शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

वर्षपूर्ती दुचाकी चोरीच्या गुन्ह्याची, शोधासाठी पोलिस ठाण्यासमोर केक कापून गांधीगिरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 24, 2023 13:27 IST

दुचाकी चोरीच्या गुन्ह्याची वर्षपूर्ती; पोलिस ठाण्यासमोर केक कापून केली गांधीगिरी 

परळी: येथील मोहन व्हावळे यांच्या दुचकीची चोरी होवून एक वर्ष उलटले. मात्र, अद्याप दुचाकी सापडू शकली नाही. यामुळे दुचाकी चोरीच्या गुन्ह्याच्या वर्षपूर्तीचा चक्क पोलीस स्टेशन समोर केक कापून गांधीगिरी करत निषेध करण्यात आला.

या बाबतची माहिती अशी की, मागील वर्षी नोव्हेंबरमध्ये पत्रकार मोहन व्हावळे यांची दुचाकी बसस्टँड रोडवरून  चोरीस गेली. संभाजी नगर पोलीस स्टेशनला गुन्हा नोंद करून आता एक वर्ष झाले. मात्र वारंवार पाठपुरावा करूनही अद्याप दुचाकीचा शोध लागू शकला नाही. याविरोधात सामाजिक कार्यकर्ते अश्विन मोगरकर यांनी पुढाकार घेऊन संभाजीनगर पोलीस स्टेशनसमोर चक्क या दुचाकी चोरीच्या गुन्ह्याची वर्षपूर्ती झाली म्हणून केक कापून गांधीगिरी केली. यावेळी पोलीस स्टेशनसमोर गाडीचा फोटो बॅनरवर लावून निषेधाच्या घोषणा देण्यात आल्या. त्यानंतर संभाजीनगर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सलीम चाऊस यांना निवेदन देण्यात आले. 

पोलीस निरीक्षक सलीम चाऊस यांनी दुचाकी चोरीच्या गुन्ह्याचा लवकरात लवकर शोध लावण्याचे आश्वासन शिष्टमंडळास दिले आहे. यावेळी विजय जोशी, वैजनाथ  कळसकर, सचिन स्वामी,  धनंजय आढाव, प्रकाश चव्हाण, प्रवीण फुटके, ज्ञानोबा सुरवसे, संभाजी मुंडे, दत्तात्रय काळे, महादेव शिंदे, संजीब रॉय आदी उपस्थित होते.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीBeedबीड