शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

'बनावट लग्नाची वरात, पोलिसांच्या दारात'; नवरी निघाली अल्पवयीन...आई, भाऊही बनावट !

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 15, 2022 12:31 IST

यातील नवरी अल्पवयीन निघाली असून, तिचे नावही बनावट सांगितल्याचे उघडकीस आले.

बीड : अडीच लाख रुपये देऊन वसमत (जि. परभणी) येथे मुद्रांकावर लग्न लावून मोठ्या हौसेने आणलेली नवरी करवलीसह पळून जाण्याच्या प्रयत्नात नवरदेवाने पकडून शहर पोलिसांच्या स्वाधीन केली होती. यानंतर बनावट लग्न लावणाऱ्या टोळीचा पर्दाफाश झाला होता. या प्रकरणात शहर ठाण्याच्या पोलिसांनी १२ डिसेंबरला आणखी पाच जणांना अटक केली. नवरी अल्पवयीन निघाली असून, लग्नातील आई, भाऊ बनावट असल्याची माहिती उजेडात आली आहे.

शहरातील एका ३२ वर्षीय तरुणाचा विवाह मध्यस्थामार्फत औंढा नागनाथ (जि. हिंगोली) येथील तरुणीशी जुळवला होता. ३ डिसेंबरला वसमत (जि. परभणी) येथे शंभर रुपयांच्या मुद्रांकावर लग्न उरकले. त्यासाठी मध्यस्थाने अडीच लाख रुपये घेतले होते. दुसऱ्या दिवशी सकाळी नवरीने करवली म्हणून आलेल्या मीना बळीराम बागल (२७, रा. छोटेवाडी, ता. माजलगाव) हिच्यासोबत पलायनाचा प्रयत्न केला. मात्र, नवरदेवाने त्यांना पकडून शहर पोलिसांच्या स्वाधीन केले होते. अधिक चौकशीत बनावट लग्न लावणाऱ्या टोळीचा हा कारनामा असल्याचे स्पष्ट झाले.

यातील नवरी अल्पवयीन निघाली असून, तिचे नावही बनावट सांगितल्याचे उघडकीस आले. तिला अंबाजोगाई येथील महिला सुधारगृहात पाठवले आहे. मीना बागल हिची वाढीव कोठडीनंतर १४ डिसेंबरला न्यायालयीन कोठडीत रवानगी झाली. पोलिसांनी आणखी पाच जणांना १२ डिसेंबरला अटक केली. त्यांना सात दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. आतापर्यंत अटकेतील आरोपींची संख्या सहा झाली असून, उर्वरित आरोपींचा शोध सुरू आहे.

नावे सांगितली खोटी, नातेही बनावटमुक्तीराम गोपीनाथ भालेराव (३१, रा. रिधोरा, जि. परभणी), प्रभाकर शिवाजी दशरथे ऊर्फ आकाश बालाजी माने (३५, रा. जोड परळी, जि. परभणी), विनोद किसन खिलारे (४४, रा. शिवणी बु., जि. हिंगोली), जयशीला प्रभाकर कीर्तने (३५, रा. अस्वला, जि. हिंगोली), पूजा कचरू निलपत्रेवार (२७, रा. तालाकट्टा, जि. परभणी) अशी आरोपींची नावे आहेत. लग्नात त्यातील जयशीला कीर्तनेने नवरी मुलीची आई, तर प्रभाकर दशरथे याने भावाची भूमिका केली होती. त्या दोघांनी नावेदेखील खोटी सांगितल्याचे निष्पन्न झाले आहे.

टॅग्स :BeedबीडCrime Newsगुन्हेगारी