शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

अंबाजोगाईत वैद्यकीय प्रवेशातील अन्यायाविरोधात निघाला मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2019 18:54 IST

एक विद्यापीठ एक गुणवत्ता यादी या तत्वाने ७०:३० आरक्षण तात्काळ रद्द करा 

ठळक मुद्देप्रवेशाच्या वेळी घटनाबाह्य प्रादेशिक आरक्षण  ७०:३० पद्धतीने करण्यात येते. या प्रक्रियेमुळे मराठवाडयावर वर्षानुवर्षे अन्याय होत आहे.

अंबाजोगाई (बीड ) : वैद्यकीय शिक्षणासाठी प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांवर प्रवेश प्रक्रियेत होणाऱ्या अन्यायाच्या निषेधार्थ सोमवारी (दि.१ ) शहरातून  विद्यार्थी व सामाजिक कार्यकर्ते यांनी सर्वपक्षीय संघर्ष समितीच्यावतीने उपजिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. यावेळी आंदोलकांनी विविध मागण्यांचे निवेदन उपजिल्हाधिकारी यांना दिले. 

महाराष्ट्रातील वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या प्रवेशाच्या वेळी घटनाबाह्य प्रादेशिक आरक्षण  ७०:३० पद्धतीने करण्यात येते. यासाठी उर्वरित महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भ अशी विभागणी केलेली आहे. या प्रक्रियेमुळे मराठवाडयावर वर्षानुवर्षे अन्याय होत आहे. मराठवाडयातील विद्यार्थ्यांसाठी वैद्यकीय प्रवेशाच्या अत्यंत कमी जागा शिल्लक राहतात. तर उर्वरित महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात ७० टक्के आरक्षित अशा १३८६. खाजगी वैद्यकीय महाविद्यालयात ८१५ अशा एकूण २२०१ जागा उपलब्ध आहेत. या तुलनेत मराठवाडयात शासकीय ३८७ व खाजगी ६० अशा एकूण ४४७ जागा उपलब्ध आहेत. 

मराठवाडयातील सर्व जातींमध्ये गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांना उर्वरित महाराष्ट्र व विदर्भातील ७० टक्के जागांवर प्रवेश मिळत नाही. त्यामुळे जास्त गुण असूनही वैद्यकीय शिक्षणासाठी प्रवेश मिळत नाही. यासाठी मूळ ७०:३० आरक्षणाचे तत्व विद्यापिठांच्या अंतर्गत प्रभागांना लागू होते. परंतु वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी एकच नाशिक येथील आरोग्य विद्यापीठ असल्यामुळे प्रादेशिक आरक्षण लागू करणे अन्यायकारक आहे. यासाठी एक विद्यापीठ एक गुणवत्ता यादी या तत्वाने ७०:३० आरक्षण तात्काळ रद्द करून सन २०१९ च्या प्रवेश प्रक्रियेत मराठवाडयातील गुणवत्ताधारक विद्यार्थ्याना न्याय द्यावा, अन्यथा आगामी काळात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही मोर्चेकऱ्यांनी दिला.

या मोर्चात ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते नंदकिशोर मुंदडा, प्रा. नानासाहेब गाठाळ, कॉ. बब्रुवाहन पोटभरे, शेख रहिम, प्रा. सुभाष धुळे, नमिता मुंदडा, डॉ. नरेंद्र काळे, पंचायत समितीच्या सभापती मीना भताने, महादेव मस्के, यांच्यासह विविध सामाजिक संस्थांचे पदाधिकारी, विविध संघटना व विद्यार्थी मोठ्या संख्येने या आंदोलनात सहभागी झाले होते. 

टॅग्स :agitationआंदोलनAmbajogaiअंबाजोगाईMedicalवैद्यकीयStudentविद्यार्थी