शहरं
Join us  
Trending Stories
1
"माझा उद्देश हस्तक्षेप करण्याचा नव्हता, तर...", अजित पवारांनी सोडले मौन; IPS अंजली कृष्णा, व्हायरल व्हिडीओवर काय बोलले?
2
चांदीच चांदी...! वॅगनआरवर 84 हजार, नेक्सॉनवर 1.55 लाखांपर्यंत जीएसटी कमी होणार; अल्टो, 3XO किंमती पहाल तर...
3
पीटर नवारोंच्या टीकेला भारताचे चोख प्रत्युत्तर; परराष्ट्र मंत्रालयाने सर्व दावे फेटाळले...
4
"आम्ही विरोधात असलो तरी..."; रोहित पवारांकडून अंजली कृष्णा प्रकरणावरून अजितदादांची पाठराखण
5
धक्कादायक! बाप्पांसमोर खेळला, बागडला, घरी येऊन आईच्या मांडीवर जीव सोडला; दहा वर्षाच्या मुलाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू
6
हे आहेत भारताचे सर्वात उंच ५ क्रिकेटर, दोघांची उंची जाणून तर तुम्हीही थक्क व्हाल...!
7
अनंत चतुर्दशी २०२५: बाप्पा 'या' राशींवर करणार अनंत कृपा; धनलाभासह घर, गाडी, जमीन खरेदीचे योग
8
मला वाटते आम्ही भारत आणि रशियाला गमावले...; डोनाल्ड ट्रम्प यांचे मोठे वक्तव्य
9
पेट्रोल-डिझेल जीएसटीच्या कक्षेत येणार का? अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी केलं स्पष्ट
10
...तेवढ्याच नोंदी ओबीसीमध्ये येऊ शकतात; बावनकुळेंनी सांगितलं कुणाला मिळणार कुणबी प्रमाणपत्र?
11
पहिली स्लीपर वंदे भारत ट्रेन बिहारला मिळणार? लवकरच प्रवाशांच्या सेवेत येणार; पाहा, वैशिष्ट्य
12
GST' नंतर आता सरकार आणखी एक दिलासा देणार! 'ट्रम्प टॅरिफ'च्या टेन्शनमधून व्यावसायिक मुक्त होतील
13
प्रिती झिंटाच्या सांगण्यावरून बदलला होता 'मॅन ऑफ द मॅच'चा विजेता; स्टार खेळाडूचा खुलासा
14
अनंत चतुर्दशी २०२५: घरच्या साहित्यात झटपट करा पेढ्याच्या चवीचे शाही मोदक; बाप्पा खुश आणि घरचेही 
15
रविवारपासून कोस्टल रोडवरही धावणार एसी बस; कोणकोणत्या स्टॉपवर थांबणार, भाडे किती?
16
झोमॅटो आणि स्विगीच्या ग्राहकांना बसणार फटका? डिलिव्हरी शुल्कावर लागणार नवा कर
17
मुरूम कशासाठी उपसला? कुर्ड गावातील नागरिकांनी सत्य सांगितले; अजितदादांनी मध्यस्ती करत पोलिस अधिकाऱ्यांना सुनावले होते
18
खासदार इंजिनिअर राशिद तिहार कारागृहात ट्रान्सजेंडर्समुळे त्रस्त; 'ते' HIV पॉझिटिव्ह असल्याचा AIP चा दावा
19
Zara, Nike सारख्या सर्व परदेशी ब्रँड्सना सरकारचा झटका; एका निर्णयानं डोकेदुखी वाढली, खरेदीवर परिणाम होणार?
20
"...का तूच खातो सगळं रेटून? आम्हाला तर माहीत आहे, या जीआरवरच संपूर्ण मराठवाडा बसतो!"; भुजबळांना डीवचत जरांगेंचा दावा!

अपयशाचा पर्दाफाश; दोन दिवसांत लपविलेल्या ८५ कोरोना बळींची पोर्टलवर नोंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2021 16:55 IST

केवळ एप्रिल महिन्यात अंबाजोगाई आणि बीडमधील स्मशानात ३७८ बाधितांवर अंत्यसंस्कार केले होते. मात्र, आरोग्य विभागाकडे २७३ मृत्यूंची नोंद होती.

