शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मोठा घोटाळा, राहुल गांधी यांनी सादर केले पुरावे, मतदार यादीतील घोळ केला उघड   
2
"ही अमानवी प्रथा बंद करा..."; सरन्यायाधीश संतापले; सुप्रीम कोर्टाचे महाराष्ट्र सरकारला निर्देश
3
ट्रम्प टॅरिफचा परिणाम, सोन्या-चांदीचे दर उच्चांकी स्तरावर; खरेदीसाठी आणखी खिसा रिकामा करावा लागणार
4
आधी फिल्मी स्टाईलने माहिती घेतली, कारवाई केली, आता त्याच कंपनीने शिंदेंच्या मंत्र्यांच्या कार्यक्रमाला स्पॉन्सर केले
5
इस्रायल, ब्रिटनपासून युक्रेनपर्यंत...; 'ही' धोकादायक मिसाईल खरेदी करण्यासाठी १९ देशांची धडपड!
6
रक्षाबंधन असणार खास! ६५ वर्षांपूर्वी जत्रेत हरवलेली बहीण सापडली, नातवाने भावाशी भेट घडवली
7
'अमेरिका दबाव टाकू शकत नाही; भारतानेही त्यांच्यावर ५०% कर लादावा', शशी थरुर थेट बोलले
8
मुंबई-गोवा ‘वंदे भारत’ २० कोचची होणार? कधीपासून सेवा सुरू करणार? प्रवाशांचा तुफान प्रतिसाद
9
ट्रम्पचा 'टॅरिफ बॉम्ब' थांबता थांबेना! आता थेट चिप्सवर १००% शुल्क, तुमच्या खिशाला किती फटका बसेल?
10
Shravan Purnima 2025: श्रावण पौर्णिमेला कोळीबांधव का करतात रामाची पूजा? जाणून घ्या कारण!
11
मॉर्फ कमी होते म्हणून की काय Elon Musk आता खालच्या पातळीवर उतरले; ग्रोक एआय देणार आता नग्न फोटो 
12
मुलीची पाठवणी करताना वधूपिता गहिवरला, डबडबल्या डोळ्यांनी जावईबापूंना म्हणाला- माझी लेक... (VIDEO)
13
"१२ फ्लॅट, ४ बंगले.., शिंदेंच्या आमदारांची मस्ती जिरवायचीय"; भाजपा आमदाराचा गंभीर आरोप
14
कोरोना काळात एका गोळीसाठी अमेरिका तडफडत होता, भारताने एका कॉलवर ५० लाख टॅब्लेट पाठवल्या आणि आता...
15
५०० रुपयांच्या SIP चा हप्ता चुकला अन् बँकने लावला ५९० रुपये दंड, तुही तर ही चूक करत नाही ना?
16
“अमेरिकेच्या आदेशांचे पालन करतोय, तोपर्यंत भारत महान मित्र, पण...”; चीनने स्पष्टच सांगितले
17
पीडितेच्या साडीने माजी खासदाराला पाठवले तुरुंगात, प्रज्वल रेवण्णा प्रकरणात कसा सापडला महत्त्वाचा पुरावा?
18
या देशामध्ये मुस्लिमांना सार्वजनिक ठिकाणी सण साजरे करण्यास करण्यात आली मनाई  
19
"मी खेळू शकेन असं वाटत नाही, पण CSK साठी..."; धोनीच्या विधानाने चाहत्यांच्या भुवया उंचावल्या
20
Aashna Chaudhary : जिद्दीला सॅल्यूट! अपयशाने खचली नाही, IPS होण्याचं स्वप्न केलं पूर्ण, आता मिळाली मोठी जबाबदारी

फळांची बंपर आवक, भाव स्वस्त तरीही ग्राहकी नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2018 01:02 IST

फळ बाजारात काश्मीरचे सफरचंद, राजस्थानच्या गंगानगरचे किनू संत्री, नागपूरची आंबटगोड संत्री, राहुरीचे पेरु, वाशीचे अ‍ॅपल बोरांची मोठ्या प्रमाणात आवक होत आहे

