खरीप पीक कर्ज हे शेतक-यांच्या हक्कचे असून सुध्दा सेंट्रल बॅंक ऑफ इंडिया शाखा धानोरा यांनी शेतक-यांच्या पिक कर्ज फाईल्स नामंजूर केल्या आहेत. वेळोवेळी विनंती करून सुद्धा शेतकऱ्यांना चकरा मारण्यास लावणाऱ्या बॅकेवर शेकडो शेतकऱ्यांसह सामाजिक कार्यकर्ते परमेश्वर घोडके हे २९ डिसेंबर रोजी सकाळी अकरा वाजता संभुळ आंदोलन करणार आहेत.
याविषयी सविस्तर माहिती अशी की सदर बॅंक अंतर्गत येणाऱ्या किमान वीस ते पंचवीस गावातील शेतकऱ्यांनी बँकेत पिक कर्ज फाईल्स जमा केल्या होत्या. कितेक शेतकऱ्यांच्या खात्याला होल्ड करून विनाकारण मनमानी चालू आहे. शेकडो शेतकरी कर्जमाफीत बसुन सुद्धा अद्याप सातबारावर बोजा व कर्ज तसेचं आहे. कांही रक्कम त्याच्या खात्यावर जमा केली की मगं मात्र होल्ड निघतो. जुन्या कर्जदारास सुद्धा अद्याप खरिपचे पिककर्ज नवे जुने केलेच नाही.