शहरं
Join us  
Trending Stories
1
'...तर इराणचे पॉवर प्लांट नष्ट करू', पाकिस्तानमधील शांतता बैठकीपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
Video: "घुसखोर निघाला ना, तर तुला इथूनच उचलून घेऊन जाईन", म्हाडाचे उपाध्यक्ष IAS संजीव जयस्वाल यांची रहिवाशाला दमबाजी; व्हिडीओ व्हायरल
3
चाकूर हादरले; गायब दोघा चिमुकल्या भावंडांपैकी एकाचा मृतदेहच आढळला!
4
शतकासाठी नव्हे आम्ही संघासाठी खेळतो! प्रियांश-कूपर जोडीचा सुपर हिट शो; एका डावात अनेक विक्रम
5
ट्रम्प पाकिस्तानात येणार? इस्लामाबादमध्ये कडेकोट सुरक्षा; अमेरिका-इराण चर्चेच्या पार्श्वभूमीवर ‘लॉकडाऊन’सारखी स्थिती
6
पापणी लवते न लवते तोच... 'खेळ खल्लास!' Dhruv Jurel च्या स्टंपिंगला 'क्रिकेटच्या देवा'नंही दिली दाद
7
Bigg Boss Marathi 6: 'हा' स्पर्धक गेला घराबाहेर! ग्रँड फिनालेच्या सुरुवातीलाच मोठा धक्का
8
फटाक्याच्या कारखान्यात भंयकर स्फोट, १९ कामगारांचा तडफडून मृत्यू, ६ जण होरपळले
9
नातं रक्ताचं नाही तर मनाचं! पत्नीचं दुसऱ्यावर जडलं प्रेम; पतीनेच पुढाकार घेऊन प्रियकरासोबत रवाना केलं!
10
अकोला, वर्धा देशात सर्वाधिक ‘हॉट’; पार ४५ अंश सेल्सिअसवर पारा
11
Solapur Crime: 'तुम्ही येथून निघून जा म्हणायचा', मृतदेह सापडलेल्या मल्हारीचा बहिणीनेच आवळला गळा; हत्येचे बिंग कसे फुटले?
12
RR चे 'धुरंधर' चक्रवर्तीच्या चक्रव्यूहात फसले! मग रिंकूचा फिनिशर अवतार दिसला अन् KKR अखेर जिंकले
13
"ट्रम्प कोण ठरवणारे?" पेजेशकियान यांचा थेट सवाल; अणुकार्यक्रमावरून अमेरिका-इराण पुन्हा आमनेसामने
14
Anushka Sharma ची टीम इंडियात एन्ट्री; पदार्पणाच्या सामन्यात चौथ्या क्रमांकवर बॅटिंगला आली अन्...
15
Google Chrome वापरताय? सावधान! एका क्लिकमध्ये हॅक होऊ शकतो तुमचा संगणक
16
KKR vs RR : जोफ्रा आर्चरची अनोखी 'हॅटट्रिक'! मोहम्मद शमीच्या विक्रमाशी बरोबरी
17
काय सांगता..! तब्बल 400KM रेंज; 'या' कंपनीने लॉन्च केली दमदार EV स्कूटर, जाणून घ्या किंमत
18
भर वाळवंटात इलेक्ट्रिक कार टेस्लाची बॅटरी संपली, मग 'या' पठ्ठ्यानं असा केला जुगाड; वाचा थरारक अनुभव
19
दोन तेल जहाजांना इराणने पाठवले परत, होर्मुझ सामुद्रधुनीत आयआरजीसीकडून पुन्हा नाकेबंदी
20
२६४ धावांची खेळीच नाही..., तर रोहित शर्माचा हा 'विराट' विश्वविक्रम मोडणंही जवळपास अशक्यच, कधीतरीच घडतो असा 'चमत्कार'!
Daily Top 2Weekly Top 5

पिके वाचवण्यासाठी शेतकऱ्यांची धावपळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:41 IST

------------------------------ युवकांनी माळरानावर केले वृक्षारोपण अंबाजोगाई : तालुक्यातील डोंगरावर व मोकळ्या जागेत येथील वृक्षप्रेमी युवकांनी गावातील निसर्गाचा समतोल राखण्यासाठी ...