लोकमत न्यूज नेटवर्कबीड : येथील फळ बाजारात काश्मीरचे सफरचंद, राजस्थानच्या गंगानगरचे किनू संत्री, नागपूरची आंबटगोड संत्री, राहुरीचे पेरु, वाशीचे अ‍ॅपल बोरांची मोठ्या प्रमाणात आवक होत आहे. हिवाळ्याच्या मोसमात सर्वच फळांची आवक असल्याने विक्रेत्यांची दुकाने, गाडे सजले आहेत. तुलनेने भावही परवडणारे आहेत, मात्र बाजारातग्राहकच नसल्याने फळविक्रेते हवालदिल झाले आहेत. मागील काही दिवसांपासून दरात कमालीची घसरण झाल्याने सफरचंदाला मंदीचा डाग लागला आहे.बीडच्या बाजारपेठेत काश्मीर भागातून डिलक्शन सफरचंदाची आवक होत आहे. एरव्ही १५० ते १८० रुपये किलो दराने सफरचंद खरेदी करावे लागले. दोन आठवड्यांपूर्वी १५ किलो सफरचंदाच्या पेटीचे भाव ८०० ते १००० रुपये होते. त्यामुळे किरकोळ बाजारात चांगल्या प्रतीचे सफरचंद ८० ते ९० रुपये किलोपर्यंत मिळत होते. यंदा आवक वाढल्याने आणि ग्राहकी नसल्याने भाव चांगलेच घसरले आहेत.मात्र दोन दिवसांपासून सफरचंदाच्या पेटीमागे १५० ते २०० रुपयांची घसरण झाली आहे. बीड येथील फळांच्या बाजारात आठवड्यात ५० टन सफरचंदाची आवक होत होती, सध्या २० टन सफरचंदाची आवक आहे. त्यामुळेतरी भाव स्थिर राहतील अशी आशा होती. तरीही पाहिजे तसा उठाव नसनू मंदीचा फयका सहन करावा लागत असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले.दुष्काळी फटका : तापमानामुळेही परिणामयंदा पाऊस कमी झाल्याने जिल्ह्यातील फळबागांची होरपळ सुरु झाली आहे. उष्णतेचे प्रमाण वाढत असल्याने फळबागांवर विपरित परिणाम होत आहे. पुढे पाणी राहणार नाही, सध्या फळे ठेवून जमणार नाही त्यामुळे फळउत्पादक शेतकरी डाळींब, पपई, चिकू बाजारात आणत आहेत. परिणामी आवक वाढली आहे. दुष्काळजन्य स्थितीमुळे ग्रामीण भागातून शेकडो मजुरांनी ऊस तोडीसाठी स्थलांतर केले आहे. त्यामुळे आठवडी बाजारात ग्राहकीचे प्रमाण कमी झाले आहे. तसेच शहरी भागातही याचा परिणाम दिसून येत आहे.राजस्थानच्या गंगानगरची किनू संत्री बीडमध्येराजस्थानच्या गंगानगर भागातून किनू संत्रीची आवक सुरु झाली आहे. आठवड्यात जवळपास २० टन किनू संत्रीची आवक होत आहे. उठावदार दिसणारी आंबटगोड रसदार संत्रीचे ठोक बाजारात ५० रुपये तर किरकोळ बाजारात ६५ ते ७० रुपये किलो होते. मागील चार दिवसांपासून आवक वाढल्याने ठाक बाजारात किनू संत्रीच्या १० किलो पेटीचे भाव ३५० रुपये तर लहान आकाराच्या किनू पेटीचे भाव २५० रुपये आहे. त्यामुळे किरकोळ बाजारातही आकारानुसार किनू संत्रीचे भाव ३० ते ५० रुपये किलो आहे. नागपूरच्या संत्रीचे दरही घसरलेले आहेत. नागपूर, अमरावती आणि विदर्भातील इतर जिल्ह्यातून आवक होत आहे. ठोक बाजारात २५ ते ३० रुपये तर किरकोळ बाजारात ४०- ४५ रुपये किलो भाव आहेत.राहुरीचे तजेलदार पेरू वेधू लागले लक्षफळांच्या बाजारात पेरूने जोरदार आगमन केले आहे. पिवळसर, हिरव्या रंगाचे, तजेलदार पेरू ग्राहकांना आकर्षित करत असून राहुरी भागातून पेरूची मोठ्या प्रमाणात आवक होत आहे. २० किलो पेरू कॅरेटला ५०० रुपये भाव मिळत असून किरकोळ बाजारात ३५ ते ४० रुपये भाव आहे.अ‍ॅपल बोरांची टनावर आवकभूम तालुक्यातील वाशी तसेच बीड तालुक्यातून आठवड्याला तीन टन अ‍ॅपल बोरांची आवक होत आहे. मागील वर्षी या बोरांना कॅरेटमागे ३०० रुपये भाव मिळाला. यंदा शंभर रुपयांची घसरण झाल्याने मात्र कॅरेटचे भाव २०० रुपये आहे.तैवान पपईचे भाव घसरलेबीड तालुक्यातील वैद्यकिन्ही तसेच इतर गावांतून तैवान पपईची आवक होत आहे. ठोक बाजारात १५ ते २० किलो पपईचे कॅरेट १०० ते १५० रुपये असून किरकोळ बाजारात २० ते २५ रुपये किलोपर्यंत दर्जानुसार भाव आहे.

टॅग्स :fruitsफळेconsumerग्राहकMarketबाजार