शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

नवर देवानेच दिला हुंडा पण लग्नानंतर तिसऱ्या दिवशीच नवरी पसार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 16, 2021 15:36 IST

लग्नाच्या आमिषाने पैसे उकळून फसवणूक करण्याचे प्रकार वाढले आहेत.

बीड : लग्न जमत नसल्याने मध्यस्थाकरवी दीड लाख रुपये देऊन स्थळ शोधले. मोजक्या नातेवाईकांत लग्नसोहळा पार पडला, पण लग्नानंतर तिसऱ्याच दिवशी वधूने पोबारा केला. धारुर तालुक्यात हा धक्कादायक प्रकार १४ नोव्हेंबर रोजी समोर आला. याप्रकरणी पाच जणांवर फसवणुकीचा गुन्हा नोंद झाला.

अशोक ताराचंद मोरे (२८, रा. कारी, ता. धारुर) असे फसवणूक झालेल्या तरुणाचे नाव आहे. तो एका कारखान्यावर मजुरी काम करतो. त्याचे लग्न जमण्यास अडचण येत होती. लग्नासाठी मुलगी शोधण्यास त्याने मुकादम राधाकिसन इखे (रा.तेलगाव, ता.धारुर) यांना सांगितले. त्यांनी त्याला एक मुलगी दाखवली. यावेळी मुलीचे मामा, बहीण, भाऊ उपस्थित होते. लग्नासाठी मुलीला सुरुवातीला ५० हजार नंतर एक लाख असे एकूण दीड लाख रुपये अशोक यांनी दिले होते. १ नोव्हेंबर रोजी त्यांचे लग्न झाले मात्र, ३ नोव्हेंबर रोजी पहाटेच्या दरम्यान नवरीने घरातून पळ काढला. रविवारी अशोक मोरे यांनी दिंद्रुड ठाण्यात तक्रार दिली. यावरुन मुकादम राधाकिसन ईखे, नवरी मुलगी अनिता प्रल्हाद शिंदे व तिचा मामा, भाऊ व बहीण यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे. हवालदार राम खेत्रे तपास करत आहेत.

टोळी सक्रियलग्नाच्या आमिषाने पैसे उकळून फसवणूक करण्याचे प्रकार वाढले आहेत. कारी (ता.धारुर) येथे उघडकीस आलेल्या प्रकाराने लग्नाळू मुलांना जाळ्यात ओढून गंडा घालणारी टोळी सक्रिय असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीBeedबीडmarriageलग्न