शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

फरार नंदा खुरपुडेला ४१ दिवसानंतर बीडमध्ये बेड्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2018 01:12 IST

व्यायामशाळा अनुदानाचा हप्ता बँक खात्यावर जमा करण्यासाठी शिपायामार्फत ८० हजार रूपये घेतल्याप्रकरणी जिल्हा क्रीडा अधिकारी नंदा खुरपुडे हिच्यावर गुन्हा दाखल झाला होता. त्यानंतर ती फरार झाली होती. तब्बल ४१ दिवसानंतर तिला बेड्या ठोकण्यात एसीबीला यश आले आहे. खुरपुडे ही आपल्या खाजगी वाहनाची नंबर प्लेट काढून औरंगाबादला जात होती. सोमवारी दुपारी तिला येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळ बेड्या ठोकल्या.

ठळक मुद्देगाडीची नंबरप्लेट काढून बीडहून जात होती औरंगाबादला

लोकमत न्यूज नेटवर्कबीड : व्यायामशाळा अनुदानाचा हप्ता बँक खात्यावर जमा करण्यासाठी शिपायामार्फत ८० हजार रूपये घेतल्याप्रकरणी जिल्हा क्रीडा अधिकारी नंदा खुरपुडे हिच्यावर गुन्हा दाखल झाला होता. त्यानंतर ती फरार झाली होती. तब्बल ४१ दिवसानंतर तिला बेड्या ठोकण्यात एसीबीला यश आले आहे. खुरपुडे ही आपल्या खाजगी वाहनाची नंबर प्लेट काढून औरंगाबादला जात होती. सोमवारी दुपारी तिला येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळ बेड्या ठोकल्या.

व्यायामशाळेसाठी मंजूर झालेले तीन लाख रुपयांचे अनुदान बँक खात्यावर टाकण्यासाठी शिपाई शेख फईमोद्दिन मार्फत ८० हजार रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी बीडची जिल्हा क्रीडा अधिकारी नंदा खुरपुडे हिच्यावर ३ एप्रिल रोजी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. पैकी शिपायाला रंगेहाथ पकडले होते तर खुरपुडे ही फरार झाली होती. त्यानंतर एसीबीच्या अधिकाऱ्यांनी तिच्या लातूरच्या घराची झडती घेतली होती. यामध्ये अनेक मौल्यवान वस्तू त्यांना आढळून आल्या होत्या. त्यानंतर खुरपुडेला पकडण्यासाठी एसीबीची धावाधाव सुरू होती. परंतु ती त्यांना गुंगारा देत होती.

सोमवारी दुपारी ती आपल्या खाजगी कारने बीडमार्गे औरंगाबादला जात असल्याची माहिती बीड एसीबीला मिळाली. त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळ सापळा लावला. खबºयाने दिलेल्या माहितीवरून त्यांना कार येताना दिसली आणि त्यांनी ती अडविली. यामध्ये खुरपुडे आढळून आली. तिला तात्काळ अटक करून सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास वैद्यकीय तपासणीसाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मंगळवारी तिला न्यायालयात हजर करणार असल्याचे उपअधीक्षक बाळकृष्ण हनपुडे पाटील म्हणाले.ना खेद, ना खंतलाचखोर नंदा खुरपुडे हिला अटक केल्यानंतर सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास तिला वैद्यकीय तपासणीसाठी जिल्हा रूग्णालयात आणण्यात आले. यावेळी ती हसत हसत गाडीतून खाली उतरली आणि तपासणी झाल्यानंतर हसत गाडीत बसली. तिच्यासोबत दोन महिला पोलीस कर्मचारी होत्या. विशेष म्हणजे पोलिसांनी तिला हातकड्या घालण्याची तसदीही घेतली नाही.

अटकपूर्व जामीन फेटाळलानंदा खुरपुडेची अटकपूर्व जामिनासाठी धावपळ सुरू होती. पहिल्यांदा जिल्हा व नंतर उच्च न्यायालयात तिने धाव घेतली. परंतु न्यायालयाने तिचा अर्ज फेटाळून लावला होता. न्यायालयाने अर्ज फेटाळल्यानंतरही खुरपुडे एसीबीला शरण आली नाही, हे विशेष.

४१ दिवस कोठे होती खुरपुडे?३ एप्रिल रोजी गुन्हा दाखल होताच नंदा खुरपुडे फरार झाली. त्यानंतर तिला ४१ दिवसानंतर बेड्या ठोकल्या. परंतु या दरम्यानच्या काळात ती कोठे होती, असा प्रश्न कायम आहे. एसबीची उपअधीक्षक हनपुडे पाटील म्हणाले, चौकशी केल्यानंतरच या सर्व बाबी समोर येतील.

टॅग्स :BeedबीडCrimeगुन्हाMarathwadaमराठवाडा