शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीत अजित पवार गटावर पैसे वाटल्याचा आरोप; रोहित पवारांचा दावा, Video दाखवले
2
कांदा निर्यातबंदीची मोठी किंमत मोजावी लागली; राज्यातील शेतकऱ्यांना एकरी तीन लाखांचा फटका
3
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात
4
‘घर की बिटीया’ राजकीय आखाड्यात; अखिलेश यादवांची मुलगी प्रचाराच्या मैदानात... वेधतेय लक्ष...
5
आजचे राशीभविष्य - ७ मे २०२४; आर्थिक लाभाची शक्यता, विवाहेच्छुकांना योग्य जोडीदार मिळण्याची संभावना
6
भाजपचे २० ते २५ आमदार फोडण्याचे उद्धव ठाकरे यांचे कारस्थान होते; एकनाथ शिंदे यांचा गौप्यस्फोट
7
भारत-पाकिस्तान करायला ही काय क्रिकेटची मॅच आहे का? रमेश चेन्निथलांचा भाजपला सवाल
8
गुजराती सोसायटीत मराठी कार्यकर्त्यांना प्रचारास मज्जाव; 'आम्ही भाजपलाच मतदान करणार'
9
कितीही असाे तापमानाचा पारा; गाजवा तुमच्या मतदानाचा तोरा
10
याला म्हणतात घबाड! मंत्र्याच्या पीएचा नोकर, पगार फक्त १५ हजार; घरात ३० कोटींचा ढीग
11
काहीही करा, पण मतदानाची टक्केवारी वाढवा; अन्यथा कारवाईस तयार रहा, भाजपश्रेष्ठी धास्तावले
12
दहशतवाद्यांवर २० लाखांचे बक्षीस, दोन संशयित दहशतवाद्यांची रेखाचित्रे जारी; शेकडो जवानांकडून शोधमोहीम
13
ठाकरे गट व महायुती कार्यकर्त्यांत वाद; उज्वल निकमांचा प्रचार करतानाचा प्रसंग
14
साधनसंपत्ती तरीही लोक राहिले गरिब; ओडिशात पंतप्रधान माेदींचा हल्लाबाेल
15
कोणत्या भागातून किती लीड मिळते, त्यावर महापालिकेसाठी उमेदवार ठरविले जातील
16
गृहकर्ज थकबाकी वाढली १० लाख कोटी रुपयांनी; रिझर्व्ह बँकेच्या अहवालातून उघडकीस
17
मराठी मते भाजपच्या पारड्यात की काँग्रेसच्या? दोन्ही उमेदवारांना लोकसभा निवडणूक लढवण्याचा अनुभव नाही
18
रशिया अण्वस्त्रांसह लष्करी सराव करणार; अमेरिकेसह पश्चिमी देशांना दिला इशारा
19
न होणाऱ्या प्रवासाची तिकिटे विकली प्रवाशांना; विमान कंपनीला ७.९ कोटी डॉलरचा दंड
20
ऑर्डर्स वाढल्या, नोकऱ्या मिळाल्या; सेवा क्षेत्रात तेजीचा १४ वर्षांचा उच्चांक, खासगी क्षेत्राचाही विस्तार

वैद्यकीय अधिक्षक साबळे विरोधात न्यायालयाच्या आदेशाने अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2018 6:47 PM

ग्रामीण रूग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. सुरेश साबळे यांच्या विरोधात अतिक्रमण करणे, मारहाण करून जीवे मारण्याची धमकी देत जातीवाचक शिवीगाळ दिल्याप्रकरणी न्यायालयाच्या आदेशावरून आज अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला.

माजलगाव (बीड ) : ग्रामीण रूग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. सुरेश साबळे यांच्या विरोधात अतिक्रमण करणे, मारहाण करून जीवे मारण्याची धमकी देत जातीवाचक शिवीगाळ दिल्याप्रकरणी न्यायालयाच्या आदेशावरून आज अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणी उपविभागीय पोलिस अधिकारी भाग्यश्री नवटके या पुढील तपास करत आहेत. 

शहरापासुन जवळच असलेल्या खानापुर येथे बाळासाहेब पौळ यांचे घर आहे. त्यांच्या समोरील भागात  ग्रामीण रूग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. सुरेश साबळे यांचे हॉस्पिटल आणि घर आहे. पौळ यांच्या फिर्यादीनुसार, १४ डिसेंम्बर २०१७ पासून १५ जानेवारी २०१८ या कालावधीत साबळे यांनी त्यांचे राहते घर विक्री करावे या उद्देशाने वेळोवेळी अत्याचार केले. खानापूर भागात तेरा व चौदा नंबरचे प्लॉट त्यांच्या मालकीचे आहेत. त्यापैकी १३ न. प्लॉटवर डॉ. साबळे याने अतिक्रमण केले होते. पौळ हे आपणास प्लॉट विक्री करत नसल्याने डॉ. साबळे त्यांच्या रुग्णालयातील वैद्यकीय कचरा, शस्त्रक्रियेनंतरची घाण, खराब पाणी अतिक्रमण केलेल्या प्लॉट मध्ये टाकत. याविषयी पौळ यांनी डॉ. साबळे यांना विचारणा केली त्यांनी गुंडांना सोबत घेऊन घरात घुसून लाथा बुक्याने मारहाण केली. यासोबतच जातीवाचक शिवीगाळ करत त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली

यावरून पौळ यांनी माजलगाव शहर पोलीस ठाण्यात तक्रार देऊनही डॉ. साबळेवर कसल्याही प्रकारचा गुन्हा नोंदविला नाही. यामुळे पौळ यांनी न्यायालयात धाव घेतली. यानुसार अप्पर सत्र न्यायालयाने  गुरुवारी (दि.१५) डॉ. साबळे यांच्या विरुद्ध भादवी कलम अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंध कायदा १९८९ चे कलम ३(२)(४)(५)(१०)(१५) भाद्विचे कलम ४५२,३२३,५०४,५०६, न्यायालय आदेशाने १५६(३)सी आर पी सी प्रमाणे गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. यानुसार आज शहर पोलिसात त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणी पुढील तपास उपविभागीय पोलिस अधिकारी भाग्यश्री नवटके या करत आहेत.