शहरं
Join us  
Trending Stories
1
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
2
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
3
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
4
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
5
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
6
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
7
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
8
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
9
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
10
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
11
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
13
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
14
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
15
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
16
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
17
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
18
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
19
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
20
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
Daily Top 2Weekly Top 5

बीडमध्ये निवडणुक कामासाठी जाणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या बसला अपघात; ५० कर्मचारी बालंबाल बचावले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2019 14:57 IST

पाण्याचे टँकर घेऊन जाणारा ट्रॅक्टर अचानक बसला आडवा आल्याने झाला अपघात

बीड : लोकसभा निवडणूकसाठी गुरूवारी मतदान आहे. त्यासाठी यंत्रणा सज्ज झाली आहे. बुधवारी बसमधून मतदान केंद्रावर जाणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या बसला अपघात झाला. बस रस्त्याच्या खाली गेली, मात्र सुदैवाने ती न उलटल्याने बसमधील ५० कर्मचारी बालंबाल बचावले. ही घटना बुधवारी दुपारी २ वाजेच्या सुमारास आष्टी तालुक्यातील डोईठाणा परिसरात घडली.

गुरूवारी मतदान असल्याने बुधवारी दिवसभर प्रशासनाची धावपळ सुरू होती. तर अधिकारी, कर्मचारी बुधवारी रात्रीच केंद्राच्या ठिकाणी मुक्कामी जाण्याच्या तयारी होते. असेच काही कर्मचारी आष्टी येथून बसमध्ये (एमएच २० बीएल २६८५) बसले. तालुक्यातील विविध केंद्रांवर कर्मचाऱ्यांना सोडत बस जात होते. डोईठाणा जवळ पाण्याचे टँकर घेऊन जाणारा ट्रॅक्टर अचानक बसला आडवे आले. यामुळे बस चालकाने बस रस्त्याच्या खाली घातली. बाजुला बस खड्डयात गेली, सुदैवाने बस पलटी न झाल्याने बसमधील जवळपास ५० कर्मचारी बालंबाल बचावले. यातील कर्मचाऱ्यांना किरकोळ खरचटल्याचे विश्वसनिय सूत्रांनी सांगितले. प्रशासनाला याबाबत कळविण्यात आले आहे. दरम्यान, अपघातानंतर ट्रॅक्टर चालकाने ट्रॅक्टर जागेवरच सोडून पलायन केले.

तार न तुटल्याने दुर्घटना टळलीधावती बस रस्त्याच्या बाजुला असणाऱ्या विद्यूत खांबाला धडकली. यावेळी विद्यूत प्रवाह सुरू होता. बस धडकल्याने स्पार्किंग झाली. सुदैवाने तार तुटली नाही, त्यामुळे मोठी दुर्घटना टळली. सर्व कर्मचाऱ्यांनी बसमधून उतरताच सुटकेचा निश्वास सोडला. या बसमधील सर्व कर्मचारी सुखरूप असल्याचे सांगण्यात आले.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकbeed-pcबीडMaharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2019Accidentअपघात