शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

मराठा आरक्षणासाठी टोकाचे पाऊल; मागणी पूर्ण होत नसल्याने नैराश्यातून युवकाने संपवले जीवन

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2023 19:25 IST

अंबाजोगाई तालुक्यातील तडोळा येथील दुर्घटना

अंबाजोगाई -: मराठा समाजाला आरक्षण मिळत नसल्याने आलेल्या नैराश्यातून एका तरुणाने स्वत: च्या शेतातील लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आज सकाळी ११ वाजता आत्महत्या केली. आकाश काकासाहेब जाधव (वय -२५, रा. तडोळा,ता.अंबाजोगाई) असे मृताचे नाव आहे. 

आकाश जाधव हा मराठा समाजाला आरक्षण मिळावे या साठी सुरू असलेल्या सकल मराठा समाजाच्या आंदोलनात सक्रिय होता. समाजाला आरक्षण मिळत नसल्याने आलेल्या नैराश्यातून आकाश जाधव याने मराठा समाजाला आरक्षण मिळावे, अशी चिठ्ठी लिहून आत्महत्या केली. शेतात जाणाऱ्या ग्रामस्थांना त्याचे प्रेत शेतातील लिंबाच्या झाडाला लटकलेले दिसले. यानंतर ही वार्ता गावभर पसरली. ग्रामस्थांनी या घटनेची माहिती बर्दापूर पोलीस ठाण्याला कळवली. पोलीस पथकाने घटनास्थळी भेट दिली.व प्रेत पंचनामा करून शव विच्छेदन व उत्तरीय तपासणीसाठी अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात पाठवले. तिथे रात्री उशिरापर्यंत ही प्रक्रिया सुरू होती. आकाश जाधव यांच्या पश्चात वृध्द आई -वडील, भवजई व एक छोटा पुतण्या आहे.

मोठ्या भावाने ही दीड वर्षापूर्वी केली होती आत्महत्या -: मयत आकाश जाधव यांच्या भावाने दीड वर्षापूर्वी शेती पिकत नसल्याने आलेल्याआलेल्या नैराश्यातून आत्महत्या केली होती. त्यामुळे हे कुटुंब दुःखातून सावरलेले नसतानाच लहान भाऊ असलेल्या आकाश याने ही आत्महत्या केल्याने कुटुंबाचा आधार गमावल्याने हे कुटुंब संकटात सापडले आहे.

मराठा आरक्षणासाठी अंबाजोगाई तालुक्यातील दुसरी आत्महत्या -:मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी ऑक्टोबर महिन्यात अंबाजोगाई तालुक्यातील गिरवली येथील शत्रुघ्न अनुरथ काशीद ( वय-४२)यांनी गावातील पाण्याच्या टाकीवर चढून मराठा आरक्षणाच्या घोषणा देत टाकीवरून उडी मारत आत्महत्या केली होती.त्यानंतर आज आकाश ने गळफास घेऊन  आत्महत्या केल्याने तालुक्यात आरक्षणासाठी दोन आत्महत्या झाल्या आहेत.

टॅग्स :Maratha Reservationमराठा आरक्षणBeedबीड