शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली लाल किल्ला स्फोट: कारमधून ब्लास्ट घडवून आणणाऱ्या उमरचा पहिला फोटो आला समोर
2
दिल्लीच्या स्फोटाची पाकिस्ताननं घेतली धास्ती; रात्रीच बोलावली तातडीची बैठक, NOTAM जारी अन्...
3
VIDEO: स्फोटकांनी भरलेली कार ३ तास एकाच ठिकाणी उभी; स्फोट घडवणाऱ्याने एका मिनिटासाठीही गाडी सोडली नाही
4
दिल्लीतील स्फोट हा आत्मघाती हल्ला? समोर येतेय अशी माहिती, पोलिसांकडून गुन्हा दाखल
5
गुंतवणूकदारांसाठी मोठी बातमी! निफ्टीमध्ये आणखी १४% तेजीची शक्यता; गोल्डमॅन सॅक्सने सांगितलं कारण
6
टॅरिफमुळे प्रत्येक अमेरिकन नागरिकाला मिळणार २००० डॉलर्स, याच्या विरोधात बोलणारा मुर्ख; काय म्हणाले ट्रम्प?
7
Dharmendra Health Update: धर्मेंद्र यांच्या प्रकृतीत होतेय सुधारणा, हेमा मालिनी आणि ईशा देओलने दिली हेल्थ अपडेट; म्हणाल्या...
8
कंटेनर शिरला थेट वारकऱ्यांच्या दिंडीत, १० जखमी, एका महिलेचा चिरडून मृत्यू, जुन्या पुणे मुंबई हायवे मार्गावरील घटना
9
५ वर्षांच्या आत हे 'काम' पूर्ण झालं पाहिजे; केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी अधिकाऱ्यांना दिलं टार्गेट
10
दिल्लीत 'फिदायिन' हल्ला?; लाल किल्ल्याजवळ स्फोट घडवण्यापूर्वी कारमध्ये दिसलेला संशयित डॉक्टर उमर
11
Share Market Update: शेअर बाजार आपटला; सेन्सेक्समध्ये २५० अंकांची घसरण, 'हे' प्रमुख स्टॉक्स धडाम
12
रोहित शर्मा-विराट कोहलीच्या दमदार खेळीनंतर गौतम गंभीरने अजिबात सेलिब्रेशन केलं नाही; कारण..
13
Post Office च्या ‘या’ स्कीममध्ये मिळेल दरमहा ₹५५०० चं फिक्स व्याज; किती करावी लागेल गुंतवणूक, पटापट करा चेक
14
"थोड्या वेळात घरी येतोय..."; दिल्ली स्फोटाने बस कंडक्टर अशोक कुमारचा घेतला बळी; आईला अजूनही माहिती नाही
15
पकडले जाण्याच्या भीतीने उमरने उडवली स्फोटकांनी भरलेली कार; पुलवामा हल्ल्याच्या दिवशी विकली गाडी
16
भाजप, काँग्रेसची नगराध्यक्ष उमेदवारांची यादी ५ दिवसांत, आज भाजपची तर उद्या काँग्रेसची मुंबईत होणार महत्त्वपूर्ण बैठक
17
दिल्लीतील स्फोटाचं पुलवामा कनेक्शन समोर, सलमानने काश्मीरमधील तारिकला विकली होती ती कार
18
बिहारमध्ये दुसऱ्या टप्प्यासाठी आज मतदान, २० जिल्हे, १२२ मतदारसंघ, ३.७ कोटींवर मतदार
19
दिल्लीतील स्फोटात आतापर्यंत १० खुलासे समोर; फरीदाबाद मॉड्यूलशी काय आहे कनेक्शन?
20
दिल्लीत स्फोट; मुंबईत अलर्ट, मुंबईच्या पाचही प्रवेशद्वारांसह सागरी सुरक्षेत वाढ; रेल्वे स्थानके, महत्त्वाच्या ठिकाणी नाकाबंदी

बँकेसमोर ढोल बजाओ आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2019 00:19 IST

शेतकऱ्यांच्या पिकविम्याचे पैसे परस्पर कर्ज खात्यात जमा करू नयेत, शेतकऱ्यांच्या पीकविम्याचे पैसे तात्काळ वाटप करा यासह विविध मागण्यासाठी शिवसेनेच्या वतीने सोमवारी सकाळी शहरातील राष्ट्रीयकृत बँकांसमोर ढोल बजाओ आंदोलन करण्यात आले.

