शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

माजलगावात उस दराबाबत शेतकरी आक्रमक; राष्ट्रीय महामार्ग क्र. २२२ धरला रोखून 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 24, 2017 16:58 IST

पश्चिम महाराष्ट्राच्या धर्तीवर उसाचा दर द्या, २६५ जातीच्या उसाची नोंद घ्यावी या व इतर मागण्यासाठी मागील काही दिवसांपासून तालुक्यात शेतक-यांचे आंदोलन सुरु आहे. आज या आंदोलनाला हिंसक वळण प्राप्त होऊन शेतक-यांनी परभणी फाटा येथे जाळपोळ करत राष्ट्रीय महामार्ग २२२ वरील  वाहतूक रोखून धरली.

माजलगाव (बीड ) : पश्चिम महाराष्ट्राच्या धर्तीवर उसाचा दर द्या, २६५ जातीच्या उसाची नोंद घ्यावी या व इतर मागण्यासाठी मागील काही दिवसांपासून तालुक्यात शेतक-यांचे आंदोलन सुरु आहे. आज या आंदोलनाला हिंसक वळण प्राप्त होऊन शेतक-यांनी परभणी फाटा येथे जाळपोळ करत राष्ट्रीय महामार्ग २२२ वरील  वाहतूक रोखून धरली.

सध्या राज्यात सर्वत्र शेतक-यांचे उस दराबाबत आंदोलन सुरु आहेत. तालुक्यात देखील शिवसेने सोबतच शेतकरी संघटना देखील वेगवेगळया आंदोलनांद्वारे साखर कारखानदारांवर दबाव आणत आहेत. मात्र, कारखानदारांचे याकडे सपशेल दुर्लक्ष होत असल्याने आता शेतकरी अधिक आक्रमक होऊन आंदोलन करत आहेत. आज सकाळी शेतकरी संघर्ष समितीचे अध्यक्ष गंगाभिषण थावरे यांच्या नेतृत्वाखाली परभणी फाटा येथे रस्त्यावर जाळपोळ करत शेतक-यांनी संताप व्यक्त केला. यामुळे राष्ट्रीय महामार्ग २२२ वरील वाहतूक काही काल ठप्प होती. 

काय आहेत मागण्या तालुक्यात साखर कारखानदारांनी बैठक घेउन उसाचा समानदर देउन 265 जातीचे उसाची नोंद न घेणे तसेच उसाचा दर हंगाम सुरु होवून देखील जाहिर न करणे असे आडमुठे धोरण अवलंबिले आहे. यामुळे हे आंदोलन पेटले असून शेतक-यांनी सहकारी साखर कारखान्यांनी खाजगी साखर कारखान्यापेक्षा गतवर्षी प्रतिटन सहाशे रूपये कमी रक्कम दिली हि रक्कम तात्काळ द्यावी, उसाचा दर तात्काळ जाहिर करावा तसेच 265 याय जातीच्या उसाची नोंद कारखान्यांना घ्यावी अशा मागण्या केल्या.

 

टॅग्स :FarmerशेतकरीSugar factoryसाखर कारखानेBeedबीड