शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

महिलेस अश्लील व्हिडीओ पाठवणारा गजाआड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2020 23:49 IST

शहरातील एका महिलेस व्हॉट्सअ‍ॅप आणि फेसबूकच्या माध्यमातून गुप्तता बाळगून अश्लील व्हीडीओ व मेसेज पाठवले जात होते. याप्रकरणी पीडित महिलेने शिवाजीनगर पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीविरुद्ध २६ फेब्रुवारी रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता.

बीड : शहरातील एका महिलेस व्हॉट्सअ‍ॅप आणि फेसबूकच्या माध्यमातून गुप्तता बाळगून अश्लील व्हीडीओ व मेसेज पाठवले जात होते. याप्रकरणी पीडित महिलेने शिवाजीनगर पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीविरुद्ध २६ फेब्रुवारी रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता. यातील आरोपीची कुठलीही ओळख नसताना सायबरसेलच्या मदतीने शिवाजीनगर पोलिसांनी कारवाई करत आरोपी शेख खदीर शेख समी (रा. भालदारपुरा, बारदरी मशीदजवळ पेठ बीड ) याला २८ फेब्रुवारी रोजी अटक केली आहे.खदीर हा शहरातील एका महिलेस व्हॉट्सअ‍ॅपच्या माध्यमातून व्हीडीओ कॉल करून अश्लील चाळे केले जात होते. तसेच वारंवार पॉर्न व्हिडीओ देखील पाठवले जात होते. यासंदर्भात पीडित महिलेने वेळोवेळी कॉल करून व्हिडीओ पाठवणारा कोण आहे, याविषयी माहिती घेण्याचा प्रयत्न केला मात्र, आरोपीकडून ओळख लपवली जात होती. दरम्यान हा मनस्ताप सहन न झाल्याने पीडित महिलेने या नंबर विरुद्ध शिवाजीनगर पोलीस ठाण्यात अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. दरम्यान याप्रकरणाचा तपास शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या मपोउपनि मीना तुपे या करत होत्या. दोन दिवस सायबरसेलच्या मदतीने व्हॉट्सअ‍ॅप नंबरचे लोकेशन घेऊन आरोपी शोधण्याचा प्रयत्न केला जात होता. काही संशयित देखील ताब्यात घेतले. मात्र, खदीर हा ज्या नंबरवरून व्हॉट्सप कॉल व मेसेज करत होता, तो नंबर त्याने बंद करून एका अ‍ॅपच्याद्वारे तो सोशल मीडिया वापरत होता.दरम्यान सायबर सेलच्या माध्यमातून व्हॉट्सप कोण वापरतो, त्याचे लोकेशन काढले. त्यानुसार छापा मारत २८ फेब्रुवारी रोजी मध्यरात्री भालदापुरा येथे छापा ठाकून शेख खदीर शेख समी या आरोपीला अटक केली.ही कारवाई पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार, अपर अधीक्षक विजय कबाडे, डीवायएसपी भास्कर सावंत, पोनि एस.एस.बीर्ला यांच्या मार्गदर्शनाखाली मपोउपनि मिना तुपे, पोना बालाजी मुळे, पठाण, शिवाजी कागदे, विष्णू चव्हाण, प्रदीप वायभट, सायबरसेलच्या मसपोनि शिंदे, शेख सलीम, सुरवसे नसीर, अन्वर यांनी केली.

टॅग्स :BeedबीडPoliceपोलिसSocial Mediaसोशल मीडियाArrestअटक