शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

कौटुंबिक वाद; चिमुकल्यांचा बळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 31, 2018 01:06 IST

कौटुंबिक वाद, तणाव आणि आलेल्या रागाच्या भरात पोटच्या दोन चिमुकल्या मुलींना पाण्याच्या हौदात बुडवून ठार मारले. त्यानंतर ती निर्दयी माता माहेरी निघून गेली.

ठळक मुद्देनिर्दयी मातेचा कहरपोलिसांनी लावला प्रकरणाचा दोन तासांत छडापतीने चारित्र्यावर संशय घेतल्याने रागाच्या भरात पोटच्या गोळ्याला टाकले हौदात

लोकमत न्यूज नेटवर्कबीड : कौटुंबिक वाद, तणाव आणि आलेल्या रागाच्या भरात पोटच्या दोन चिमुकल्या मुलींना पाण्याच्या हौदात बुडवून ठार मारले. त्यानंतर ती निर्दयी माता माहेरी निघून गेली. मात्र पोलिसांनी योग्य दिशेने तपास करीत अवघ्या दोन तासांत छडा लावला आणि खुनी मातेला गजाआड केले. तीनेही केलेल्या गुन्ह्याची कबुली दिल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले. वारंवार पतीकडून घेतलेल्या चारित्र्यावरील संशयातून आपण हे कृत्य रागाच्या भरात केल्याचे तीने पोलिसांना सांगितल्याचे समजते. दरम्यान, या ह्रदयद्रावक घटनेमुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.बीड तालुक्यातील खांडे पारगाव येथील राधेश्याम आमटे हे काही वर्षांपूर्वी रिक्षा चालविण्यासाठी बीडला आले. शहरातील नरसोबानगर भागात ते किरायाच्या घरात रहात होते. आई-वडील व छोटा भाऊ, पत्नी आणि गौरी, गायत्री आणि चार महिन्यांची मुलगी असा त्यांचा परिवार. राधेशाम यांना दारूचे व्यसन आहे. त्यामुळे घरात भांडणे होत होती. राधेशाम हा पत्नी दीपालीच्या चारित्र्यावर संशय घेत असे. यावरून त्याने अनेकवेळा दीपालीला मारहाणही केली होती. काही दिवसांपासून तर हे दररोजचेच झाले होते. याला दीपाली पूर्णत: वैतागली होती. दोन दिवसांपूर्वी तिचे पतीसोबत कडाक्याचे भांडणही झाले होते. यावेळी तिने टोकाचे पाऊल उचलण्याचा निर्णय घेतला. सोमवारी सकाळीच सासु, सासरा, दीर आणि मोठी मुलगी गौरी हे दीपालीच्या नणंदेकडे बार्शीनाका येथे गेले होते. राधेशाम हा रिक्षा घेऊन गेला. दीपाली घरी एकटीच होती. दिवसभर विचार केला. सायंकाळी सात वाजेच्या सुमारास तिने गायत्री आणि चार महिन्यांच्या चिमुकलीला जवळ घेतले. अगोदर गायत्रीला हौदात टाकले. त्यानंतर चार महिन्याच्या चिमुकलीला. नऊ महिने पोटात वाढविलेल्या मुली डोळ्यासमोर बुडत असतानाही केवळ राग असल्याने दीपाली घराला कुलूप लावून अंधारात बाहेर पडली. रात्री ९ वाजेच्या सुमारास पती राधेशाम घरी आल्यावर त्याला पत्नी आणि मुली दिसल्या नाहीत. त्याने शिवाजीनगर पोलीस ठाणे गाठून माहिती दिली. तेवढ्यात खेर्डा (ता.गेवराई) येथील दीपालीच्या माहेरच्यांनी पोलिसांना फोन केला. घडलेला प्रकार सांगितला. खात्री पटल्यावर पोलिसांनी घरी धाव घेत मृतदेह ताब्यात घेतले. जिल्हा रूग्णालयात त्यांचे शवविच्छेदन करण्यात आले. राधेश्यामच्या फिर्यादीवरून दीपालीविरोधात खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे. घडला प्रकार भावासमोर कथन मुलींना हौदात टाकल्यावर दीपाली खेर्डा या आपल्या माहेरी गेली. घरी जाताच तिने आपण रागाच्या भरात केलेले कृत्य भावासमोर कथन केले. भावाने तात्काळ गावातील प्रतिष्ठीत व्यक्तींच्या कानावर ही बाब टाकली. त्यांनी पोलिसांना फोन करून कल्पना दिली. शिवाजीनगर पोलीस तात्काळ खेर्डात पोहचले आणि दीपालीला ताब्यात घेतले. चौकशीत तिने आपण हे कृत्य केल्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले.

राधेश्यामच होता आरोपीच्या पिंजऱ्यात

राधेशामवर यापूर्वी दोन गुन्हे दाखल आहेत. पोलिसांवर प्राणघातक हल्ले त्याने केलेले आहेत. त्याचे रेकॉर्ड पहात पोलिसांचा संशय राधेशामवर होता. त्यातच तो रात्री काही वेळ गायब होता. पहाटे अडीच वाजेच्या सुमारास त्याला बसस्थानकातील शौचालय परिसरात ताब्यात घेतले. मात्र चौकशीत दीपालीने सर्व कबुली दिल्यानंतर त्याला सोडून देण्यात आले.

एसपी, डीवायसपींची धाव

घटनेचे गांभीर्य पाहत अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे, उपअधीक्षक सुधीर खिरडकर यांनी घटनास्थळी धाव घेतली. तर शिवाजीनगर ठाण्याचे पोनि शिवलाल पुरभे हे रात्रभर या प्रकरणाचा छडा लावत होते. त्यांच्यासोबत ठाण्यातील कर्मचारीही होते. पोलीस अधीक्षक जी.श्रीधर यांना याबाबत माहिती देण्यात येत होती.

दीपालीला जीवे मारण्याच्या धमक्या

राधेशाम हा गुन्हेगारी प्रवृत्तीचा आहे. तो नेहमी दीपालीला त्रास देत असे. रविवारी त्याने दीपालीला मारहाण करून तिचा गळा आवळण्याचा प्रयत्न केला. तसेच कोयत्याने तुकडे करण्याची धमकीही दिली होती. यामुळे दीपाली दहशतीखाली होती. यातूनच तिने हे कृत्य केल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले.

गौरीला बसला धक्का

आई आणि आपल्या लहान बहिणींना भेटून गौरी आत्याकडे गेली होती. मंगळवारी सकाळी तिला हा प्रकार समजल्यानंतर धक्काच बसला. आईकडे पाहून तिने जोरात आक्रोश केला. आपल्या बहिणींचे मृतदेह पाहून ती काही वेळासाठी बेशुद्धच झाली होती. इतर नातेवाईकांनाही ही घटना समजल्यानंतर धक्का बसला.

टॅग्स :BeedबीडMurderखूनCrime Newsगुन्हेगारीBeed policeबीड पोलीस