ठळक मुद्देशिवसेना आक्रमक : अंबाजोगाई, परळी,धारुर येथील बँकांसमोर जोरदार घोषणाबाजी

अंबाजोगाई : शेतकऱ्यांच्या पिकविम्याचे पैसे परस्पर कर्ज खात्यात जमा करू नयेत, शेतकऱ्यांच्या पीकविम्याचे पैसे तात्काळ वाटप करा यासह विविध मागण्यासाठी शिवसेनेच्या वतीने सोमवारी सकाळी शहरातील राष्ट्रीयकृत बँकांसमोर ढोल बजाओ आंदोलन करण्यात आले.शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशावरून शिवसेना नेते चंद्रकांत खैरे व बीड जिल्हा संपर्कप्रमुख आनंद जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच बीड जिल्हा प्रमुख सचिन मुळुक, उपजिल्हाप्रमुख बाळासाहेब अंबुरे यांच्या नेतृत्वाखाली ढोल बजाओ आंदोलन करण्यात आले. यामध्ये शेतक-यांच्या पिकविम्याचे पैसे परस्पर कर्ज खात्यात जमा करू नयेत, शेतक-यांच्या पीकविम्याचे पैसे तात्काळ वाटप करा, पीक कर्जाचे पुनर्गठन करा, कर्जमाफी जाहीर झालेल्या शेतकºयांची यादी जाहीर करा, शेतक-यांना पीककर्ज तात्काळ मंजूर करा, घोषणाबाजीने बँकेचा परिसर दणाणून गेला. बँकेच्या मॅनेजरने यापुढे शेतकºयांची अडवणूक होणार नाही, असे आश्वासन दिले. आंदोलनात तालुका प्रमुख अर्जुन वाघमारे, शहर प्रमुख गजानन मुडेगावकर, जिल्हा सहसंघटक अशोक गाढवे, अ‍ॅड. विशाल घोबाळे, उपतालुका प्रमुख वसंत माने, खंडु पालकर, नाथराव मुंडे, महादेव आरसुडे, गणेश जाधव, शिवकांत कदम यांच्यासह पदाधिकारी, शिवसैनिक सहभागी होते.परळीत एसबीआयसमोरही आंदोलनपरळी : तालुक्यातील शेतक-यांना पीक विम्याविषयी बँकाद्वारे होत असलेल्या पिळवणुकीच्या विरोधात शिवसेना तालुका प्रमुख व्यंकटेश शिंदे यांच्या नेतृत्वाखाली येथील एस.बी.आय. शाखेसमोर सोमवारी ‘ढोल बजाओ’ आंदोलन करण्यात आले. दीर्घकाळ दुष्काळी परिस्थितीचा सामना करत शेतकरी हवालदिल झाला असून, अशा स्थितीत सर्वच राष्ट्रीयकृत बँकाद्वारे पीक विमा, पीक कर्ज, पुनर्गठन तसेच अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ व मुद्रा लोनच्या अंतर्गत कर्ज वाटप अशाविषयी बँकांनी शेतकºयांना व नवउद्योजक तरु णांना वेठीस धरले असून, त्यांच्या या सर्व समस्या सोडवण्यासाठी व बँक अधिकाºयांना जबाबदारीची जाणीव करून देण्यासाठी शिवसेने च्या वतीने ढोल बाजाव आंदोलन करण्यात आले. यावेळी राजा पांडे, राजेश विभुते, रमेश चौंडे उपस्थित होते.

टॅग्स :BeedबीडFarmerशेतकरीShiv SenaशिवसेनाCrop Insuranceपीक विमाBanking Sectorबँकिंग क्षेत्रagitationआंदोलन