धारूर : येथील गुरू राघवेंद्र जिनिंगवर शासकीय कापूस खरेदी आठवड्यात फक्त एक दिवस सुरू असल्याने शेतकरी वैतागून गेले आहेत. या परिस्थितीला कंटाळून एका शेतकºयाने कापसाच्या गंजीवर चढून कपूस खरेदी होत नसल्याने आत्महत्येचा प्रयत्न केला. याच वेळी शेतक-यांनी रस्त्यावर येऊन आंदोलन सुरू केले. सदरील शेतक-यास समजावून सांगत त्याचे माप घेऊन त्याला पाठवून देण्यात आले. ही घटना शहरात समजताच प्रशासकीय अधिकारी केंद्रावर पोहचले व त्यांनी परिस्थिती नियंत्रणात आणत सर्व शेतक-यांच्या कापूस मापाची सोय केली.धारूर तालुक्यात आठवड्यात फक्त तीन दिवस शासकीय कापूस खरेदी प्रत्येक जिनिंगवर एक दिवस करण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. यामुळे शेतकरी त्रस्त झाले असून, आठ -आठ दिवस कापूस केंद्राबाहेर मापासाठी वाट पाहण्याची वेळ येत आहे. धारूर येथील गुरू राघवेंद्र्र जिनिंगवर तीन दिवसांपासून शेतकरी वाहने घेऊन उभे आहेत. बुधवारी रात्री काही वाहने मध्ये घेऊन त्यातील कापसाचे माप करण्यात आले. मात्र, वाहनातून कापूस काढण्यात आला नाही. जिनिंगबाहेर ५० पेक्षा जास्त वाहनांची रांग होती. गुरूवारी सकाळी शेतकरी संतप्त झाले. एक शेतकरी आपली कापूस खरेदी केली नाहीतर आत्मदहन करू असे म्हणत कापसाच्या गंजीवर चढला. इतर शेतक-यांनी समज काढून त्याला खाली उतरवले. यानंतर इतर शेतक-यांनी रस्त्यावर उतरून कापूस खरेदीसाठी आंदोलन सुरू केले. त्यानंतर प्रशासन खडबडून जागे झाले. प्रशासकीय अधिकारी पोहचण्या अगोदर सदरील शेतक-याचे समाधान करून तेथून पाठवून देण्यात आले. त्याचे नाव समजले नाही. दरम्यान, इतर शेतकरी रस्त्यावर बसून आंदोलन करीत होते.अधिका-यांशी चर्चा : परिस्थिती नियंत्रणातघटनेची माहिती मिळताच तहसीलदार व्ही. एस. शेडोळकर, नायब तहसीलदार रामेश्वर स्वामी, पोलीस निरीक्षक विश्वनाथ नाईकवाडे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव दत्ता सोळंके हे संबंधित जिनिंगवर पोहचले. पणन महासंघाच्या अधिका-यांशी चर्चा करुन तात्काळ कापूस खरेदी करण्यास भाग पाडले. त्यानंतर परिस्थिती नियंत्रणात आली.
कापूस खरेदीला कंटाळून शेतकऱ्याचा आत्महत्येचा प्रयत्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2020 00:04 IST
धारूर : येथील गुरू राघवेंद्र जिनिंगवर शासकीय कापूस खरेदी आठवड्यात फक्त एक दिवस सुरू असल्याने शेतकरी वैतागून गेले आहेत. ...
कापूस खरेदीला कंटाळून शेतकऱ्याचा आत्महत्येचा प्रयत्न
ठळक मुद्देशेतकऱ्यांचे आंदोलन : धारूर येथील गुरू राघवेंद्र जिनिंगवर घडलेला प्रकार