शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
3
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
4
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
5
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
6
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
7
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
8
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
9
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
10
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
11
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
12
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
13
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
14
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
15
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
17
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
18
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
19
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
20
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
Daily Top 2Weekly Top 5

मुदतवाढ मिळाली, विद्यार्थ्यांनो स्वाधारसाठी करा अर्ज

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2025 19:09 IST

त्रुटी पूर्ण करून पुन्हा अर्ज करावा लागेल सबमीट

बीड : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्यासाठी १५ मार्च पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी आपले अर्ज वेळेत दाखल करणे आवश्यक आहे. hmas.mahait.org या पोर्टलवर अर्ज दाखल करावा लागणार आहे.

सामाजिक न्याय विभागाच्या शासकीय वसतिगृहात प्रवेश घेण्यासाठी पात्र ठरलेल्या, मात्र शासकीय वसतिगृहात प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर योजनेंतर्गत अर्ज दाखल करता येतो. या योजनेचा लाभ गोरगरीब विद्यार्थ्यांना होताे. सदरील योजनेंतर्गत अकरावी व बारावी, तसेच बारावीनंतरच्या व्यावसायिक, तसेच बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमांमध्ये विविध महाविद्यालयांत, शिक्षण संस्थेमध्ये प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांना मागासवर्गीय शासकीय वसतिगृहातील मुला-मुलींप्रमाणे भोजन, निर्वाह भत्ता व इतर आवश्यक सुविधा उपलब्ध करून घेण्यासाठी अर्थसाहाय्य दिले जात आहे. दरम्यान, स्वाधार योजनेसाठी १५ जानेवारीपर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती. विद्यार्थ्यांचे उशिरा सुरू होणारे शैक्षणिक सत्र, ऑनलाइन अर्ज भरताना येणाऱ्या तांत्रिक अडचणी यांसह इतर कारणांवरून स्वाधार योजनेसाठी मुदतवाढ करण्याची विनंती विद्यार्थ्यांच्या पालकांनी केली होती. त्यानुसार, १५ मार्चपर्यंत ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येणार आहे.

काय आहे डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना?अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील विद्यार्थ्यांना मागासवर्गीय मुला-मुलींप्रमाणे भोजन, निवास, शैक्षणिक साहित्य, निर्वाह भत्ता व इतर आवश्यक सुविधा स्वत: उपलब्ध करून घेण्यासाठी अर्थसहाय्य देण्यासाठी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना २०१६-१७ पासून सुरू केली आहे.

कागदपत्रे काय लागतात?भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थ्यांना बँक पासबुक, आधार कार्ड, जातीचा दाखला, उत्पन्नाचे प्रमाणपत्र, प्रवेशित विद्यालयाचे बोनाफाईड, मार्क मेमो, शाळा सोडल्याचा दाखला, हजेरी पत्रक अशी विविध कागदपत्रे द्यावी लागतात.

अर्जाची स्थिती तपासावीभारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावा, अर्जात काही त्रुटी आढळून आल्यास विद्यार्थ्याच्या लॉगीनला पाठविले जातील. विद्यार्थ्यांनी आपल्या लॉगीनमध्ये अर्जाची स्थिती तपासावी. काही त्रुटी असल्यास त्या पूर्ण करुन पुन्हा अर्ज सबमीट करावा. तसेच विद्यार्थ्यांनी आपल्या लॉगीनला जाऊन बँक तपशील भरावा.- प्रदीप भोगले, सहायक आयुक्त, समाजकल्याण, बीड

टॅग्स :BeedबीडScholarshipशिष्यवृत्तीEducationशिक्षण