शहरं
Join us  
Trending Stories
1
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
2
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
3
पाकिस्तानने अफगाणिस्तानातील निवासी भागाला लक्ष्य केले, सहा नागरिकांचा मृत्यू
4
अमेरिकन प्रेस सेक्रेटरीवर फिदा, 'या' देशाच्या पंतप्रधानांची मोठी ऑफर, डोनाल्ड ट्रम्पही हैराण
5
"ही आमच्यासमोरील डोकेदुखी आहे, पण..." ऑस्ट्रेलियात मैदान मारूनही असं का म्हणाला सूर्या?
6
Mumbai Local Mega Block: रविवारी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक; कधी, कुठे आणि कितीवाजेपर्यंत गाड्या बंद? वाचा
7
"भैया क्या कर रहे हो...!"; बेंगलोरमध्ये Rapido कॅप्टनच्या महिलेसोबतच्या कृत्यावर कंपनीची रिअ‍ॅक्शन
8
बिहारमध्ये रस्त्यावर सापडल्या VVPAT स्लिप्स! निवडणूक आयोगाने ARO ला निलंबित केले, FIR दाखल करण्याचे आदेश दिले
9
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
10
कारमध्ये गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड किस करत असतील तर पोलीस पकडू शकता? काय सांगतो नियम? जाणून घ्या
11
"निवडणुकीत बुडण्याची प्रॅक्टिस...!" राहुल गांधींच्या तलावातील उडीवरून पंतप्रधान मोदींचा टोला; RJD वरही निशाणा, स्पष्टच बोलले
12
Crime: विधवा भावजयीच्या प्रेमात पडला जेठ, लग्नासाठी सतत दबाव; नकार देताच अ‍ॅसिड फेकलं!
13
IND vs SA : सलग दोन सेंच्युरीसह 'या' पठ्ठ्यानं वाढवलं गिल-गंभीर जोडीचं टेन्शन; कारण...
14
आधार कार्ड काढायला घराबाहेर पडले ते परतलेच नाहीत; पेट्रोल पंप मालकाचा २ मुलींसह संशयास्पद मृत्यू
15
Hero: ड्युअल डिस्क ब्रेक्स, मल्टीपल राइडिंग मोड्स आणि बरेच काही; हिरो एक्सट्रीम १२५ आर लॉन्च!
16
Dance Bar Raid: उल्हासनगरातील चांदणी लेडीज सर्व्हिस बारवर पोलिसांची धाड, ९ महिलांसह १५ जणांना अटक
17
अरे देवा! मेट्रो स्टेशन तयार झालं पण नंतर कळालं उंचीच कमी, पुढं जे केलं ते पाहून थक्क व्हाल
18
स्टाँग रूमचे CCTV बंद, मध्यरात्री एका पिकअप व्हॅनची एन्ट्री; RJD च्या आरोपानंतर तपासाचे आदेश
19
कोण आहेत गजाला हाशमी? ज्यांनी अमेरिकेत रचला नवा इतिहास; भारताशी थेट कनेक्शन, जाणून घ्या
20
वीज चमकली की सुरू होतं काउंटडाउन!… काय आहे क्रिकेटच्या मैदानात क्वचित लागू होणारा '30:30 नियम'?

धाक दाखवून लुटणारे चौघे तासाभरात गजाआड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2018 00:41 IST

गावाकडे निघालेल्या दुचाकीस्वारांना रस्त्यात अडवून वस्तऱ्याचा धाक दाखवून त्यांच्याजवळील रोख रक्कम व मोबाईल घेऊन चौघे जण पसार झाले. दुचाकीस्वारांनी तात्काळ पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनीही तात्काळ सापळा लावून अवघ्या तासाभरातच चारही लुटारूंना बेड्या ठोकल्या.

ठळक मुद्देबीड ग्रामीण ठाण्यातून पलायनाचा अयशस्वी प्रयत्न

बीड : गावाकडे निघालेल्या दुचाकीस्वारांना रस्त्यात अडवून वस्तऱ्याचा धाक दाखवून त्यांच्याजवळील रोख रक्कम व मोबाईल घेऊन चौघे जण पसार झाले. दुचाकीस्वारांनी तात्काळ पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनीही तात्काळ सापळा लावून अवघ्या तासाभरातच चारही लुटारूंना बेड्या ठोकल्या.

शनिवारी रात्री १२ वाजता बायपास रोडवर ही घटना घडली होती. दरम्यान, बीड ग्रामीण ठाण्यात आणल्यानंतर या चारही आरोपींनी पळून जाण्याचा प्रयत्न केला होता. परंतु त्यात ते अयशस्वी ठरले.सचिन विश्वनाथ पाटोळे, सचिन हिरामन गायकवाड, किरण मोहन कसबे, नितीन संजय भालेराव [सर्व रा. रमाई चौक, खंडेश्वरी रोड, बीड] अशी आरोपींची नावे आहेत. अक्षय राऊत [रा. नांदलगाव, ता. गेवराई] हा बीडमध्ये एका किराणा दुकानावर काम करतो. शनिवारी पगार झाल्यानंतर आपल्या मित्रासह तो गावाकडे निघाला. बीड बायपासवर त्याला चौघांनी अडविले. वस्तºयाचा धाक दाखवून त्यांच्याजवळील रोख १० हजार रुपये व मोबाईल घेऊन ते पसार झाले. त्यानंतर राऊत याने तात्काळ शहर पोलीस ठाणे गाठले.

त्यानंतर पोलीस निरीक्षक सय्यद सुलेमान, पेठबीडचे पो. नि. बी. एस. बडे यांनी तात्काळ चक्रे फिरवली. अवघ्या तासाभरात त्यांनी चारही आरोपींना बेड्या ठोकल्या. ही कारवाई पोलीस अधीक्षक जी. श्रीधर, अपर अधीक्षक वैभव कलुबर्मे, उप अधीक्षक सुधीर खिरडकर, गुन्हे शाखेचे पो. नि. घनश्याम पाळवदे यांच्या मार्गदर्शनाखाली पो. नि. बडे, सुलेमान, स.पो.नि. गजानन जाधव, दिलीप तेजनकर, शीतलकुमार बल्लाळ, पी. एस. साळवे, एस. यू. अलगट, के. आर. जाधव, एल. आर. राठोड, आर. ए. पाईकराव, साजेद पठाण, नसीर शेख, अंकुश महाजन, बीड ग्रामीण, बीड शहर, पेठ बीड व गुन्हे शाखा, दरोडा प्रतिबंधक पथक यांनी केली.अन् पोलिसांनी पाठलाग करुन पकडले...!चारही आरोपींना पकडून बीड ग्रामीण पोलिसांच्या स्वाधीन केले. ठाण्यात आणल्यानंतर या चौघांनीही पळून जाण्याचा प्रयत्न केला. सुदैवाने तिघे ठाण्याच्या परिसरात ताब्यात घेतले. परंतु नितीन भालेराव हा बुंदेलपुरा भागात पळाला. येथे एका नालीत पाय अडकून पडल्याने तो पोलिसांच्या हाती लागला. पाठलाग करताना स.पो.नि. शीतलकुमार बल्लाळ हे सुध्दा किरकोळ जखमी झाले. या चौघांविरोधात शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

दुचाकीच्या क्रमांकावरुन काढला शोधरक्कम घेऊन पसार होताना अक्षयने चोरट्यांच्या दुचाकीचा नंबर लक्षात ठेवला. तोच पोलिसांना दिला. त्यामुळे पोलिसांना तपास कामात मदत झाली.

टॅग्स :BeedबीडPoliceपोलिसMarathwadaमराठवाडा