शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

चारा छावण्यांचा आर्थिक ताळमेळ जुळेना !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2019 00:58 IST

छावण्या चालविताना होणारा खर्च व मिळणारे अनुदान याचा ताळमेळ बसविताना छावणी चालक मेटाकुटीला आले आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कगेवराई : राज्य शासनाने दुष्काळी संकटातून बळीराजाला दिलासा मिळावा म्हणून चारा छावण्या सुरू केल्या; मात्र, छावणी सुरू करण्यास विलंब लावून ती चालवण्यासाठी इच्छुक असलेल्यांना तीन महिने हेलपाटे मारायला लावत त्या सुरु करण्याची परवानगी गत महिन्यात देण्यात सुरूवात केली. आता याच छावण्या चालविताना होणारा खर्च व मिळणारे अनुदान याचा ताळमेळ बसविताना छावणी चालक मेटाकुटीला आले आहेत. वाढीव खर्च पाहता ‘चार आण्याची कोंबडी अन् बारा आण्याचा मसाला’ अशीच परिस्थिती छावणी चालकाची होत असल्याचे दिसून येत आहे.छावणी सुरू करण्याचा निर्णय झाल्यानंतर प्रत्यक्षात त्या सुरू करण्यास खूप विलंब झाला. छावणी सुरू करण्याचा प्रस्ताव सादर करताना कागदपत्रांची जमवाजमव करण्यासाठी इच्छूक छावणी चालकांची पळापळ झाली. अनेकदा काढण्यात येणाऱ्या त्रुटी पूर्ण करून छावण्या सुरू करण्यास मंजुरी देण्यात आली. मात्र, छावणी सुरू करण्यासाठी घालण्यात आलेल्या अटी व शर्ती पूर्ण केल्याची खात्री केल्याशिवाय छावण्या सुरू करण्यास परवानगी देण्यात आली नाही. नियमानुसार सर्व बाबी पूर्ण केल्यावरच छावण्या सुरू करण्यास परवानगी देण्यात आली.मात्र, त्यानंतर छावणी चालवण्यासाठीचा खर्च व मिळणारे अनुदान याचा ताळमेळ घालताना छावणी चालकाची कसरत होऊ लागली आहे. चारा व पाणी याची खरेदी, वाहतूक खर्च वाढला. गेवराई तालुक्यात गत तीन-चार वर्षांपासून समाधानकारक पाऊस न झाल्याने ऊस, मका पीक सध्या उपलब्ध नाही. जालना जिल्ह्यातून चारा आणताना खरेदी, तोडणी, भरणी वाहतूक व खाली करणे आदी खर्चात वाढ झाली.तसेच तालुक्यात ग्रामीण भागात पाणी उपलब्ध नसल्याने ४० ते ५० किलोमीटरवरुन पाणी आणावे लागत आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात खर्च होत आहे. शेडनेटच्या सावलीतील जनावरांना कडबा कुट्टीच्या मदतीने बारीक केलेला चारा देण्यासाठी वीजपुरवठ्यावर अवलंबून राहावे लागत आहे. छावणीतील प्रत्येक गोष्ट सीसीटीव्हीच्या देखरेखीखाली करायची असल्याने वीजपुरवठा अत्यावश्यक झाला आहे.जनावरांसाठी " १०० अनुदान देत आहे. जनावराला पूर्वी १५ किलो चारा देण्यात येत होता पण आता त्यात वाढ करून तो १८ किलो करण्यात आला आहे. होणारा खर्च " १३१ असला तर अनुदान " १०० असल्याने छावणी चालक मेटाकुटीला आले आहेत. शासन प्रत्येक जनावरास ४० लिटर पाणी द्या असे सांगते पण भयंकर उन्हाळयामुळे सरासरी प्रत्येक जनावरास ७० लिटर पाणी द्यावे लागते.

टॅग्स :droughtदुष्काळFarmerशेतकरी