शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

देणे टाळण्यासाठी घरफोडीची खोटी फिर्याद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2019 00:15 IST

गावातील लोकांकडून घेतलेले पैसे वापस देण्याचे टळावे आणि आपला बचाव व्हावा या इराद्याने घरफोडीची खोटी तक्रार दिल्याचा प्रकार उघडकीस आला

लोकमत न्यूज नेटवर्कबीड : गावातील लोकांकडून घेतलेले पैसे वापस देण्याचे टळावे आणि आपला बचाव व्हावा या इराद्याने घरफोडीची खोटी तक्रार दिल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. धारुर तालुक्यातील गावंदरा येथील घरफोडीची तक्रार आल्यानंतर तपासात फिर्यादी खोटे बोलत असल्याचा संशय बळावल्याने सर्व माहिती जाणून घेत दरोडा प्रतिबंधक पथकाने हा सगळा प्रकार उघड केला. देणेकऱ्यांनी पैशाची मागणी करु नये म्हणून घरफोडीची तक्रार दिल्याची कबुली अखेर फिर्यादीने पोलीसांसमोर दिली.धारुर तालुक्यातील गावंदरा येथील बाबासाहेब लक्ष्मण कांबळे यांनी १६ जून रोजी धारुर ठाण्यात घरफोडी झाल्याची तक्रार दिली होती. यामध्ये १ लाख ७ हजार व सोन्याचे दागिने असा १ लाख २५ हजाराचा मुद्देमाल चोरीला गेल्याचे सांगितले होते. पोलिसांनी या प्रकरणात गुन्हा दाखल केला होता. याचा तपास करण्यासाठी दरोडा प्रतिबंधक पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक गजानन जाधव, पोहे. अभिमन्यू औताडे, पोना नागरगोजे, साबळे आदी कर्मचाऱ्यांचा कारवाईत सहभाग होता.घटनेबाबत विचारपूस सुरु केली असता फिर्यादी कांबळे खोटे बोलत असल्याचे सपोनि जाधव यांच्या लक्षात आले. त्यानंतर त्यांनी सखोल माहिती जाणून घेतली तेव्हा कांबळे यांनी शुक्रवारीच गावातील गोविंद कांबळे यांना त्यांची जागा विक्री करुन त्या व्यवहारातून १ लाख रुपये मिळाले होते. बाबासाहेब यांनी याच रकमेतून नंतर गावातील शंकर बडे यांचे उसनवारीने घेतलेले ५० हजार व बाळू कांबळे यांचे १० हजार दोघांना परत दिले होते.सपोनि जाधव यांनी दोघांकडेही याबाबत चौकशी करुन पडताळणी केली. बाबासाहेब यांच्याकडे पुन्हा विचारणा केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. नंतर मात्र गावातील काही देणेक-यांचे पैसे देणे बाकी आहे. लोकांनी पैसे मागू नयेत म्हणून धारुर पोलीस ठाण्यात खोटी तक्रार दाखल केल्याची कबुली दरोडा प्रतिबंधक पथकाजवळदिली.

टॅग्स :theftचोरीCrime Newsगुन्हेगारीBeed policeबीड पोलीस