ठळक मुद्देअंबाजोगाईच्या स्वाराती रुग्णालयात सर्वाधिक मृत्यू

- सोमनाथ खताळ

बीड : जिल्ह्यात उपचारांतील दुर्लक्ष व अपुऱ्या सुविधांमुळे एप्रिल महिन्यात स्मशानात मृतदेहांची रांग लागली. मात्र, आरोग्य विभागाने याची नोंदच केली नाही. ही बाब 'लोकमत'ने चव्हाट्यावर आणताच यंत्रणा कामाला लागली. यात गत दोन दिवसांत तब्बल जुन्या ८५ मृत्यूंची नोंद आयसीएमआर पोर्टलवर झाली आहे. यात सर्वाधिक मृत्यू हे अंबाजोगाईच्या स्वाराती रुग्णालयातील आहेत. हा आकडा आणखी वाढणार असून, आरोग्य विभागाच्या अपयशाचा 'लोकमत'ने पर्दाफाश केला आहे.

जिल्ह्यात सध्या कोरोनाबाधितांची संख्या वाढण्यासह मृत्यूही होत आहेत. कराेडो रुपयांचा निधी उधळूनही उपचारांतील हलगर्जीपणा आणि अपुऱ्या सुविधांमुळे हे मृत्यू होत असल्याच्या तक्रारी होत्या. मात्र, हे मृत्यू आरोग्य विभाग लपवीत होता. केवळ एप्रिल महिन्यात अंबाजोगाई आणि बीडमधील स्मशानात ३७८ बाधितांवर अंत्यसंस्कार केले होते. मात्र, आरोग्य विभागाकडे २७३ मृत्यूंची नोंद होती. यात १०५ कोरोनाबळींची तफावत होती. हाच प्रकार 'लोकमत'ने चव्हाट्यावर आणला. त्यानंतर आरोग्य यंत्रणा कामाला लागली. दोन दिवसांत तब्बल ८५ जुन्या मृत्यूंची नोंद आरोग्य विभागाकडे झाली आहे. विशेष म्हणजे यातील जवळपास ७० पेक्षा जास्त मृत्यू हे एकट्या अंबाजोगाईच्या स्वाराती रुग्णालयातील आहेत. या लपविलेल्या मृत्युसंख्येमुळे आरोग्य विभागाबद्दल तीव्र संताप व्यक्त होत असून, हा आकडा आणखी वाढण्याची दाट शक्यता आहे.

‘स्वाराती’चे अधिष्ठाता देईनात उत्तरअंबजाेगाईच्या स्वाराती रुग्णालयानेच जास्त मृत्यू लपविलेले आहेत. याबाबत अधिष्ठाता डॉ. शिवाजी सुक्रे यांना चार वेळा संपर्क केला. तसेच संदेशही पाठविला; परंतु त्यांनी भ्रमणध्वनी बंद केला. जिल्हा आरोग्याधिकारी डॉ. आर. बी. पवार हे बैठकीत होते.

खासगी रुग्णालयांनीही लपविले बळीसरकारी रुग्णालयांबरोबरच खासगी रुग्णालयांनीही कोरोनाबळी लपविले आहेत. यात बीडमधील सूर्या हॉस्पिटल, संजीवनी हॉस्पिटल आणि दीप हॉस्पिटलचा समावेश आहे. तसेच माजलगावच्या देशपांडे हॉस्पिटलने तीन मृत्यू लपविले होते. त्याची नोंद या दोन दिवसांत झाली आहे.

चौकशी अहवालाची प्रतीक्षा'लोकमत'ची बातमी वाचून मुख्यमंत्र्यांना पत्र दिलेले आहे. आरोग्य विभाग स्वत:चे अपयश झाकण्यासाठी कोरोनाबळी लपवीत असल्याची बाब अतिशय धक्कादायक आहे. आता यावर तात्काळ कारवाई करावी.- नमिता मुंदडा, आमदार.

दोन दिवसांत नोंदविलेले मृत्यू :केवळ एप्रिल महिन्यात झालेले मृत्यू - ८५२०२० मध्ये झालेले मृत्यू - २२खासगी रुग्णालयातील मृत्यू - ६

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याDeathमृत्यूBeedबीड