शहरं
Join us  
Trending Stories
1
"चीनपेक्षाही धोकादायक म्हणजे RSS…"; ओवेसींनी साधला निशाणा, PM मोदींना विचारला एक प्रश्न
2
ठाकरे बंधूंच्या पॅनेलला टक्कर देण्यासाठी देवेंद्र फडणवीसांनी २ शिलेदारांवर सोपवली जबाबदारी
3
भारताच्या स्वातंत्र्याने खलिस्तान्यांना होतोय त्रास; ऑस्ट्रेलियाच्या रस्त्यांवर गोंधळ घातला
4
पाकिस्तानमध्ये हाहाकार! ढगफुटी, पूर आणि भूस्खलनात ४१ लोकांचा मृत्यू, असंख्य बेपत्ता; पाचशे पर्यटक अडकले
5
प्रियकराची ओढ, पत्नीचं संसाराकडे दुर्लक्ष; त्यानंतर पतीने जे केले..., सासरचे जावयावरच उलटले
6
सुदर्शन चक्र, दहा वर्षात तयार होणार भारताचं स्वदेशी सुरक्षा कवच, सर्व शस्त्रास्त्रे ठरणार निष्प्रभ, अशी आहे योजना
7
“जालना, मुंबई, दिल्लीत कुठेही आंदोलन कर, पण...”; जरांगेंच्या निर्धारावर भुजबळ स्पष्टच बोलले
8
'दहा मृतदेह आम्ही स्वतःच बाहेर काढले, अजूनही लोक मातीखालीच...'; चशोटीत आक्रोश, मन्न सुन्न करणारे अनुभव
9
"त्यांनी माझे गाल ओढले, दंडाला चिमटे काढले...", हळदीकुंकूच्या कार्यक्रमाला गेलेल्या प्रिया बेर्डेंना चाहत्यांकडून आलेला धक्कादायक अनुभव
10
क्रिकेटरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी दिसणार सलमान खानच्या 'बिग बॉस १९'मध्ये?, जाणून घ्या याबद्दल
11
"भारत-पाक संघर्ष अणुयुद्धात बदलला असता, मी होतो म्हणून..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा 'तो' दावा कायम
12
शशी थरूर 'क्लीन बोल्ड'! एका तरूणाच्या इंग्रजी ट्विटने काढली 'विकेट', रिप्लाय देत म्हणाले...
13
जन्माष्टमी २०२५: ‘या’ राशींवर श्रीकृष्ण कृपा, पैसे कमी पडत नाहीत; सुबत्ता-वैभव-भरभराट लाभते!
14
राजा रघुवंशीच्या घरी अचानक पोहोचला पोलिसांच्या वेशातील व्यक्ती; कुटुंबाला आला संशय, तपास करताच धक्कादायक सत्य उघड
15
७ वर्षांनी डोनाल्ड ट्रम्प आणि पुतिन भेट होणार; ३२ हजार सैन्य तैनात, ३०० किमी परिसरात 'नो फ्लाय झोन'
16
"कोणतीही अघोरी शक्ती आली तरी मराठी माणसांची..."; 'या' महापालिकांमध्ये मनसे-शिवसेना एकत्र लढणार?
17
PM मोदींनी सर्व रेकॉर्ड मोडले, लाल किल्ल्यावर १०३ मिनिटे भाषण केले; पाहा, १० मोठे मुद्दे
18
"युवराज्ञींना येणं भाग पडलं...", प्राजक्ता-शंभुराजच्या साखरपुड्याला आली भोसले राजघराण्यातील महत्त्वाची व्यक्ती, अभिनेत्रीची खास पोस्ट
19
सूरज चव्हाणला पक्षात बढती, अजित पवार म्हणतात, "मला माहिती नाही..."; सुनील तटकरेंचा वेगळाच दावा
20
“स्वातंत्र्य चळवळ अन् RSSचा संबंध काय? PM मोदी पुन्हा लाल किल्ल्यावरून खोटे बोलले”: सपकाळ

पायरीचे दर्शन घेऊनच गृहस्थाश्रमात प्रवेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2021 04:23 IST

..... शेतकऱ्यांना मोठ्या पावसाची प्रतीक्षा शिरूर कासार : तालुक्यात पावसाने सुरुवात चांगली केली होती. परिणामी जवळपास ५० टक्के पेरणीचे ...

.....

शेतकऱ्यांना मोठ्या पावसाची प्रतीक्षा

शिरूर कासार : तालुक्यात पावसाने सुरुवात चांगली केली होती. परिणामी जवळपास ५० टक्के पेरणीचे काम पूर्ण झाले. मात्र गेल्या सहा-सात दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने ये रे ये रे पावसा.. म्हणण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. शेतकऱ्यांना मोठ्या पावसाची प्रतीक्षा आहे.

...

स्वच्छतेचे धिंडवडे

शिरूर कासार : नगरपंचायतीने स्वच्छ शहर या उपक्रमात सहभाग घेतला असून, सर्व शहर स्वच्छ दिसत असले तरी काही नजरेच्या पलीकडे मात्र स्वच्छतेचे धिंडवडे निघत असल्याचे चित्र आहे. कालिका देवी मंदिराच्या दक्षिणेला असे चित्र दिसत आहे. या परिसरात स्वच्छता करावी, अशी मागणी होत आहे.

...गुरुजी शाळेत अन् विद्यार्थी घरी

शिरूर कासार : कोरोना महामारीच्या भीतीपोटी व विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी गतवर्षी शाळा बंद होत्या. तीच पुनरावृत्ती याही वर्षी होत आहे. शाळा व शैक्षणिक वर्ष सुरू झाले. गुरुजी शाळेत मात्र विद्यार्थी घरीच ऑनलाइन अध्यापन घेत असल्याने शाळांच्या प्रांगणाचे चैतन्य हरवले असल्याचे दिसून येत आहे.

...

खांब्याला पाच, तर तिंतरवणीत सहा कोरोनाबाधित आढळले

शिरूर कासार : तालुका आजही कोरोनाच्या बाबतीत भीतीच्या सावटाखाली असल्याचे दिसून आले. मंगळवारी तालुक्यात आठ रुग्ण होते. मात्र बुधवारी कोरोनाने उसळी घेत हा आकडा बावीसवर गेला असल्याने तालुका भीतीच्या सावटाखाली आहे. खांब्यात पाच तर तिंतरवणीत सर्वाधिक सहा बाधित रुग्ण आढळले, तर तागडगाव व आनंदगावमधे प्रत्येकी दोन आणि टेंभुर्णी, खालापुरी, आर्वी, वडळी, तरडगव्हाण, वारणी आणि उकिर्डा चकला या गावांत प्रत्येकी एक बाधित असल्याचे कोरोना अहवालात दिसून येते. वाढता आकडा पाहता नागरिकांनी बेसावध राहू नये. कोरोना नियमावलीचे पालन करावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

...

दोन दिवसात शिरूर शहर निरंक

शिरूर कासार : तालुक्यातील कोरोनाबाधितांचा आकडा हा कमी अधिक असा अस्थिर असल्याचे दिसून येत आहे. तरी मंगळवार व बुधवारी दोन दिवस शहर निरंक राहिले. एकही रुग्ण शहरात सापडला नाही. हे दिलासादायक असले तरी बाजारात सर्व व्यवहार सुरू आहेत. बाजारात होणारी गर्दी ही धोक्याची नांदी ठरण्याची शक्यता नाकारता येणार नाही. कोरोनाचे फारसे गांभीर्य घेतले जात नसल्याचेही चित्र आहे.