शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
4
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
5
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
6
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
7
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
8
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
9
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
10
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
11
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
12
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
13
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
14
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
15
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
16
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
17
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
18
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
19
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
20
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
Daily Top 2Weekly Top 5

राज्यातील 2 हजार आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना किटचे वाटप

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 11, 2023 17:38 IST

परळीत धनंजय मुंडेंच्या हस्ते गुट्टे कुटुंबास दिले संवेदन किट

परळी : राज्यातील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना विविध शेती आणि संसार उपयोगी साहित्यांचे किट वाटप केले जात आहेत. कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्या संकल्पनेतून  ही योजना राबविण्यात येत आहे.

धनंजय मुंडे यांच्या सूचने नुसार कृषी मंत्रालय अंतर्गत महाराष्ट्र कृषी उद्योग विकास महामंडळाने यामध्ये पुढाकार घेतला असून "शेतकरी कुटुंबास मदतीचा हात-संवेदन 2023" असे या उपक्रमाचे नामकरण करण्यात आले आहे.

या किटमध्ये परसबागेतील भाजीपाला बियाणे, नॅनो युरिया,सूक्ष्म मूलद्रव्य तसेच विविध किटकनाशकांचा समावेश आहे. त्याचबरोबर दिवाळी फराळ साठी उपयुक्त साहित्य आणि महाराष्ट्र राज्य कृषी उद्योग विकास महामंडळातर्फे उत्पादित करण्यात येत असणाऱ्या विविध वस्तूंचा समावेश आहे.

परळी तालुक्यातील मालेवाडी गावच्या आत्महत्याग्रस्त शेतकरी भास्कर गुट्टे यांच्या कुटुंबियांना ही संवेदन किट धनंजय मुंडे यांच्या हस्ते देण्यात आली. यावेळी जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंडे, अपर पोलीस अधीक्षक कविता नेरकर, ज्येष्ठ नेते वाल्मिक अण्णा कराड, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सूर्यभान  मुंडे, अपर जिल्हाधिकारी त्रिगुण कुलकर्णी, तहसीलदार व्यंकटेश मुंडे, तालुका कृषी अधिकारी अशोक सोनवणे आदी उपस्थित होते.

राज्यातील विविध जिल्ह्यातील 2000 शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना हे किट वाटप करण्यात येत आहे. या उपक्रमाचा या प्रमाणे याचे सर्व जिल्ह्यात याचे वितरण होणार आहे. ही किट पूर्णपणे लोकवर्गणीतून देण्यात आली आहे, यामध्ये शासनाचा कोणताही निधी वापरण्यात आलेला नाही.

टॅग्स :Dhananjay Mundeधनंजय मुंडेBeedबीडfarmer suicideशेतकरी आत्महत्या