शहरं
Join us  
Trending Stories
1
"चीनपेक्षाही धोकादायक म्हणजे RSS…"; ओवेसींनी साधला निशाणा, PM मोदींना विचारला एक प्रश्न
2
ठाकरे बंधूंच्या पॅनेलला टक्कर देण्यासाठी देवेंद्र फडणवीसांनी २ शिलेदारांवर सोपवली जबाबदारी
3
भारताच्या स्वातंत्र्याने खलिस्तान्यांना होतोय त्रास; ऑस्ट्रेलियाच्या रस्त्यांवर गोंधळ घातला
4
पाकिस्तानमध्ये हाहाकार! ढगफुटी, पूर आणि भूस्खलनात ४१ लोकांचा मृत्यू, असंख्य बेपत्ता; पाचशे पर्यटक अडकले
5
प्रियकराची ओढ, पत्नीचं संसाराकडे दुर्लक्ष; त्यानंतर पतीने जे केले..., सासरचे जावयावरच उलटले
6
सुदर्शन चक्र, दहा वर्षात तयार होणार भारताचं स्वदेशी सुरक्षा कवच, सर्व शस्त्रास्त्रे ठरणार निष्प्रभ, अशी आहे योजना
7
“जालना, मुंबई, दिल्लीत कुठेही आंदोलन कर, पण...”; जरांगेंच्या निर्धारावर भुजबळ स्पष्टच बोलले
8
'दहा मृतदेह आम्ही स्वतःच बाहेर काढले, अजूनही लोक मातीखालीच...'; चशोटीत आक्रोश, मन्न सुन्न करणारे अनुभव
9
"त्यांनी माझे गाल ओढले, दंडाला चिमटे काढले...", हळदीकुंकूच्या कार्यक्रमाला गेलेल्या प्रिया बेर्डेंना चाहत्यांकडून आलेला धक्कादायक अनुभव
10
क्रिकेटरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी दिसणार सलमान खानच्या 'बिग बॉस १९'मध्ये?, जाणून घ्या याबद्दल
11
"भारत-पाक संघर्ष अणुयुद्धात बदलला असता, मी होतो म्हणून..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा 'तो' दावा कायम
12
शशी थरूर 'क्लीन बोल्ड'! एका तरूणाच्या इंग्रजी ट्विटने काढली 'विकेट', रिप्लाय देत म्हणाले...
13
जन्माष्टमी २०२५: ‘या’ राशींवर श्रीकृष्ण कृपा, पैसे कमी पडत नाहीत; सुबत्ता-वैभव-भरभराट लाभते!
14
राजा रघुवंशीच्या घरी अचानक पोहोचला पोलिसांच्या वेशातील व्यक्ती; कुटुंबाला आला संशय, तपास करताच धक्कादायक सत्य उघड
15
७ वर्षांनी डोनाल्ड ट्रम्प आणि पुतिन भेट होणार; ३२ हजार सैन्य तैनात, ३०० किमी परिसरात 'नो फ्लाय झोन'
16
"कोणतीही अघोरी शक्ती आली तरी मराठी माणसांची..."; 'या' महापालिकांमध्ये मनसे-शिवसेना एकत्र लढणार?
17
PM मोदींनी सर्व रेकॉर्ड मोडले, लाल किल्ल्यावर १०३ मिनिटे भाषण केले; पाहा, १० मोठे मुद्दे
18
"युवराज्ञींना येणं भाग पडलं...", प्राजक्ता-शंभुराजच्या साखरपुड्याला आली भोसले राजघराण्यातील महत्त्वाची व्यक्ती, अभिनेत्रीची खास पोस्ट
19
सूरज चव्हाणला पक्षात बढती, अजित पवार म्हणतात, "मला माहिती नाही..."; सुनील तटकरेंचा वेगळाच दावा
20
“स्वातंत्र्य चळवळ अन् RSSचा संबंध काय? PM मोदी पुन्हा लाल किल्ल्यावरून खोटे बोलले”: सपकाळ

शेतकऱ्यांनो, सावधान... पेरणीची घाई करू नका...!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2021 04:23 IST

अविनाश कदम लोकमत न्यूज नेटवर्क आष्टी : शेतकरी पावसाळा सुरू झाला की, पेरणीची लगबग सुरू करतात. पुन्हा पावसाने उघडीप ...

