शहरं
Join us  
Trending Stories
1
Waqf Law: नव्या वक्फ कायद्यातील दोन तरतुदींना सुप्रीम कोर्टाची स्थगिती; सरकारकडून मागितलं उत्तर
2
महाराष्ट्रात पहिलीपासून हिंदीच्या सक्तीवरून राज ठाकरे आक्रमक, म्हणाले. "आज भाषा सक्ती करत आहेत, उद्या…’’, 
3
"बलात्कार करायचा तर करा, पण, आमच्या पती, मुलांना सोडा…’’ मुर्शिदाबाद प्रकरणी कोर्टासमोर आली धक्कादायक माहिती   
4
३६० अंकांनी घसरल्यानंतर सेन्सेक्सची १५०० अंकांची झेप; 'ही' आहेत तेजीची ५ कारणे
5
रेणुका शहाणेंनी सासरी पाळल्या सर्व रुढी-परंपरा; म्हणाल्या, "राणाजींनी कधीच मला..."
6
Video: धोनीने जिंकली चाहत्यांची मनं..!! व्हिलचेअर बसलेल्या चाहतीजवळ स्वत: जाऊन काढला 'सेल्फी'
7
गुजरातमधील पाटण जिल्ह्यात भीषण अपघात; बस आणि ऑटोरिक्षाच्या धडकेत ६ जण ठार!
8
IPL 2025: ट्रेव्हिस हेडच्या जाहिरातीवरून तुफान राडा! RCB ने घेतली कोर्टात धाव, नेमकं प्रकरण काय?
9
सलमानचा 'सिकंदर' ठरला फ्लॉप, सपोर्टला आला अक्षय कुमार, म्हणाला-"टाइगर जिंदा है, हमेशा जिंदा रहेगा"
10
रेश्मा केवलरमानी यांचा अमेरिकेत डंका! टाईम मासिकाच्या टॉप १०० यादीत एकमेव भारतीय
11
CM फडणवीसांचा नव्या शैक्षणिक धोरणाला पाठिंबा; म्हणाले, “मराठी आली पाहिजे, पण हिंदी...”
12
ऑटोमॅटीक कार चालवत असाल किंवा एकाच जागी बसून असाल तर काय कराल? डीव्हीटी काय असतो...
13
Aligarh: "मी लग्न करेन, पण एका अटीवर..."; सासूसोबत पळून गेलेला जावई काय म्हणाला?
14
हिंदी सक्तीवरून मनसे आक्रमक, आंदोलनाचा इशारा; नेते म्हणाले, “आमच्यावर भाषा लादू शकत नाही”
15
"३ महिन्यात निर्णय घ्या"; कोर्टाच्या निर्णयावर उपराष्ट्रपती नाराज, म्हणाले, "न्यायालय आदेश देऊ शकत नाही"
16
२०३२ पर्यंत गुरुची अतिचारी गती: ९ राशींना गुरुबळ, पद-पैसा-प्रतिष्ठा वाढ; बक्कळ लाभ, भरभराट!
17
माझा आजचा दौरा जड अंतःकरणाने रद्द करावा लागतो आहे; कारण सांगत धनंजय मुंडेंनी दिली माहिती
18
IPL 2025: २५ दिवसांपूर्वी केलेली भविष्यवाणी आज काव्या मारनला हसवणार की रडवणार? प्रकरण काय
19
पंचांशी वाद घातल्याबद्दल मुनाफ पटेलला बीसीसीआयने ठोठावला दंड, दिल्ली- राजस्थान सामन्यात काय घडलंं?
20
चीनच्या कंपनीने मारुतीच्या फ्राँक्सची कॉपी केली; 1200 किमी रेंजवाली एसयुव्ही लाँच केली

आवादा कंपनीत चोरी करणारे १० पैकी चौघे पकडले; २७ गुन्हे दाखल टोळीवर मकोका लागणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2025 18:22 IST

चोरी करणाऱ्या १० जणांमध्ये सात चाेरटे हे धाराशिव जिल्ह्यातील तर तिघे केज तालुक्यातील नांदुरचे आहेत.

बीड : केज तालुक्यातील मस्साजोग व विडा येथील पवनचक्कीचे काम करणाऱ्या आवादा कंपनीत लाखो रुपयांची चोरी झाली होती. याप्रकरणात १० आरोपी निष्पन्न करून चौघांना स्थानिक गुन्हे शाखेने बेड्या ठोकल्या आहेत. त्यांच्याकडून चार गुन्हे उघड झाले असून ११ लाखांचा मुद्देमालही जप्त केला आहे. आता या टोळीवर मकोका लावणार असल्याची माहिती पोलिस अधीक्षक नवनीत काँवत यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली.

७ एप्रिल रोजी वीडा येथील आवादा कंपनीच्या ठिकाणी सुरक्षा रक्षकाचे हातपाय बांधून मारहाण करत ११ लाख रुपयांचे साहित्य चोरी केले होते. त्याआधी ११ मार्च राेजी मस्साजोग येथील प्रकल्पातूनही लाखो रुपयांचे साहित्य चोरी झाले होते. याच ठिकाणी सरपंच संतोष देशमुख यांना वाल्मीक कराड गँगकडून मारहाण झाली होती. तेव्हापासून ही कंपनीही चर्चेत आली. चोरीच्या सलग दोन घटनांमुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्न उपस्थित केला जात होता. अखेर हे सर्व गुन्हे धाराशिव जिल्ह्यातील वाशी येथील टोळीने केल्याचे समोर आले. त्यानंतर या सर्वांना सोमवारी सकाळी अटक करण्यात आली. त्यांच्याकडून एका जीपसह वेगवेगळ्या गुन्ह्यातील ११ लाख ५८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पोलिस अधीक्षक नवनीत काँवत यांनी ही माहिती दिली. यावेळी अपर अधीक्षक सचिन पांडकर यांच्यासह स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

...अशी आहेत आरोपींची नावेबबन सरदार शिंदे (वय ४० नांदूर, ता.केज), धनाजी रावजी काळे (वय २३), मोहन हरी काळे (वय ३०) व लालासाहेब सखाराम पवार (वय २६ सर्व रा. वाशी, ता. धाराशिव) अशी पकडलेल्या आरोपींची नावे आहेत. आणखी सहा जणांची नावे निष्पन्न झाली आहेत. त्यांचा शोध सुरू आहे.

टोळीवर २७ गुन्हेचोरी करणाऱ्या १० जणांमध्ये सात चाेरटे हे धाराशिव जिल्ह्यातील तर तिघे केज तालुक्यातील नांदुरचे आहेत. हे सर्व आरोपी कुख्यात गुन्हेगार आहेत. धाराशिव व बीड जिल्ह्यातील वेगवेगळ्या पोलिस ठाण्यात त्यांच्याविरोधात २७ गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत.

...यांनी केली कारवाईपाेलिस अधीक्षक नवनीत काँवत, अपर अधीक्षक सचिन पांडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक उस्मान शेख, सहायक पोलिस निरीक्षक विजयसिंह जोनवाल, उपनिरीक्षक महेश विघ्ने, हनुमान खेडकर, महेश जोगदंड, भागवत शेलार, तुषार गायकवाड, गणेश मराडे, बप्पासाहेब घोडके यांनी ही कारवाई केली.

टॅग्स :Beed Crimeबीड क्राईम मराठी बातम्याBeedबीड