शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
5
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
6
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
7
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
8
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
9
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
10
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
11
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
12
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
13
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
14
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
15
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
16
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
17
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
18
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
19
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
20
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
Daily Top 2Weekly Top 5

बीडच्या माजी सरपंचाचा अन् व्यापाऱ्याचा तामिळनाडूत बनावट नोटांचा खेळ; मोठा साठा जप्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2026 19:25 IST

केज ते तामिळनाडू बनावट नोटांच्या रॅकेट मागे आणखी कोण? माजी सरपंचासह व्यापारी तामिळनाडूच्या पोलिसांच्या जाळ्यात, सीआयडी करणार पुढील तपास

- मधुकर सिरसटकेज (बीड) : बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील एका माजी सरपंचाने आणि कृषी पंप व्यापाऱ्याने तामिळनाडू राज्यात बनावट नोटा चालवण्याचा धाडसी पण बेकायदेशीर प्रयत्न केल्याचा खळबळजनक प्रकार उघडकीस आला आहे. तिरुचिरापल्ली जिल्ह्यातील थुवाकुडी पोलिसांनी या दोघांनाही तब्बल ८ लाख ३७ हजार ८०० रुपयांच्या बनावट नोटांसह अटक केली असून, आता या प्रकरणाचा तपास तामिळनाडूच्या गुन्हे अन्वेषण विभागाकडे (CID) सोपवण्यात आला आहे.

पेट्रोल पंपावरील त्या '२००' रुपयांनी घातला घातकेज येथील माजी सरपंच रमेश बाबुराव भांगे आणि मूळचा राजस्थानचा असलेला व्यापारी नारायण राम पटेल हे दोघे त्यांच्या खाजगी कारने (MH 44 Z 2383) तामिळनाडू दौऱ्यावर गेले होते. बुधवारी इंधन भरताना त्यांनी पेट्रोल पंपावर २०० रुपयांच्या काही नोटा दिल्या. तेथून ते निघून गेल्यावर कर्मचाऱ्याला नोटांचा स्पर्श आणि कागदावरून संशय आला. त्याने तातडीने पोलिसांना माहिती दिली आणि पोलिसांनी मंजाथिदल चेकपोस्टवर सापळा रचून ही कार अडवली.

कारमध्ये नोटांचे ४१ बंडल! पोलिसांनी कारची झडती घेतली असता अधिकारीही चक्रावून गेले. कारमध्ये २०० रुपयांच्या नोटांचे तब्बल ४१ बंडल दडवून ठेवलेले होते. एकूण ८ लाख ३७ हजार ८०० रुपयांच्या या नोटा बनावट असल्याचे स्पष्ट झाले. तपासादरम्यान या दोघांनी मदुराई, पुदुक्कोट्टई आणि तंजावर भागात यापूर्वीच अनेक नोटा चलनात आणल्याची कबुली दिली आहे.

कनेक्शन कोणाचे? या बनावट नोटा त्यांना कोणी पुरवल्या? या रॅकेटचे मुख्य सूत्रधार कोण आहेत? आणि तामिळनाडूमध्ये त्यांना कोणी आश्रय दिला होता? या प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी आता गुप्त वार्ता विभाग आणि गुन्हे अन्वेषण विभाग सक्रिय झाला आहे. या घटनेमुळे केज तालुक्यासह बीड जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Beed ex-Sarpanch, businessman caught with fake notes in Tamil Nadu.

Web Summary : Ex-Sarpanch and businessman from Beed arrested in Tamil Nadu with ₹8.37 lakh in counterfeit currency. They confessed to circulating notes in multiple cities. Investigation ongoing.
टॅग्स :Beed Crimeबीड क्राईम मराठी बातम्याTamilnaduतामिळनाडू