'राखेचे प्रदूषण हटाव व वडगावकर बचाव'; परळीत ग्रामस्थांनी केले रास्तारोको आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2021 07:06 PM2021-02-12T19:06:50+5:302021-02-12T19:08:38+5:30

परळी तालुक्यातील दादाहारी वडगाव,दाऊतपूर शिवारात  थर्मलचे राख  तळे असून या राख तळ्यातून काही व्यवसायिक दररोज 4000 टिप्पर भरून  राखे ची वाहतूक करीत आहेत.

'Eliminate ash pollution and save Wadgaonkar'; The villagers staged a Rastaroko agitation in Parli | 'राखेचे प्रदूषण हटाव व वडगावकर बचाव'; परळीत ग्रामस्थांनी केले रास्तारोको आंदोलन

'राखेचे प्रदूषण हटाव व वडगावकर बचाव'; परळीत ग्रामस्थांनी केले रास्तारोको आंदोलन

Next
ठळक मुद्देग्रामस्थांना राखे च्या प्रदूषणामुळे डोळ्यांचे व फुफूसाचे आजार होत आहेतरस्त्यावरील राखेच्या प्रदूषणामुळे अपघाताचा धोका वाढला आहे.

परळी : तालुक्यातील  दादाहरी वडगाव येथील ग्रामस्थांनी 'राखेचे प्रदूषण हटाव व वडगावकर बचाव' या मागणीसाठी शुक्रवारी सकाळी दहा ते 11.30 दरम्यान परळी - गंगाखेड राज्य रस्त्यावर रास्ता रोको आंदोलन  केले. त्यामुळे राज्य मार्गावर दीड तास वाहतूक खोळंबली होती. आंदोलनात वडगाव येथील आबालवृद्ध नागरिकांसह मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. राखेचे प्रदूषण हटवा,व ग्रामस्थांना वाचवा अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला होता. 

परळी तालुक्यातील दादाहारी वडगाव,दाऊतपूर शिवारात  थर्मलचे राख  तळे असून या राख तळ्यातून काही व्यवसायिक दररोज 4000 टिप्पर भरून  राखे ची वाहतूक करीत आहेत. ही राख टिप्पर मधून  व हा तुक होत असताना खाली पडून परळी- गंगाखेड रस्त्यावर वाहन चालकांसाठी जीवघेणी ठरत आहे. रस्त्यावरील राखेच्या प्रदूषणामुळे अपघाताचा धोका वाढला आहे. वडगाव येथील साडेतीन हजार  ग्रामस्थांना राखेच्या प्रदूषणाचा गेल्या अनेक वर्षापासून  त्रास  होत आहे. दा. वडगाव येथील ग्रामस्थांना राखे च्या प्रदूषणामुळे डोळ्यांचे व फुफूसाचे आजार होत आहेत तसेच गेल्या पाच वर्षापासून श्वसनाचे गंभीर आजार जडत आहेत. परळी विद्युत केंद्राच्या मुख्य अभियंत्याकडून कसलीही  ठोस कारवाई केली जात नाही. त्यामुळे सध्या राखेची परळी व परिसरातून वाहतूक चालूच आहे. राख तळ्यातून होणारी राखे ची वाहतूक बंद करावी व दा. वडगाव, दाऊतपूर शिवारात राखे चे साठे उध्वस्त करावेत व प्रदूषण मुक्त गाव करावे या मागणीसाठी 12 फेब्रुवारी रोजी परळी -गंगाखेड रस्त्यावरील दादाहरी वडगाव जवळ रस्ता रोको आंदोलन करण्यात आले. आखे वडगावकरच या आंदोलनात सहभागी झाले होते. या आंदोलनामुळे परळी औष्णिक विद्युत केंद्राच्या मुख्य अभियंत्यांना आंदोलनस्थळी यावे लागले.

परळी औष्णिक विद्युत केंद्राचे मुख्य अभियंता आव्हाड, परळीच्या उपजिल्हाधिकारी नम्रता चाटे परळी ग्रामीण पोलीस निरीक्षक शिवलाल पुर्भे यांनी आंदोलकांची भेट घेतली आणि लेखी स्वरूपात मुख्य अभियंता यांनी आश्वासन दिले. वडगाव परिसरात असलेले राखेचे साठे करणार्‍यावर कारवाई करण्यात येईल व राख वाहतूक मुळे प्रदूषण होणार नाही याची काळजी घेतली जाईल असे लेखी पत्र दिल्यानंतर काही तासांनी  आंदोलन स्थगित करण्यात आले. या ठिकाणी पोलीस बंदोबस्त मोठ्या प्रमाणात तैनात करण्यात आला होता. 

Web Title: 'Eliminate ash pollution and save Wadgaonkar'; The villagers staged a Rastaroko agitation in Parli

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.