शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

बीडमधील चार महत्त्वाचे ठाणेदार अचानक बदलले; राजकीय हस्तक्षेपाची चर्चा?

By सोमनाथ खताळ | Updated: November 4, 2025 16:19 IST

गेवराई, शिवाजीनगर, बीड ग्रामीण आणि पेठबीड ठाण्यातील निरीक्षकांच्या बदल्या

बीड: जिल्ह्याच्या पोलीस दलात अचानक मोठे फेरबदल करण्यात आले असून, जिल्ह्यातील चार महत्त्वाच्या पोलीस ठाण्यांतील निरीक्षकांच्या बदल्यांमुळे चर्चा सुरू झाली आहे. काही राजकीय लोकांनी हस्तक्षेप केल्यामुळे पोलीस अधिकाऱ्यांना त्रास होत असल्याची माहिती मिळत आहे. मात्र, या बदल्यांवर स्पष्टीकरण देताना पोलीस अधीक्षकांनी संबंधित ठाणेदारांनी विनंती अर्ज केल्यामुळेच या बदल्या करण्यात आल्याचा दावा केला आहे.

या बदल्यांमध्ये चार पोलीस निरीक्षकांचा समावेश आहे. गेवराई पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रवीणकुमार बांगर यांना शिवाजीनगर पोलीस ठाण्याची जबाबदारी मिळाली आहे, तर शिवाजीनगरचे पोलीस निरीक्षक किशोर पवार यांना गेवराई पोलीस ठाण्यावर पाठवण्यात आले आहे. तसेच बीड ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मारुती खेडकर यांना पेठबीड ठाण्यात हलवण्यात आले आहे, तर पेठबीडचे पोलीस निरीक्षक अशोक मुदिराज यांना बीड ग्रामीण पोलीस ठाण्यात नियुक्त करण्यात आले आहे. अचानक झालेल्या या अदलाबदलीमुळे बीडच्या पोलीस प्रशासनात आणि स्थानिक राजकारणात चर्चेला उधाण आले आहे. बदलीचे नेमके कारण काय, याबद्दल तर्कवितर्क लावले जात आहेत.

बांगर यांचे विधानसभेत कामप्रविणकुमार बांगर यांनी विधानसभा निवडणूकीत गेवराईत बंदोबस्त केला होता. यासोबतच मराठा - ओबीसी वादही त्यांनी हाणून पाडला होता. दोन्ही समाजातील लोकांची बैठक घेत काही जणांवर प्रतिबंधात्म कारवाया केल्या. काही लोकांवर गुन्हेही दाखल केले होते. तसेच बीड ग्रामीणचे मारूती खेडकर यांचाही बीड ग्रामीण ठाण्यात जम बसला होता. आता त्यांच्या जागेवर पेठबीडमध्ये वेगवेगळ्या प्रकरणात वादग्रस्त ठरलेल्या अशोक मुदिराज यांना नियूक्त करण्यात आले आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Sudden Transfer of Four Key Police Inspectors in Beed Sparks Controversy

Web Summary : Beed police reshuffle sees four station heads transferred, fueling political interference rumors. Authorities claim transfers were due to officer requests. The changes impact Gevarai, Shivajinagar, Beed Rural, and Pethbid stations, igniting debate and speculation.
टॅग्स :BeedबीडPoliceपोलिसTransferबदली