------------------------------

युवकांनी माळरानावर केले वृक्षारोपण

अंबाजोगाई : तालुक्यातील डोंगरावर व मोकळ्या जागेत येथील वृक्षप्रेमी युवकांनी गावातील निसर्गाचा समतोल राखण्यासाठी सुमारे २०० वृक्षांची लागवड केली आहे. मागील काही दिवसांपासून निसर्गाचे संतुलन बिघडले आहे. या वृक्षांचे संवर्धन करण्याचा संकल्पही युवकांनी केला.

--------------------------

लसीकरणाकडे कल

अंबाजोगाई: सुरुवातीच्या काळात कोरोना लसीकरणाबाबत नागरिकांच्या मनात गैरसमज होते. मात्र आता हे गैरसमज दूर झाले असून नागरिकांकडून लस घेण्यासाठी केंद्रावर गर्दी करण्यात येत आहे.

---------------------------

शेतकऱ्यांचे डोळे लागले आभाळाकडे

अंबाजोगाई : मृग नक्षात्राच्या सुरुवातीला पावसाची चांगली सुरुवात झाल्यानंतर शेतकऱ्यांनी खरिपाची पेरणी कली. परंतु त्यानंतर पावसाने दांडी मारल्याने जमिनीतून वर आलेले पिके सुकू लागल्याने, अंबाजोगाई व परिसरातील शेतकऱ्यांचे डोळे आकाशाकडे लागले आहेत.

--------------------------

वन्यप्राण्यांपासून पिकांचे नुकसान

अंबाजोगाई : सध्या सर्वत्र चांगला पाऊस पडत असल्यामुळे पिकेसुद्धा चांगली आहेत. मात्र, या पिकांना वन्य प्राण्यांचा धोका निर्माण होत आहे. हरिणांचा मोठ्या प्रमाणात उपद्रव वाढल्यामुळे शेतकरी त्रस्त झाले आहेत. घाटबोरी परिसरातही वन्यप्राण्यांपासून पिकांचे नुकसान होण्याचे प्रमाण वाढले आहे.

-----------------------------

निधी वितरणात अडचणी

अंबाजोगाई : पंधराव्या वित्त आयोगातील निधी वितरणासाठी काही ग्रामपंचायतींना अडचणी येत आहेत. कोरोनामुळे अनेक ग्रामपंचायतींना गावातील विकासकामांसाठी यापूर्वीही निधी मिळालेला नाही. त्यात आता तांत्रिक-अडचणींमुळे निधी वितरणास खोड निर्माण होत आहे.

-------------------------------

बँकांसमोरील ग्राहकांची गर्दी कायम

अंबाजोगाई : बँकेसमोर ग्राहकांची गर्दी होऊ नये, यासाठी वेगवेगळे उपाय केल्यानंतरही शहरातील राष्ट्रीयीकृत बँकांसमोर ग्राहकांची गर्दी कायम असल्याचे पाहणीत दिसून आली. खात्यावर जमा झालेले अनुदान, शिष्यवृत्तीची रक्कम, नवीन खाते उघडणे अशा विविध कारणांसाठी ग्राहक बँकेमध्ये गर्दी करीत आहेत. त्यामुळे बँक प्रशासनाने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सतर्कता बाळगणे गरजेचे आहे.

--------------------------------

उद्योगांची निर्मिती करावी

अंबाजोगाई : दिवसेंदिवस बेरोजगारीचे प्रमाण वाढत आहे. त्यातच आता लॉकडाऊनमुळे बेरोजगारांमध्ये नैराश आले आहे. ग्रामीण भागात रोजगाराच्या पुरेशा सोयी उपलब्ध नसल्यामुळे युवकांमध्ये निराशा पसरत आहे. तालुक्यात रोजगाराची कोणतीही साधने नाहीत. उद्योगांचा अभाव आहे. त्यामुळे शेतीवर आधारित लघु उद्योगांची उभारणी करावी, अशी मागणी देवळा येथील श्रमकरी ग्रुपचे रवींद्र देवरवाडे यांनी केली आहे.