शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
2
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
3
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
4
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
5
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
6
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
7
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
8
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
9
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
10
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
11
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
12
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
13
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
14
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
15
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
16
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
17
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
18
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
19
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन
20
बीडची लेक अन् जावयाची काश्मीरमध्ये पर्यटकांना मदत; दहशतवाद्यांविरोधात आंदोलनही केलं

बीडची गांजा तस्करीतील 'पुष्पा' गँग; ओडिशातून ३ हजाराने घेऊन महाराष्ट्रात १५ हजाराने विक्री

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 23, 2022 15:32 IST

ओडिशातून तेलंगणामार्गे महाराष्ट्रात गांजा; आंतरराज्य टोळीतील मास्टरमाईंडसह चौघे बीडचे

बीड : ओडिशातून स्वस्तात गांजा खरेदी करून तेलंगणामार्गे महाराष्ट्रात आणून विक्री करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करण्यात तेलंगणातील राचाकोंडा पोलिसांना २१ ऑगस्ट रोजी यश आले. या टोळीतील सहाजणांना सापळा रचून अटक केली. धक्कादायक म्हणजे टोळीतील सूत्रधारासह चौघे आरोपी बीडचे रहिवासी आहेत. दोन वाहने, सहा क्विंटल गांजासह सुमारे सव्वा कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

मास्टरमाईंड करण परशुराम परकाळे (वय २७, रा. पिंप्री, ता. आष्टी), अजय महादेव इथापे (३१), संतोष अनिल गायकवाड (३०, रा. चिंचोली धानोरा, ता. आष्टी), आकाश शिवाजी चौधरी (२३, रा. टाकळी अमिया, ता. आष्टी), विनोद लक्ष्मण गाडे (४०, रा. निमगाव चोबा, ता. आष्टी), भुक्या साई कुमार (२७, रा. नागुलू, ता. अनंतगिरी, जि. सूर्यपेठ, ओडिशा) अशी पकडलेल्या आरोपींची नावे आहेत. यातील भुक्या साई कुमार हा मध्यस्थ असून, राजू मलकागिरी, भीमा मलकागिरी व अंबोथू नागराजू (सर्व रा. सूर्यपेठ, ओडिशा) यांचाही आरोपींमध्ये समावेश आहे. मात्र, ते फरार आहेत. यापैकी अंबोथू नागराजू याच्यावर तेलंगणातील घटकेसर पोलीस ठाण्यात गांजा तस्करीच्या गुन्ह्यात २०२० मध्ये अटक झाली होती. तोच या टोळीला गांजा पुरवित असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.

२१ ऑगस्ट रोजी एक मालवाहू जीप (एमएच १६ एई-४५२३) व कारमधून (एमएच ११ बीव्ही-३००२) ओडिशातून ५ क्विंटल ९० किलो गांजा तेलंगणामार्गे महाराष्ट्राकडे जात असल्याची माहिती तेलंगणातील राचाकोंडाचे पोलीस आयुक्त महेश भागवत यांना मिळाली होती. त्यांनी विशेष पोलीस पथक व राचाकोंडा पोलिसांना कारवाईचे आदेश दिले. अब्दुलपूरम पोलीस ठाणे हद्दीत सापळा रचून या टोळीच्या मुसक्या आवळल्या. ५९० किलो गांजा, आठ मोबाईल, दोन वाहने व रोख १९०० रुपये असा एकूण एक कोटी ३० लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. राचाकोंडाचे पोलीस आयुक्त महेश भागवत, अतिरिक्त आयुक्त जी. सुधीर यांच्या मार्गदर्शनाखाली एल. बी .नगर विभागाचे उपायुक्त सनप्रित सिंग, विशेष पथकाचे उपायुक्त के. मुरलीधर, सहायक आयुक्त डी. व्यंकन्ना नाईक, विजय श्रीनिवास, पोलीस निरीक्षक ए. सुधाकर, व्ही. स्वामी, उपनिरीक्षक ए. ए. राजू, के. प्रताप रेड्डी व अंमलदारांनी ही कारवाई केली.

किलोमागे १२ हजारांचा नफादरम्यान, ही टोळी ओडिशातून तीन हजार रुपये किलोप्रमाणे खरेदी केलेला गांजा महाराष्ट्रात १५ हजार रुपये किलोने विक्री करत असे, अशी माहिती तपासात समोर आली आहे. यावरून गांजा तस्करीतील अर्थकारणाचा अंदाज येऊ शकतो.

सूत्रधार तीन गुन्ह्यांत वाँटेडटोळीचा सूत्रधार करण परकाळे याच्यावर तेलंगणात २०२० मध्ये गांजा तस्करीचे तीन गुन्हे नोंद आहेत. या गुन्ह्यांत तो वाँटेड आहे. आता त्याला तिन्ही गुन्ह्यांत टप्प्या-टप्प्याने अटक केली जाणार असल्याची माहिती आयुक्त महेश भागवत यांनी दिली. इतर तीन आरोपींचा शोध सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीBeedबीड