शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
6
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
7
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
8
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
9
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
10
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
11
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
12
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
13
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
14
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
15
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
16
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
17
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
18
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
19
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
20
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

बीड जिल्ह्यात विभागीय आयुक्तांचा थेट बांधावर शेतकऱ्यांशी संवाद; शासन मदतीची दिली ग्वाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 19, 2022 18:06 IST

नुकसानीचे वस्तुनिष्ठ पंचनामे करून अहवाल सादर करण्याचे दिले आदेश

गेवराई/ धारूर :बीड जिल्ह्यात मागील आठ ते दहा दिवसात झालेल्या सततच्या पावसाने शेतकऱ्यांच्या पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. आज दुपारी अचानक विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी प्रत्यक्ष बांधावर जाऊन नुकसानीची पहाणी केली केली. यावेळी त्यांनी वस्तूनिष्ठ पंचनामे करण्याचे आदेश दिले. जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा हे ही त्यांच्या समवेत उपस्थित होते.

बीड जिल्ह्यास परतीच्या पावसाचा मोठा फटका बसला आहे. कापुस, सोयाबीन, तुर, ऊस यासह संपूर्ण खरीप पिकांचा चिखल झाल्याने  शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला आहे. नुकसानीची पाहणी करण्यासाठी आज विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर बीड जिल्हा दोऱ्यावर आहेत. दुपारी १ वाजेच्या सुमारास केंद्रेकर यांनी काजळवाडी, सिरसदेवी या भागातील नुकसानीची थेट शेतात जाऊन पाहणी केली. त्यानंतर केंद्रेकर यांनी धारूर तालुक्यातील नुकसानीची पाहणी केली. 

या ठिकाणी केली पाहणी परतीच्या पावसाने नुकसान झालेल्या गेवराई तालुक्यातील काजळवाडी, सिरसदेवी येथे थेट शेतात जाऊन पाहणी केली. यावेळी आ.लक्ष्मण पवार, जिल्हाधिकारी राधा बिनोद शर्मा, तहसीलदार सचिन खाडे, मंडळ अधिकारी जितेंद्र लेंडाळ, तलाठी माणिक पांढरे, उद्धव घोडके, प्रल्हाद येळापुरे, नानासाहेब पवार यांच्यासह शेतकरी उपस्थित होते. तर धारूर तालुक्यात केज रस्त्यावर विनायक शिनगारे  यांच्या शेतातील सोयाबीन पिकात जाऊन पाहणी केली. या नुकसान भागात थेट बांधावर जाऊन माहिती घेत केंद्रेकर यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला. यावेळी तहसीलदार रामेश्वर स्वामी, तालुका कृषी अधिकारी शरद शिनगारे, मंडळ अधिकारी नजीर कुरेशी, तलाठी मुळे, कृषी व महसूल विभागाचे अधिकारी व कर्मचारी यावेळी उपस्थित होते

शासन शेतकऱ्यांच्या सोबतपरतीच्या पावसाने शेतीचे मोठे नुकसान झाले आहे.  हे नुकसान भरून निघणारे नाही. या काळात शासन तुमच्या पाठिशी आहे. नुकसानीचे सरसकट पंचनामे करून, पिकविम्याच्या तक्रारी असतील तर ऑनलाईन नोंदवा अथवा लेखी तक्रारी कराव्यात असे आवाहन विभागीय आयुक्त सुनिल केंद्रेकर यांनी केले. नुकसानीचे वस्तुनिष्ठ पंचनामे करून अहवाल सादर करण्याचे आदेशही त्यांनी यावेळी दिले.

टॅग्स :BeedबीडDivisional Commissioner Office Aurangabadऔरंगाबाद विभागीय आयुक्तालयFarmerशेतकरीagricultureशेती