अविनाश कदम

लोकमत न्यूज नेटवर्क

आष्टी : शेतकरी पावसाळा सुरू झाला की, पेरणीची लगबग सुरू करतात. पुन्हा पावसाने उघडीप दिल्यावर नुकसानीला सामोरे जावे लागते. त्यासाठी शेतकऱ्यांनी पेरणीयोग्य पाऊस झाल्यावर पेरणीला सुरुवात करावी, असा सल्ला आष्टी कृषी विभागाने दिला आहे.

तालुक्यातील अनेक गावांमध्ये पुरेसा पाऊस नाही. काही गावांमध्ये पाऊस झाला आहे. शेतकऱ्यांच्या पेरण्या झाल्या आहेत, तरी काही गावांमध्ये पावसाचे प्रमाण कमी आहे. पेरणी झालेल्या गावांमध्ये मागील आठ दिवसांपासून पावसाने दडी मारली आहे. आणखी पावसाने अशी ओढ दिल्यास शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढवू शकते. यामुळे शेतकऱ्यांनी किमान ७ इंच ओल झाल्याशिवाय पेरणीची घाई करू नये, असे आवाहन आष्टी कृषी विभागाच्या वतीने केलेले आहे. कडा, धामणगाव, धानोरा, आष्टी तालुक्यांच्या पश्चिम भागातील अनेक गावांमध्ये पावसाचे प्रमाण कमी आहे, तर आष्टीच्या पूर्वेकडील गावात खरिपाच्या पेरण्या झाल्या आहेत. मागील ४ ते ५ दिवसांपासून दमदार पाऊस झाला नाही. येत्या २ ते ४ दिवसांमध्ये पाऊस झाला नाही, तर या शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढावू शकते.

.....

पेरणीयोग्य पावसानंतरच पेरणी करा

जोपर्यंत ८० ते १०० मिमी पाऊस पडत नाही, तोपर्यंत शेतकऱ्यांनी पेरणी करू नये. यापेक्षा कमी पाऊस पडल्यानंतर, शेतकऱ्यांनी पेरणी केल्यास पुरेशा प्रमाणात ओलावा नसतो. जमिनीच्या उष्णतेमुळे बियाणे अतिशय कमी प्रमाणात अंकुरते व बियाणे जळण्याची शक्यता अधिक असते. त्यामुळे शेतकऱ्यांवर दुबार बियाणे पेरण्याची वेळ येऊ शकते. यामध्ये आर्थिक फटका बसतो. पैसे आणि वेळही अधिक खर्च होतो. याचा विपरित परिणाम उत्पादनावर होऊन उत्पादनात घट होण्याची शक्यता आहे. दुबार पेरणीचा खर्चही शेतकऱ्यांना करावा लागतो. त्यामुळे पेरणीयोग्य पाऊस झाल्याशिवाय पेरणी करू नये.

-राजेंद्र सुपेकर, तालुका कृषी अधिकारी, आष्टी.

...

सुरुवातीला दमदार पावसाने हजेरी लावली. यंदा पाऊस चांगला राहील, या आशेने शेतकऱ्यांनी बियाणे, खते खरेदीस प्रारंभ केला होता. कऱ्हेवडगांव परिसरातील संपूर्ण पेरणीची कामेही पूर्ण झाली आहेत. आठ दिवसांपासून पावसाचे प्रमाण कमी होत गेल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. पेरणी झालेली पिके आता कुठे वर दिसू लागताच, कडक उन्हामुळे ती करपण्याची शक्यता आहे. यामुळे मोठ्या पावसाची अपेक्षा आहे.

- राम नागरगोजे, शेतकरी, कऱ्हेवडगांव.

.....

मंडळनिहाय पर्जन्यमान आष्टी - ६३.५ मिमी, कडा - ६०.२ मिमी, टाकळसिंग - ४५.४ मिमी, दौलावडगांव - ६५.९ मिमी, धामणगांव - ५१.४ मिमी, धानोरा - ३८.६ मिमी, पिंपळा - १२२ मिमी.