पुरूषोत्तम करवा/ माजलगाव: बीड जिल्ह्यातील माजलगावमधून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. शहरापासून एक किमी अंतरावर असलेल्या खानापूर येथील गोपाळ कांबळे नावाच्या व्यक्तीने आपल्या 21 वर्षीय मुलाच्या डोक्यात कुराडीचा दांडा मारुन खून केल्याची घटना रविवारी सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास घडली. रोहीत कांबळे, असे या मृत मुलाचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, खानापूर येथील गोपाळ कांबळे यांची घरगुती वादामुळे मुलाशी कुरबुर झाली होती. ही कुरबुर सुरू असताना बापाने बाजूला असलेला कुऱ्हाडीचा दांडा घेऊन मुलाच्या डोक्यात घातला. या घटनेत मुलगा रोहित जागीच मरण पावला. त्याला आजूबाजूच्या लोकांनी तातडीने खाजगी रुग्णालयात नेले, मात्र डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. याबाबत शहर पोलिसांना कळवल्यानंतर त्यांनी घटनास्थळी भेट दिली.