शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
3
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
4
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
5
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
6
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
7
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
8
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
9
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
10
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
11
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
12
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
13
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
14
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
15
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
16
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
17
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
18
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
19
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
20
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
Daily Top 2Weekly Top 5

मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनंतरही दुष्काळी उपाययोजना शून्यच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 10, 2018 00:21 IST

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मागील महिन्यात जिल्हा दौऱ्यावर आले होते. यावेळी घेण्यात आलेल्या आढावा बैठकीमध्ये दुष्काळ निवारणासाठी विविध सूचना जिल्हा प्रशासनाला दिल्या होत्या. मात्र एक महिना उलटून देखील योजना राबवण्याचे प्रमाण अत्यल्प आहे.

प्रभात बुडूख ।लोकमत न्यूज नेटवर्कबीड : जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थिती आढावा घेण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मागील महिन्यात जिल्हा दौऱ्यावर आले होते. यावेळी घेण्यात आलेल्या आढावा बैठकीमध्ये दुष्काळ निवारणासाठी विविध सूचना जिल्हा प्रशासनाला दिल्या होत्या. मात्र एक महिना उलटून देखील योजना राबवण्याचे प्रमाण अत्यल्प आहे.राज्य शासनाच्या वतीने जिल्ह्यात तीव्र दुष्काळ जाहीर करण्यात आल्यानंतर, टंचाईवर मात करण्यासाठी विविध योजना जिल्ह्यात राबवण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांकडून देण्यात आले होते. त्यानंतर मागील महिन्यात १२ डिसेंबर रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जिल्ह्यातील पाहणी व आढावा बैठक घेण्यासाठी आले होते. यावेळी राज्य पातळीवरील अधिकारी, विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे, पालकमंत्री पंकजा मुंडे, जिल्ह्यातील सर्व विभागांचे प्रमुख अधिकारी यांची उपस्थिती होती. जिल्ह्यातील दुष्काळ निवारणासाठी कोणत्या योजना राबवाव्यात जेणेकरुन टंचाई स्थितीमध्ये नागरिकांना दिलासा मिळेल. याविषयी मुख्यमंत्र्यांनी सूचना केल्या होत्या, मात्र प्रशासनाच्या वतीने योजना राबवण्यामध्ये दिरंगाई होत असल्याचे चित्र आहे. तसेच जिल्ह्यातील टंचाईच्या संदर्भातील ख-या परिस्थितीचा अहवाल योग्यरीत्या राज्य शासनाकडे पाठवला जात नसल्याचे आरोप देखील नागरिकांमधून होत आहेत. त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या सूचनांना जिल्हा प्रशासनाने केराची टोपली तर दाखवली नाही ना अशी चर्चा सुरु झाली आहे. यासंदर्भात प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी संपर्क साधला असता प्रमुख अधिका-यांशी संपर्क होऊ शकला नाही.टँकरचे प्रस्ताव प्रलंबितजिल्ह्यात दुष्काळी परिस्थितीमुळे तीव्र पाणी टंचाई आहे, त्यामुळे नागिरकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. त्यामुळे टँकर सुरु करण्याची मागणी नागरिकांमधून होऊ लागली आहे. ग्रामपंचायतच्या वतीने पंचायत समितीकडे प्रस्ताव पाठवले आहेत. प्रस्ताव देऊन महिना उलटला आहे तरी देखील प्रशासनाच्या वतीने कुठलीही कार्यवाही न झाल्यामुळे प्रस्ताव प्रलंबित राहिले आहेत.

टॅग्स :droughtदुष्काळDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसwater shortageपाणीटंचाई