शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

मुसळधार पावसाचा तडाखा, कडीनदीच्या पुरात तात्पुरता पूल गेला वाहून

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 9, 2024 12:00 IST

वाहन धारकांनी पर्यायी मार्गाचा अवलंब करण्याचे तहसीलदाराचे आवाहन 

- नितीन कांबळेकडा (बीड): मागील अनेक महिन्यांपासून बीड-नगर राष्ट्रीय महामार्गावरील साबलखेड ते आष्टी या अंतरावरील रस्त्याचे काम सुरू आहे. कडा येथे रहदारीसाठी केलेला पर्यायी पूल सोमवारी रात्री झालेल्या पावसाने वाहून गेल्याने संपर्क तुटला आहे. यामुळे वाहनधारकांनी येण्याजाण्यासाठी पर्यायी रस्त्याचा अवलंब करावा असे आवाहन तहसीलदार प्रमोद गायकवाड यांनी केले आहे.

बीड-नगर राष्ट्रीय महामार्गावरील साबलखेड ते आष्टी या रस्त्याचे काम गेल्या अनेक महिन्यांपासून सुरू आहे. संबंधित विभागाकडून संथगतीने काम सुरू असल्याने अनेक अडचणीचा सामना प्रवाशी, वाहनधारकांना करावा लागत आहे. रस्ता काम करताना कडा येथील मोठ्या पुलाचे काम सुरू असल्याने रहदारीसाठी पर्यायी व्यवस्था म्हणून येथील स्मशानभूमीजवळ मातीचा भराव व त्याखाली नळकांड्या टाकून पूल करण्यात आला होता. सोमवारी रात्री झालेल्या दमदार पावसाने कडीनदीला पाणी आल्याने हा पर्यायी पूल रात्री उशिरा वाहून गेल्याने संपर्क तुटला आहे. तर आष्टीवरून कड्याला आणि नगरवरून कड्यामार्ग येणाऱ्या वाहनधारकांनी पर्यायी रस्त्याचा अवलंब करावा असे आवाहन तहसीलदार प्रमोद गायकवाड यांनी केले आहे.

टॅग्स :RainपाऊसBeedबीडfloodपूर