शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

कामचुकारांना दणका; दोन तंत्रज्ञांची आरोग्य विभागातून हकालपट्टी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2021 17:26 IST

रूग्णांच्या तक्रारीवरून जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.सुरेश साबळे यांनी बुधवारी दुपारी तडकाफडकी ही कारवाई केली आहे.

ठळक मुद्देकोरोना चाचणीसाठी रांगा असतानाही गैरहजर

बीड : जिल्हा रूग्णालयात कोरोना चाचणीसाठी असलेल्या पोर्टेबल केबीनमधील दोन तंत्रज्ञ गैरहजर राहिल्याने त्यांना आरोग्य विभागातून कार्यमुक्त करत हकालपट्टी करण्यात आली आहे. रूग्णांच्या तक्रारीवरून जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.सुरेश साबळे यांनी बुधवारी दुपारी तडकाफडकी ही कारवाई केली आहे. चाचणीसाठी संशयितांच्या रांगा असतानाही गैरहजर राहणे या तंत्रज्ञांना चांगलेच अंगलट आले. या कारवाईने कामचुकारांचे धाबे दणाणले आहेत.

सोनल चव्हाण व रविकिरण गिरी अशी कार्यमुक्त झालेल्या तंत्रज्ञांची नावे आहेत. गिरी यांची सकाळी तर चव्हाण यांची दुपारी ड्यूटी होती. हे दोघेही वेळेवर आले नाहीत. त्यामुळे कोरोना चाचणीसाठी पोर्टेबल केबीनबाहेर लांबच लांब रांगा लागल्या होत्या. यात वृद्धांचाही समावेश होता. यामुळे संतापलेल्या काही लोकांनी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.सुरेश साबळे यांना फोनवरून तक्रारी केल्या. डॉ.साबळे यांनी तात्काळ धाव घेत खात्री केली. यात त्यांना दोघेही दोषी आढळले. यावर दोघांना स्वत:च्या स्वाक्षरीने कार्यमुक्त करून दुसऱ्याला त्या ठिकाणी ड्यूटीवर पाठविले. या तडकाफडकी कारवाईमुळे कामचुकारपणा व मनमानी करणाऱ्यांचे चांगलेच धाबे दणाणले आहेत.

दोघेही दोषी आढळलेपोर्टेबल केबीनबाहेर कोरोना चाचणीसाठी रांगा लागल्या होत्या. चाचणी करण्यासाठी तंत्रज्ञ हजर नाहीत, अशा तक्रारी होत्या. खात्री केल्यावर दोघेही दोषी आढळले. यावर त्यांना कार्यमुक्त करण्यात आले आहे. हलगर्जीपणा करणाऱ्यांना पाठिशी घातले जाणार नाही.- डॉ.सुरेश साबळे, जिल्हा शल्य चिकित्सक बीड

टॅग्स :Beed civil hospitalजिल्हा रुग्णालय बीडBeedबीडdoctorडॉक्टर