शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

दारुड्या चालकाने घेतला बळी; भरधाव कारच्या धडकेत दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 23, 2023 19:33 IST

चारचाकीचा चालक दारूच्या नशेत असल्याची माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली.

- नितीन कांबळे कडा - भरधाव कारने जोरदार धडक दिल्याने दुचाकीस्वार तरुणाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना आज सायंकाळी ६ वाजता बीड-नगर महामार्गावर धामणगावजवळ झाली. अनिल पिंपळे असे मृताचे नाव असून अपघातात त्याची पत्नी आणि मुलगा जखमी झाला आहे. दरम्यान, चारचाकी चालक दारूच्या नशेत असल्याची माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली.

याबाबत प्राथमिक माहिती अशी की, अनिल पिंपळे ( ३२ ) हा देवळाली रहिवासी आहे. त्याचा मासे विक्रीचा व्यवसाय आहे. आज सायंकाळी तो पत्नी आणि मुलासह धामणगाव येथे मासे विक्रीसाठी बीड- नगर महामार्गावर दुचाकीवरून (एच ०४ डी.एन.१७१०) प्रवास करत होता. दरम्यान, धामणगावजवळ  झिंजुर्कॅ वस्तीच्या वळणावर भरधाव वेगातील अनियंत्रित कारने दुचाकीला जोरदार धडक दिली. यात अनिलचा जागीच मृत्यू झाला. तर पत्नी पपीता ( ३० ) आणि मुलगा मंगेश ( १६) गंभीर जखमी झाला. त्यांना उपचारासाठी अहमदनगर येथे दाखल करण्यात आले आहे.

चारचाकी चालक होता नशेत दरम्यान, चारचाकीचा चालक दारूच्या नशेत असल्याची माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली. कारमध्ये देखील दारूच्या बॉटल आढळून आल्या आहेत. अपघातानंतर चालक तेथून पसार झाला आहे. चालकाने दारूच्या नशेत कार चालवल्याने मात्र एका कुटुंबाने कर्ता पुरुष गमावला आहे. 

टॅग्स :AccidentअपघातBeedबीड