शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठी उमेदवाराचा प्रचार करण्यास गुजराती सोसायटीत विरोध; ठाकरे गटाचा दावा, काय घडलं?
2
"भाजपा जे बोलते, ते करून दाखवते"; ओडिशामध्ये पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
3
आमचा पक्ष काँग्रेसच, पण सांगलीत चिन्ह चोरीला गेले; विशाल पाटील यांची ‘लोकमत’ला मुलाखत
4
राहुल गांधींच्या वक्तव्यामुळे २०० विद्यापीठांचे कुलगुरू संतप्त, कारवाईची मागणी
5
उपमुख्यमंत्र्यांनी काँग्रेसच्या नगरसेवकाला मारली थप्पड, भाजपाने शेअर केला व्हिडीओ 
6
Nexon EV Review: टाटाच्या नेक्सॉन ईव्हीच्या रेंजने चकीत केले...; दररोजचे गाव ते पुण्यातील ऑफिसचे अंतर, कशी वाटली...
7
Adani Group Stocks SEBI: अदानी समूहाचे शेअर्स आपटले, SEBI च्या नोटिसनंतर स्टॉक्समध्ये घसरण कायम
8
स्टेशन मास्तरला लागली डुलकी, मिळाला नाही सिग्नल, स्टेशनवर खोळंबली ट्रेन, ड्रायव्हर हॉर्न वाजवून दमला, अखेर...
9
शरद पवारांंची तब्येत बिघडल्याने हेमंत ढोमेचं भावूक आवाहन, म्हणाला - "आपली मेहनत घेण्याची क्षमता..."
10
१५ हजार सॅलरी, १० हजारांची लाच अन् घरी सापडले ३० कोटी; वाचा इनसाईड स्टोरी
11
"मी अजून सिनेमा पाहिलाच नाहीये, कारण...", 'नाच गं घुमा'साठी मुक्ता बर्वेची पोस्ट
12
दोन कोटींच्या चंदन चाेरीतील मुख्य आरोपी शरद पवार गटाचा नगरसेवक
13
स्वामी समर्थ पुण्यतिथी: स्वामीपूजनानंतर आवर्जून म्हणा, श्री स्वामी समर्थ महाराजांची आरती
14
सडलेला तांदूळ, खराब नारळ, लाकडाचा भूसा, केमिकलने बनवायचे मसाले, 'असा' झाला पर्दाफाश
15
स्वामी समर्थ पुण्यतिथी: शेकडो वर्षे लोटली, स्वामी आजही समस्त भक्तांच्या पाठीशी आहेत!
16
मी राजकारणातील सासू, तर अर्जुनराव हे माझी सून; रावसाहेब दानवे यांची टोलेबाजी
17
अक्षय्य तृतीयेला २ राजयोग: ६ राशींना लाभच लाभ, येणी मिळतील; नोकरीत संधी, लक्ष्मी शुभ करेल!
18
SBI मधून २० वर्षांसाठी ₹३० लाखांचं घ्याल Home Loan? किती असेल EMI, किती द्याल व्याज, पाहा
19
खुद्द अजित पवार उभे असते, तर... ; सुनेत्रा पवारांवरून सुप्रिया सुळेंचे महत्वाचे वक्तव्य
20
Godrej Family Tree: गोदरेज समूहाची 'अशी' झालेली सुरुवात, पाहा आज कुटुंबात कोण-कोण सांभाळतंय व्यवसाय?

निवडणुकीच्या पार्श्वभूमिवर बीड जिल्ह्यातून आणखी चार गुंड हद्दपार 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2019 6:35 PM

बीड जिल्ह्यात गुंडगिरी करणाऱ्यांवर हद्दपारीच्या कारवाया केल्या जात आहेत.

बीड : जिल्ह्यात गुंडगिरी करणाऱ्यांवर हद्दपारीच्या कारवाया केल्या जात आहेत. बीड व धारूर ठाणे हद्दीतील आणखी चार गुंडांना वर्षभरासाठी जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले आहे. पोलीस अधीक्षक जी.श्रीधर यांनी मंगळवारी ही कारवाई केली. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कारवायांचा धडाका सुरू असल्याने गुन्हेगारांमध्ये दहशत निर्माण झाली आहे.

धारुर ठाण्याच्या पोलिसांनी कृष्णा श्रीरंग सोनटक्के (२७) व नाना उर्फ सूरज बन्सी चव्हाण (२४) यांच्याविरुध्द हद्दपारीचा प्रस्ताव अधीक्षकांकडे पाठविला होता. दोन्ही आरोपी धारुर मधील रहिवासी असून चोरी, घरफोडीचे गुन्हे त्यांच्या नावावर आहेत. यासोबतच शिवाजीनगर ठाण्याचे निरीक्षक शिवलाल पुर्भे यांनी नीलेश कैलास शिंदे (रा. शाहूनगर) व युवराज सुभाष भंडारी (रा. धोंडीपुरा) यांच्यावर हद्दपारीच्या कारवाईचा प्रस्ताव दाखल केला होता. त्यांच्यावर मटका जुगाराचे गुन्हे नोंद आहेत.

स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक घनश्याम पाळवदे यांच्या पाठपुराव्यानंतर प्राप्त झालेल्या प्रस्तावांची धारुरचे उपअधीक्षक अशोक आम्ले व बीडचे उपअधीक्षक भास्कर सावंत यांनी चौकशी करुन दोन वर्षांसाठी हद्दपार करण्याची शिफारस केली होती. अधीक्षक जी. श्रीधर यांनी चारही आरोपींना जिल्ह्यातून एक वषार्साठी हद्दपार करण्याचे आदेश मंगळवारी जारी केले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीBeedबीडPoliceपोलिस