टर व राख वाहतूक करणाऱ्या संबंधित व्यक्तीवर मात्र अद्यापही कारवाई झालेली नाही. 

वीज निर्मिती केंद्रास धोका नाहीऔष्णिक वीज निर्मिती केंद्रास काही धोका नसून या ठिकाणाहून औष्णिक वीज निर्मिती केंद्र 2.5 किलोमीटर अंतरावर आहे. सदरील घटनेमुळे नागरिकांनी घाबरून जाण्याचे कारण नाही. औष्णिक वीज निर्मिती केंद्राची सुरक्षा व्यवस्था  चोख आहे, असे मुख्य अभियंता मोहन आव्हाड यांनी स्पष्ट केले असले तरी पोलीस यंत्रणा ही सतर्क झाली आहे

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीBeedबीड