शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

ई-लर्निंगसाठी अंगठी मोडणार्‍या शिक्षकाचा अंगठ्या देऊन सत्कार; मराठवाडा साहित्य संमेलनाचे ठरले आकर्षण 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2017 14:08 IST

स्वत:ची अंगठी मोडून व भविष्य निर्वाह निधीची रक्कम कर्ज स्वरूपात घेऊन शाळा ई-लर्निंग करणार्‍या देठेवाडी येथील शिक्षक रवींद्र गायकवाड यांचा सत्कार २ अंगठ्या देऊन करण्यात आला. हा विशेष सत्कार हे या मराठवाडा साहित्य संमेलनाचे आकर्षण ठरले.

अंबाजोगाई : ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना, तेही जिल्हा परिषदेतील शाळेत ई-लर्निंगची सुविधा मिळाली पाहिजे, या उद्देशाने स्वत:ची अंगठी मोडून व भविष्य निर्वाह निधीची रक्कम कर्ज स्वरूपात घेऊन शाळा ई-लर्निंग करणार्‍या देठेवाडी येथील शिक्षक रवींद्र गायकवाड यांचा सत्कार २ अंगठ्या देऊन करण्यात आला. हा विशेष सत्कार हे या संमेलनाचे आकर्षण ठरले.

वडवणी तालुक्यातील देठेवाडी ही दोन शिक्षकांची शाळा. रवींद्र गायकवाड हे शाळेचे मुख्याध्यापक ध्येयवेडे शिक्षक आहेत. ऊसतोड कामगारांच्या मुलांची ही शाळा. या शाळेतील विद्यार्थ्यांना गरिबीमुळे व शासनाच्या निधीअभावी ई-लर्निंगचे शिक्षण व टॅब कसे मिळणार? ही समस्या गायकवाड गुरुजींना भेडसावू लागली. त्यांनी मागचा पुढचा विचार न करता स्वत:च्या लग्नात सासरवाडीकडून मिळालेली अंगठी मोडली.

या अंगठीतूनही ई-लर्निंगचा खर्च निघेना म्हणून त्यांनी भविष्य निर्वाह निधीची ५० हजारांची रक्कम कर्जरूपी उचलली व या माध्यमातून शाळा ई-लर्निंग केली. प्रत्येक विद्यार्थ्यांना टॅब दिले. इतकेच नाही तर देठेवाडीची शाळा मुख्य रस्त्यापासून पाच किलोमीटर अंतरावर दूर होती. या शाळेला जायला डोंगरदर्‍याचा रस्ता. गायकवाड गुरुजी शाळेत जाता-येता रस्त्यावरील दगड उचलून दूर करण्याचे काम करीत. 

या ध्येयवेड्या शिक्षकाची कहाणी जिल्हा परिषदेचे शिक्षण सभापती राजेसाहेब देशमुख यांच्यासमोर आली आणि त्यांनी आजच्या साहित्य संमेलनात रवींद्र गायकवाड यांचा सपत्नीक भरपेहराव आहेर करून उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सत्कार केला. एक अंगठी विद्यार्थ्यांसाठी मोडणार्‍या या गुरुजींना यावेळी दोन अंगठ्या भेट देऊन  त्यांचा गौरव करण्यात आला. या विशेष सत्काराने उपस्थित सर्वच पाहुण्यांनी गायकवाड गुरुजींच्या कार्याचा गौरव सातत्याने आपल्या भाषणातून केला.

टॅग्स :Marathwada Sahity Sammelanमराठवाडा साहित्य संमेलनBeedबीडliteratureसाहित्य