शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

अखेर २४ तासानंतर सापडला तलावात बुडालेल्या अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्याचा मृतदेह

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 20, 2024 14:06 IST

याच आठवड्यात तरुण पुन्हा पुण्याला जाऊन कॉलेज सुरू करणार होता, त्यापूर्वीच काळाने घातला घाला

परळी : तालुक्यातील भोपळा येथील तलावात पोहताना बुडालेल्या इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्याचा मृतदेह आज, २० जून रोजी सकाळी आठच्या सुमारास तलावात सापडला. गणेश माणिकराव फड ( २२) असे मृत युवकाचे नाव आहे. परळी नगरपालिकेच्या नैसर्गिक आपत्ती निवारण विभागाच्या पथकाच्या शोध मोहिमे दरम्यान मृतदेह आढळून आल्यानंतर उपजिल्हा रुग्णालयात उत्तरिय तपासणी करण्यात आली. दरम्यान, दुपारी कन्हेरवाडी येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.

परळी तालुक्यातील कन्हेरवाडी येथील गणेश माणिकराव फड हा पुणे येथे  इंजिनिअरिंगचे शिक्षण घेत होता. गेल्या पंधरा दिवसांपूर्वी सुटीमुळे तो कन्हेरवाडी येथे आपल्या गावी आला होता. दोन-चार दिवसांनी पुण्याला परत जाणार होता. दरम्यान, बुधवारी, १९ जून रोजी सकाळी ८ वाजेच्या सुमारास गणेश मित्रासोबत भोपळा येथील तलावात पोहण्यासाठी गेला होता. पोहत असताना अचानक तो बुडाला. 

याची माहिती मिळताच पालिकेच्या नैसर्गिक आपत्ती निवारण व अग्निशमन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी दिवसभर गणेशचा तलावात शोध घेतला. परंतु त्याचा शोध लागला नव्हता. आज सकाळी ७ वाजता पुन्हा तलावात नप कर्मचाऱ्यांनी शोध मोहीम सुरू केली. अखेर आठ वाजेच्या सुमारास गणेशचा मृतदेह आढळून आला. येथील उपजिल्हा रुग्णालयात मृतदेहाची उत्तरिय तपासणी करण्यात आली. त्यानंतर कन्हेरवाडी येथील स्मशानभूमी अंत्यसंस्कार करण्यात आले. गणेशच्या पश्यात आई, वडील, एक लहान भाऊ आहे. 

तलावात पोहणे टाळावे भोपळा तलावात पाणी भरपूर आहे त्याची  खोली समजून येत नाही. पोहता न येणाऱ्या व अर्धवट पोहता येणाऱ्यांनी भोपळा तलावात पोहण्यास जाण्याचे टाळावे असे आवाहन परळी चे तहसीलदार व्यंकटेश मुंडे यांनी केले आहे.

टॅग्स :Beedबीडdrowningपाण्यात बुडणेDeathमृत्यू