शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
2
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
3
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
4
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
5
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
6
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
7
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
8
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
9
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
10
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
11
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
12
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
13
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
14
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
15
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
16
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
17
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
18
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
19
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
20
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
Daily Top 2Weekly Top 5

राजकीय वर्तुळात खळबळ; 'वंचित'च्या ऊसतोड कामगार संघटनेचे प्रदेशाध्यक्ष एमपीडीए अंर्तगत स्थानबद्ध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2022 15:18 IST

VBA Shivraj Bangar: प्रदेशाध्यक्षांवर झोपडपट्टी दादा कायद्यानुसार कारवाई, बीड पोलिसांनी प्रा. शिवराज बांगर यांना मुंबईत घेतले ताब्यात

बीड : वंचित बहुजन आघाडीचे ( Vanchit Bahujan Aaghadi ) माजी जिल्हाध्यक्ष व ऊसतोड कामगार संघटनेचे प्रदेशाध्यक्ष प्रा. शिवराज बांगर ( Shivaraj Bangar ) यांच्यावर एमपीडीए (महाराष्ट्र झोपडपट्टी दादा प्रतिबंधक कायदा) नुसार कारवाई करण्यात आली. शिवाजीनगर, ठाणे व गुन्हे शाखेच्या संयुक्त पथकाने शनिवारी त्यांना मुंबईतील बेलापूर येथे एका लॉजमधून ताब्यात घेतले. या कारवाईने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

प्रा. शिवराज बांगर यांच्यावर एकूण सात गुन्हे नोंद आहेत. त्यांच्याविरुद्ध एमपीडीएनुसार कारवाईचा प्रस्ताव शिवाजीनगर ठाण्याचे तत्कालीन निरीक्षक साईनाथ ठोंबरे यांनी पोलीस अधीक्षकांकडे पाठविला होता. पोलीस अधीक्षक आर. राजा यांनी हा प्रस्ताव तपासून जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा यांना सादर केला. त्यांनी ३१ डिसेंबर २०२१ रोजी या प्रस्तावाला मान्यता दिली. तेव्हापासून प्रा. बांगर यांचा शोध सुरू होता. अखेर ते मुंबईतील बेलापूर येथे असल्याची माहिती मिळाल्यावरून पोलीस अधीक्षक आर. राजा, अप्पर अधीक्षक सुनील लांजेवार, उपअधीक्षक संतोष वाळके, गुन्हे शाखेचे निरीक्षक सतीश वाघ, शिवाजीनगर ठाण्याचे निरीक्षक केतन राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक प्रवीण पाथरकर, गुन्हे शाखेचे सहायक उपनिरीक्षक हनुमंत खेडकर, हवालदार रामदास तांदळे यांचे पथक रवाना झाले. तांत्रिक तपासाआधारे शनिवारी सकाळी साडेदहा वाजता बेलापूर येथे एका लॉजमधून प्रा. शिवराज बांगर यांना ताब्यात घेतले. त्यांना सायंकाळी बीडला आणले. त्यानंतर औरंगाबाद येथील हर्सूल कारागृहात स्थानबद्ध करण्यात आले.

चला, निराेप घेतोय सगळ्यांचा...!दरम्यान, ३१ डिसेंबर रोजी जिल्हाधिकाऱ्यांनी एमपीडीए कारवाईचा प्रस्ताव मंजूर केल्यानंतर त्याच दिवशी प्रा. बांगर यांनी सोशल मीडियावर 'चला निरोप घेतोय सगळ्यांचा... आता सहन होत नाही...' अशी पोस्ट करून ही कारवाई अन्यायकारक असल्याचा आरोप केला होता. त्यानंतर त्यांचा मोबाईल बंद होता. शोध घेऊनही ते पोलिसांना सापडत नव्हते.

टॅग्स :BeedबीडAurangabadऔरंगाबादCrime Newsगुन्हेगारीVanchit Bahujan Aaghadiवंचित बहुजन आघाडी