धारुर : परळी तालुक्यातील पोहेनेर जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील सहशिक्षक सतीश कांदे यांचे कर्तव्यावर असताना ११ मे रोजी कोरोनाने निधन झाले होते. या कुटुंबास बीड जिल्हा शिक्षक भारती परिवाराच्या वतीने कांदे यांच्या कुटुंबास ६२ हजारांचा मदतीचा धनादेश प्रदान केला.
कोरोना महामारीत मिशन झिरो डेथ अंतर्गत कुटुंबाचा सर्व्हे करीत असताना परळी तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पोहनेर येथील सहशिक्षक सतीश दगडू कांदे यांना कोरोनाचा संसर्ग झाला. त्यांच्यावर उपचार सुरू असताना ११ मे २०२१ रोजी त्यांची प्राणज्योत मालवली. कांदे कुटुंबीयास मदत म्हणून बीड जिल्ह्यातील शिक्षक भारतीच्या वतीने निधी गोळा करून ६२ हजार १४३ रुपयांचा धनादेश त्यांची पत्नी, मुलगा व कुटुंबीयास देऊन आर्थिक मदत करण्यात आली. यावेळी शिक्षक भारतीचे शिलेदार गाडगे, बाबासाहेब तिडके, शेषराव राठोड, अरुण जाधव, शहाजी केसकर, गणेश राठोड यांची उपस्थिती होती.