शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

अंबाजोगाईनजीक बायोफ्युएल प्रकल्पास भीषण आग; लाखोंचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2019 15:30 IST

नादुरुस्त असल्याने अंबाजोगाई अग्निशमन विभागाच्या गाड्या आग विझविण्यासाठी असमर्थ ठरत आहेत.

अंबाजोगाई (बीड ) : शहरापासून जवळच असलेल्या पिंपळा धायगुड येथील श्रीनिवास बायोफ्युएल प्रकल्पास सोमवारी मध्यरात्री भीषण आग लागली. अग्निशमन दलाचे तीन बंब आग विझविण्यासाठी अथक प्रयत्न करत असूनही अद्याप आग आटोक्यात आलेली नाही.

अंबाजोगाई येथील अतुल हराळे यांचा पिंपळा धायगुड येथे अहमदपूर रोडवर गट क्र. २६४ मध्ये ‘श्रीनिवास बायोफ्युएल’ प्रकल्प आहे. विविध कारखान्यातील बॉयलरसाठी लागणारे ‘बायोब्रिकेट’ या ठिकाणी तयार केले जातात. सोमवारी मध्यरात्री अचानक या प्रकल्पात आग लागली. जवळच प्रकल्पासाठी लागणारा कच्चा माल आणि ज्वलनशील उत्पादित माल असल्याने थोड्याच वेळात आगीन रौद्र रूप धारण केले. अंबाजोगाई येथील अग्निशमन दलाच्या कुचकामी झालेल्या गाडीवर आग आटोक्यात येणे शक्य नसल्याने परळी आणि धारूर येथील दलालाही पाचारण करण्यात आले. तरीदेखील मध्यरात्रीपासून अथक परिश्रम घेऊनही अद्याप आग धुमसतच आहे.

सध्या आणखी दोन ठिकाणच्या अग्नीशमन दलांना बोलाविण्यात आले असून त्यानंतर या आगीवर नियंत्रण मिळवता येऊ शकेल. दरम्यान, ही आग कशामुळे लागली हे अद्याप स्पष्ट झाले नसले तरी त्यामागे शॉर्ट सर्किट हे कारण असू शकते असा संशय व्यक्त करण्यात येत आहे. या आगीमुळे आतापर्यंत लाखों रुपयांचे नुकसान झाल्याचे बोलले जात आहे.सुदैवाने या आगीत जीवितहानी झाली नाही. 

अंबाजोगाईचे अग्निशमन दल कुचकामी :अंबाजोगाई नगर परिषदेच्या अग्निशमन दलासाठी दोन बंब मंजूर आहेत. या गाड्यात सध्या अनेक तांत्रिक अडचणी आहेत. त्यांची नियमित देखभाल होत नाही. गाड्यांचे टायर खराब झाले असून स्टेपनी देखील नाही. पाणी मारण्याच्या गन देखील खराब झाल्या आहेत. पाईप आखूड असल्याने दूरपर्यंत पाण्याचा मारा करता येत नाही. तसेच, इंजिनमधेही बिघाड असल्याने गाडी हळू धावते. त्यामुळे या गाड्या आग विझविण्यासाठी असमर्थ ठरत आहेत. अचानक काही दुर्घटना घडली तर या कुचकामी अग्निशमन दलामुळे मोठे नुकसान आणि जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. याच दलाने काही वर्षापूर्वी शहरात घडलेल्या आगीच्या दुर्घटनात लक्षणीय कामिगिरी केली होती. मात्र, मागील एक-दोन वर्षात या विभागाचा बोजवारा उडाला आहे.

टॅग्स :fireआगAmbajogaiअंबाजोगाईbusinessव्यवसायBeedबीड