शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

बीडमध्ये शासकीय कार्यालयात विष घेतलेल्या शेतक-याचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2017 12:21 IST

इनामी जमीन पडताळणी प्रमाणपत्रासाठी वारंवार भू-सुधार कार्यालयात खेटे मारले, परंतु काम होत नसल्याने संतापलेल्या शेतक-याने १४ नोव्हेंबर रोजी तहसील कार्यालयाच्या इमारतीत विषारी द्रव प्राशन केले होते. तीन दिवस मृत्यूशी झुंज देणा-या या शेतक-याचा रविवारी सकाळी उपचारादरम्यान मृत्यू झाला.

ठळक मुद्देतीन दिवस मृत्यूशी झुंजप्रशासनाच्या हालगर्जीपणामुळेच आत्महत्या केल्याचा नातेवाईकांचा आरोप

बीड : इनामी जमीन पडताळणी प्रमाणपत्रासाठी वारंवार भू-सुधार कार्यालयात खेटे मारले, परंतु काम होत नसल्याने संतापलेल्या शेतक-याने १४ नोव्हेंबर रोजी तहसील कार्यालयाच्या इमारतीत विषारी द्रव प्राशन केले होते. तीन दिवस मृत्यूशी झुंज देणा-या या शेतक-याचा रविवारी सकाळी उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यानंतर नातेवाईकांनी संबंधित विभागातील अधिकारी, कर्मचा-यांच्या हालगर्जीपणामुळेच शेतक-याने आत्महत्या केल्याचा आरोप करीत शिवाजीनगर पोलीस ठाण्यात ठिय्या मांडला. 

प्रल्हाद हरीभाऊ टेकाळे (नागापूर बु. ता.बीड) असे त्या शेतक-याचे नाव आहे. नागापूर येथे गट नं. १०६ मध्ये सय्यद शफिक सय्यद हमजा यांची २० आर एवढी इनामी जमीन आहे. कृषीक प्रयोजनासाठी ही जमीन टेकाळे यांना देण्यात येणार होती. यासाठी उपजिल्हाधिकारी यांचे जमीन विक्री संदर्भात पडताळणी प्रमाणपत्र/हस्तांतरण करण्याची  परवाणगी पाहिजे होती. यासाठी टेकाळे हे वर्षभरापासून भु-सुधार कार्यालयात खेटे मारत होते. परंतु येथील अधिकारी, कर्मचारी त्यांना टोलवाटोलवी करीत होते. १४ डिसेंबर रोजीही ते याच प्रमाणपत्रासाठी गेले होते. परंतु त्यांना अपेक्षित उत्तर मिळाले नाही. यावर वैतागलेल्या टेकाळे यांनी कार्यालयाच्या आवारातच विषारी द्रव प्राशन केले. यामध्ये त्यांना कार्यालयातील कर्मचा-यांनीच जिल्हा रूग्णालयात दाखल केले होते. त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू होती. तीन दिवस मृत्यूशी झुंज दिल्यानंतर रविवारी सकाळी त्यांची प्राणज्योत मालवली. याप्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात नोंद करण्यासाठी नातेवाईकांची गर्दी जमली होती.

गुन्हा दाखल करण्याची मागणीदरम्यान, टेकाळे यांच्या नातेवाईकांनी शिवाजीनगर पोलीस ठाणे गाठून संबंधित प्रशासनातील अधिकारी, कर्मचा-यांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी केली. यावेळी नातेवाईक आक्रमक झाले होते. परिस्थिती पाहून उपअधीक्षक सुधीर खिरडकर यांनी ठाण्यात धाव घेत नातेवाईकांशी चर्चा केली. चौकशी करून गुन्हा दाखल करण्याचे आश्वासन देताच नातेवाईकांचा संताप कमी झाल्याचे दिसले. सकाळी ११ पर्यंत ठाण्यात नोंद झालेली नव्हती. तर सुधीर खिरडकर हे ठाण्यात ठाण मांडून होते.

विष प्राशन केल्यावर परवाणगीटेकाळे यांनी विषारी द्रव प्राशन केल्यानंतरच वर्षभर झोपेत असलेले प्रशासन खडबडून जागे झाले. १६ डिसेंबर रोजी पडताळणी प्रमाणपत्राला परवाणगी देण्यात आली. यावर उपजिल्हाधिकारी (सामान्य) यांची स्वाक्षरीही आहे. प्रशासनातील कामे करून घेण्यासाठी विषारी द्रव प्राशन करून आत्महत्या करावी लागत असल्याने संताप व्यक्त होत असून प्रशासनाचा गलथान कारभार या निमित्ताने चव्हाट्यावर आला आहे.

टॅग्स :Farmerशेतकरीfarmer suicideशेतकरी आत्महत्याBeedबीड