शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

पहिल्या जागतिक वृक्ष संमेलनाची उत्साहात झाली सुरुवात 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2020 18:59 IST

झाडे लावा - झाडे जगवा, झाडाचे गुण गाऊ, झाडाचे गुण घेऊ या ब्रीदवाक्याचा जयघोष करीत उद्घाटन

बीड : झाडे जगली तर मराठवाड्याचा वाळवंट होण्यापासून आपण रोखू शकतो. त्यामुळे झाडे लावा - झाडे जगवा, झाडाचे गुण गाऊ, झाडाचे गुण घेऊ या ब्रीदवाक्याचा जयघोष करीत गुरुवारी ( दि. १३)  जगातील पहिल्या वृक्ष संमेलनाचे थाटात उद्घाटन बीड शहराजवळील पालवणच्या ‘सह्याद्री देवराई’ येथे झाले.

यावेळी ज्यांच्या संकल्पनातून देवराई उभी राहिली ते सिने अभिनेते सयाजी शिंदे, लेखक अरविंद जगताप, जिल्हाधिकारी राहुल रेखावार, आ. संदीप क्षीरसागर, नगराध्यक्ष डॉ. भारतभूषण क्षीरसागर, जिल्हा परिषदेचे सीईओ अजित कुंभार, विभागीय वन अधिकारी मधुकर तेलंग, सामाजिक वनीकरण विभागीय वन अधिकारी अमोल सातपुते, कृषी भूषण शिवराम घोडके यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते. संमेलनात विद्यार्थ्यांची संख्या लक्षणीय होती. तसेच बीड व इतर शहरातून आलेल्या पर्यावरण प्रेमींनी देखील उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

अध्यक्षस्थानी आहे वडाचे झाड दरम्यान, या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वडाचे झाड होते. यावेळी त्याचे मनोगत सयाजी शिंदे यांनी व्यक्त केले. यात वडाचा जन्म, त्याची झालेली कत्तल, झाडे नसतील तर मानवावर होणारा परिणाम, भविष्यात पर्यावरणाचा धोका याविषयी परखड मत व्यक्त केले. 

काष्ठशिल्पांचे प्रदर्शन ठरले लक्षवेधक  संमेलनात विविध प्रकारचे आकर्षक असे स्टॉल लावण्यात आले आहेत.  यातील ‘काष्ठशिल्पाच्या प्रदर्शनाचा स्टॉल सर्वांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला. हे काष्ठशिल्प नैसर्गिक असून, राज्यभरातील डोंगरदऱ्या व जंगलातून निवडण्यात आले आहे. 

खरी श्रीमंती झाडासाठी काम करणेखरी श्रीमंती झाडासाठी काम करणे आहे, झाडांची संख्या म्हणजे खरी संपत्ती आहे. प्रत्येकाने आपल्या गावात पाच-पाच झाडे लाऊन त्याची जोपासना करावी. - सयाजी शिंदे, अभिनेते

टॅग्स :environmentपर्यावरणBeedबीडsayaji shindeसयाजी शिंदेpollutionप्रदूषण