शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

एसबीआयसमोर शेतकऱ्यांचे धरणे आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2020 23:22 IST

बॅँकेतील कामकाज, व्यवहार मराठी भाषेत करावा, अवाजवी व्याजाची आकारणी तसेच नोटीस खर्च व दंडाची वसुली करु नये या व अन्य मागण्यांसाठी शेतकरी संघर्ष समितीचे गंगाभिषण थावरे यांच्या नेतृत्वाखाली शुक्रवारी येथील एसबीआयच्या क्षेत्रीय कार्यालयासमोर शेतकऱ्यांनी धरणे आंदोलन केले.

ठळक मुद्देबँकेचे कामकाज, व्यवहार मराठीत करण्याची मागणी : टाळे ठोको आंदोलनाचाही इशारा

बीड : बॅँकेतील कामकाज, व्यवहार मराठी भाषेत करावा, अवाजवी व्याजाची आकारणी तसेच नोटीस खर्च व दंडाची वसुली करु नये या व अन्य मागण्यांसाठी शेतकरी संघर्ष समितीचे गंगाभिषण थावरे यांच्या नेतृत्वाखाली शुक्रवारी येथील एसबीआयच्या क्षेत्रीय कार्यालयासमोर शेतकऱ्यांनी धरणे आंदोलन केले.या संदर्भात आंदोलकांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, ग्राहक व शेतक-यांच्या लूटप्रकरणी माजलगाव येथील एसबीआयच्या शाखेत ८ जानेवारी रोजी आंदोलन करण्यात आले. शेतकरी, गृह व इतर कर्जदारांना अव्वाच्या सव्वा व्याजदर आकारत आहे. बॅँकेतील व्यवहार इंग्रजीमध्ये चालत आहे. सामान्य व शेतकºयांना इंग्रजी समजू शकत नाही त्यामुळे स्वाक्षरी केलेल्या कागदाआधारे मनमानी केली जात असल्याची तक्रार निवेदनात केली होती. मागण्यांसंदर्भात ग्राहक व शेतकºयांची लूट बॅँकेकडून कशी व कुठल्या प्रकारे होते, याचा सविस्तर तपशील बॅँकेने आंदोलकांना मागितला. या मुद्यावर कुठल्याही ग्राहकाने तक्रार केलेली नसल्याचे सहाय्यक महाप्रबंधक भोसले यांनी आंदोलकांना दिलेलया पत्रात नमूद केले आहे. व्यवहार मराठी भाषेत करण्याचा अधिकार बॅँकेच्या मुंबई येथील केंद्रीय कार्यालयाला असल्याचे या पत्रात स्पष्ट केले आहे. कुठल्याही प्रकारचे कर्ज मंजूर करताना बॅँक ग्राहकाला सर्व अटी, नियम सविस्तर समजावून सांगून त्याची व्यवस्था पत्रावर स्वाक्षरी घेऊन पुष्टी केली जाते, असे बॅँकेच्या वतीने कळविण्यात आले. दरम्यान दिलेल्या निवेदनानुसार सर्व व्यवहार मराठीत करण्यात यावेत तसेच अवाजवी वसुली व त्याचे चार्जेस रद्द करावेत या मागण्यांबाबत न्याय न मिळाल्यास २३ मार्च रोजी टाळे ठोको आंदोलन करण्याचा इशारा शेतकरी संघर्ष समितीने दिला आहे.

टॅग्स :BeedबीडFarmerशेतकरीagitationआंदोलन