शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

क्रॉसिंग दरम्यान रेल्वेच्या खिडकीतून हात घालत दोन महिलांचे सोन्याचे दागिने लुटले

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 15, 2024 17:08 IST

घाटनांदुर रेल्वे स्टेशनजवळ क्रॉसिंग होत असताना दोन डब्यात चोरीची घटना

-संजय खाकरेपरळी (बीड): कोल्हापूर-नागपूर रेल्वे गाडीच्या एस १ व एस २ डब्यात सोमवारी रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास दोन प्रवासी महिलांच्या गळ्यातील साडेतीन लाख रुपयांच्या किमतीचे सोन्याचे मंगळसूत्र व साखळी चोरून नेल्याचा प्रकार घडला. याप्रकरणी परळी रेल्वे पोलीस ठाण्यात मंगळवारी पहाटे अज्ञात चोरट्याविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. 

याबाबतची माहिती अशी की, १४ ऑक्टोंबर रोजी कोल्हापूरहून -नागपूरकडे निघालेली रेल्वे परळी मार्गे घाटनांदुरकडे रवाना झाली. घाटनांदुर रेल्वे स्टेशनजवळ क्रॉसिंग होत असताना खिडकीतून हात घालून चोरट्यांनी महिला प्रवाशांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने घेऊन पोबारा केला. माहिती मिळताच गस्तीवरील रेल्वेपोलीस ठाणे परळीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सोमनाथ वाघमोडे टमकीकर यांनी चोरट्यांचा पाठलाग केला. परंतु, अंधाराचा फायदा घेत चोरटे पळून गेले. 

दरम्यान याप्रकरणी बालाजी शंकर बडगे ( रा. अंबुलगा, तालुका निलंगा जि.लातूर) व वर्षा त्रिपाठी ( रा. राधानगरी, कोल्हापूर)  या दोघांनी दिलेल्या फिर्यादीवरून मंगळवारी पहाटे चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. घटनास्थळास आरपीएफचे पोलीस उपनिरीक्षक किशोर मलकुनाईक यांनी भेट दिली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीBeedबीडrailwayरेल्वे