शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

जवान महेश तिडके यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2020 00:17 IST

येथून जवळच असलेल्या लाडझरी (ता. परळी) येथील सैनिक महेश यशवंत तिडके (वय २३) यांच्यावर अतिशय शोकाकुल वातावरणात शासकीय इतमामात २ रोजी सकाळी ९.३० वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले. जवान तिडके यांना अखेरचा निरोप देण्यासाठी अलोट गर्दी उलटली होती.

ठळक मुद्देबंदुकीच्या फैरी झाडून मानवंदना : साश्रू नयनांनी निरोप, दर्शनासाठी गर्दी

नृसिंह सूर्यवंशी ।लोकमत न्यूज नेटवर्कघाटनांदूर : येथून जवळच असलेल्या लाडझरी (ता. परळी) येथील सैनिक महेश यशवंत तिडके (वय २३) यांच्यावर अतिशय शोकाकुल वातावरणात शासकीय इतमामात २ रोजी सकाळी ९.३० वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले. जवान तिडके यांना अखेरचा निरोप देण्यासाठी अलोट गर्दी उलटली होती.महेश तिडके हे भटिंडा (पंजाब) येथे सैन्यात टेक्निशियन या पदावर कार्यरत होते. ड्युटी संपवून घरी मोटारसायकलवरून परतत असताना १९ डिसेंबर रोजी दाट धुक्यात त्यांना कारने धडक दिली.अपघातात गंभीर जखमी झाल्याने त्यांना सैन्यादलातील दवाखान्यात दाखल करण्यात आले. २७ रोजी ते कोमात गेले व अखेर ३० डिसेंबर रोजी त्यांची प्राणज्योत मालवली. २०१६ मध्ये सैन्यात भरती झाले होते. अंत्यसंस्कारापूर्वी महेश यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी जि.प. शाळेच्या प्रांगणात ठेवण्यात आले होते. दर्शनासाठी या ठिकाणी अलोट गर्दी उलटली होती.राज्याचे मंत्री धनंजय मुंडे यांनी शोकसंदेश पाठवून आपल्या संवेदना प्रकट केल्या. शासनाच्या वतीने परळीचे उपजिल्हाधिकारी गणेश महाडीक, तहसीलदार पाटील, गटविकास अधिकारी संजय केंद्रे, तलाठी रेश्मा गुणाले, ग्रामसेवक ज्ञानेश्वर मुकाडे यांनी पुष्पचक्र अर्पण करून श्रध्दांजली अर्पण केली. माजी मंत्री पंडितराव दौंड, परळी पं.स. सभापती बबनराव गित्ते, शिवाजी गुट्टे यांनी अंत्यदर्शन घेऊन संवेदना व्यक्त केल्या.सैन्याचे बाळकडू घरातूनचमहेश तिडके यांचे वडील सैन्यात होते. ते सेवानिवृत्त झाले आहेत तर त्यांचे मोठे बंधू राहुल यशवंत तिडके हे सुध्दा सैन्यात असून, ते श्रीनगर येथे कार्यरत आहेत.घरातील सैनिकांची पार्श्वभूमी पाहता महेश यांनी आर्मीत भरती होण्यासाठी कठोर मेहनत घेतली होती. दहावीनंतर पॉलिटेक्निक करून ते सैन्यात भरती झाले होते.

टॅग्स :BeedबीडSoldierसैनिकDeathमृत्यू